Home /News /lifestyle /

Sleeping Position : झोपल्या झोपल्या करू शकता बऱ्याच आजारांवर मात; कोणत्या समस्येसाठी कसं झोपायचं पाहा

Sleeping Position : झोपल्या झोपल्या करू शकता बऱ्याच आजारांवर मात; कोणत्या समस्येसाठी कसं झोपायचं पाहा

होय, माणसाच्या झोपेच्या पद्धती म्हणजेच पोजिशन (Different Sleeping Position) वेगवेगळ्या असतात. आपल्याला एखाद्या पोजीशनमध्ये झोप लागत नसेल किंवा त्रास होत असेल तर ती पोजिशन बदलून पाहावी.

  मुंबई, 24 जून :  पुरेशी झोपणं घेणं हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. झोप पूर्ण झाली नाही ही आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की झोपेतही तुम्ही बऱ्याच आजारांवर मात करू शकता. तुम्ही कसं झोपता म्हणजे तुमची झोपण्याची स्थिती याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. स्लिपिंग पोझिशन तुम्हाला आरोग्याच्या बऱ्याच समस्यांपासून आराम देऊ शकते (Different Sleeping Position) . प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुणी पाठीवर झोपतं, कुणी पोटावर, कुणी पोटावर हात ठेवून झोपतं तर कुणी डोक्याखाली हात ठेवतं. कुणी उजव्या कुशीवर झोपतं तर कुणी डाव्या कुशीवर. झोपण्याच्या या प्रत्येक परिस्थितीचा वेगवेगळा फायदा होतो. आता हे फायदे कोणते ते पाहुयात. डाव्या किंवा उजव्या अंगावर झोपणे डाव्या किंवा उजव्या कशावर झोपणे तुमच्यासाठी फायदेशीर (Different Sleeping Position Benefits) असते. जर तुम्ही मान आणि पाठदुखी, ऍसिड रिफ्लक्स, घोरणे आणि स्लीप एपनियाने त्रस्त असाल तर असे झोपणे खूप चांगले आहे. एका बाजूला झोपल्याने पाठीचा कणा लांबतो, ज्यामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते. गर्भवती महिलांसाठी डाव्या बाजूला झोपणे फायदेशीर आहे, कारण यामुळे गर्भातील रक्ताभिसरण सुधारते आणि बाळापर्यंत जास्तीत जास्त ऑक्सिजन पोहोचतो. आपले हात सरळ ठेऊन खालच्या बाजूला तोंड करून झोपणे आपले दोन्ही हात सरळ रेषेत खाली ठेऊन झोपा. त्याला 'लॉग' मुद्रा असेही म्हणतात. मणक्यासाठी ही एक आदर्श स्थिती आहे. कारण ती पाठीचा नैसर्गिक वक्र सरळ ठेवण्यास मदत करते. सरळ पाठीचा कणा केवळ पाठ आणि मान दुखणे टाळत नाही तर स्लीप एपनिया देखील कमी करते. या स्थितीत झोपल्याने घोरणेही कमी होते.

  पावसाळा सुरू होताच 'या' आजाराचं संकट; बचावासाठी तात्काळ करा अशा उपाययोजना

  आपल्या डोक्यावर आपले हात ठेवून पाठीवर झोपणे तुमच्या पाठीवर झोपा आणि चेहऱ्याच्या बाजूला तुमच्या डोक्यावर हात ठेवून झोपा. याला 'स्टारफिश' स्थिती असेही म्हणतात. पाठीवर झोपणे ही तुमच्या मणक्याच्या आणि मानेच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम स्थिती मानली जाते. यामुळे डिस्कवरील दाब कमी होतो. अशा प्रकारे मानदुखी आणि पाठदुखी थांबते. हे ऍसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करते. यामुळे पचलेले पदार्थ अन्ननलिकेत परत येण्यापासून प्रतिबंधित होतात. या आसनामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या होण्यापासून बचाव होतो. आपले हात समांतर ठेवून आपल्या पाठीवर झोपणे तुमच्या पाठीवर झोपा आणि तुमचे हात तुमच्या दोन्ही बाजूला ठेवा. या पोझिशनला 'सोल्जर पोज' असेही म्हणतात. तुमच्या पाठीवर झोपणे ही तुमच्या मणक्यासाठी सर्वोत्तम स्थिती मानली जाते. यामुळे पाठ सरळ राहते आणि डिस्कवरील दाब कमी होतो. त्यामुळे मान आणि पाठदुखी थांबते. याशिवाय पाठीवर झोपल्याने अॅसिड रिफ्लक्स कमी होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. आपले हात पसरून झोपणे हात पसरून एका बाजूला झोपणे आणि झोपताना, आपले पाय थोडेसे वाकवा. याला 'आकांक्षी' स्थिती असेही म्हणतात. या झोपण्याच्या स्थितीमुळे पाठ आणि मान दुखणे थांबते. याव्यतिरिक्त घोरणे, चिडचिड आणि ऍसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत होते. इतकेच नाही तर झोपेची ही स्थिती शरीराला मेंदूला अधिक कार्यक्षमतेने डिटॉक्स करण्यास मदत करते. ज्यामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारखे मेंदूचे विकार होण्याचा धोका कमी होतो.

  Health Tips: डायबेटीज असलेले हंगामी फळं खाऊ शकतात का? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितली माहिती

  दोन्ही गुडघे वाकवून झोपणे दोन्ही गुडघे वाकवून छातीवर झोपा. त्याला गर्भ किंवा गर्भाची स्थिती देखील म्हणतात. या स्थितीमुळे घोरणे मोठ्या प्रमाणात थांबते. गर्भवती महिलांसाठी देखील ही एक चांगली स्थिती आहे. या स्थितीत डाव्या बाजूला झोपल्याने ऍसिड रिफ्लक्स कमी होण्यास मदत होते, कारण त्यामुळे पोट अन्ननलिकेच्या तळाशी राहते.
  (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Sleep benefits

  पुढील बातम्या