• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • ‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा

‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांकडे पैसा टिकत नाही, कारण पैसा जपून वापरण्याचा त्यांचा स्वभावच नसतो.

 • Share this:
  दिल्ली, 18 जून : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)12 राशींचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे (Zodiac Sing) स्वतःचे स्वभाव गुण असतात. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीची व्यक्ती आयुष्यामध्ये चढ-उतार अनुभवत असते. ग्रहमान बदललं की आयुष्यामध्ये काही बदल देखील घडत असतात. प्रत्येक राशीमध्ये काही गुण असतात तर, काही दोष असतात. ज्योतिष शास्त्रानुसार 4 राशी अतिशय उधळ्या स्वभावाच्या असतात. या राशीच्या लोकांना पैशाच्या महत्त्व कधीच कळत नाही. त्यामुळे पैशाच्या वापरावर त्यांचं नियंत्रण नसतं (No Control On Money Expenses). त्यामुळेच अकारण खर्च करतात. जाणून घेऊयात त्या राशींबद्दल तुळ रास ज्योतिष शास्त्रानुसार तुळ राशीचे लोक अतिशय उधळ्या स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. हे लोक भविष्यातल्या आर्थिक अडचणींची कधीच चिंता करत नाहीत. त्यामुळेच इच्छा असून देखील त्यांच्याकडे पैसा साठत नाही. त्यांचं राहणीमान स्टायलिश असतं. त्यामुळेच खर्चही जास्त होतो. कधीकधी अनावश्यक खर्च करतात. त्यामुळे यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. (पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात?; दोष तुमचा नाही, राशीचा आहे हा प्रभाव) सिंह रास सिंह राशीची लोकं पैसा खर्च करताना मागेपुढे पाहत नाहीत. मित्रांसाठी देखील अनावश्यक खर्च करतात. कधीकधी गरज नसताना देखील यांच्याकडून पैसे खर्च होतात. या लोकांना हाय-फाय जेवण आणि राहणीमान आवडतं. याच खर्चीक स्वभावामुळे त्यांना कर्जबाजारी व्हायची वेळ येते. मिथुन रास मिथुन राशीचे लोक देखील उधळ्या स्वभावाचे असतात यांना देखील तुळ आणि सिंह राशी प्रमाणेच स्टायलिश राहणं आवडत असतं. त्यामुळे राहण्यावर आणि खाण्यापिण्यावर यांचा जास्त खर्च होतो. यांच्याकडे कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही. पैशाची गुंतवणूक यांना जमत नाही. (Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत) वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक खर्चला घाबरत नाहीत. हे लोक वर्तमान काळात जगतात. पैसा खर्च करताना भविष्याचा विचारच करत नाहीत. उत्साहात आणि आनंदात आयुष्य जगण्याची इच्छा असणारे हे लोक त्यासाठी कितीही पैसा खर्च करायला तयार असतात. मात्र त्यामुळेच संकट काळामध्ये यांना कर्जबाजारी व्हायची वेळ येते. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: