मुंबई, 24 जून : सर्व वयोगटातील लोकांना हंगामी फळे खायला आवडतात. सध्या पावसाळा सुरू असला तरी आंबा, टरबूज, खरबूज, केळी यासह सर्वच फळे बाजारात पाहायला मिळत आहेत. मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये कोणती फळे खावीत आणि खाऊ नयेत याबाबत संभ्रम असतो. फळे गोड असतात आणि मधुमेहाच्या रुग्णांनी फळांपासून दूर राहावे असा सर्वसाधारण समज आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत मात्र (Health Tips for Diabetes Patients) काहीसे वेगळे आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
मधुमेह तज्ज्ञ डॉ.ललित कौशिक (एमडी) सांगतात की, मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मात्र, मधुमेहाचे रुग्ण फळे खाऊ शकत नाहीत, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना मधुमेहाच्या गंभीर अवस्थेचा त्रास आहे किंवा ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी फळे खाणे टाळावे. याशिवाय इतर रुग्ण मोसमी फळांसह बहुतांश फळे खाऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, टरबूज, खरबूज, आंबा, केळी यासह बहुतांश फळांमध्ये पोटॅशियम भरपूर असते, त्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होते. इन्सुलिन तयार झाल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.
हे वाचा -
नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा
या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा -
डॉ.ललित कौशिक म्हणतात की फळांमध्ये फ्रक्टोजचे प्रमाण असते, त्यामुळे साखरेची पातळी थेट वाढत नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री फळे खावीत. असे केल्याने त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र, फार पूर्वी कापलेली फळे खाणे टाळावे. फळे कापून घरी खाण्याचा प्रयत्न करा. आजकाल फळांना गोड करण्यासाठीही रसायनांचा वापर केला जात आहे. कोणतेही फळ अपेक्षेपेक्षा जास्त गोड जाणवत असेल तर ते खाणे टाळावे.
हे वाचा -
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या
तर डॉक्टरांशी संपर्क साधा -
मधुमेहाच्या रुग्णांना फळे खाल्ल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर तुम्हाला मधुमेहाच्या गंभीर अवस्थेचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फळांचे सेवन करावे. तसेच लक्षात ठेवा की, किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी फळे खाताना थोडा हात आखडता ठेवावे. फळे खाणे आपल्या आरोग्याच्या स्थितीवर देखील अवलंबून असते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.