जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जपा लहानग्यांच्या डोळ्यांना! ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास; अशी घ्या काळजी

जपा लहानग्यांच्या डोळ्यांना! ऑनलाईन अभ्यासामुळे वाढतायेत त्रास; अशी घ्या काळजी

मुलांचे डोळे नाजूक असतात. मुलाला डोळ्यांचा त्रास असेल तर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर जास्त वेळ घालवणं त्याच्यासाठी खुपच हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे मुलांना थोड्याथोड्या वेळाने स्क्रिनवरून डोळे बाजूला घेण्याची सवय लावा.

मुलांचे डोळे नाजूक असतात. मुलाला डोळ्यांचा त्रास असेल तर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर जास्त वेळ घालवणं त्याच्यासाठी खुपच हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे मुलांना थोड्याथोड्या वेळाने स्क्रिनवरून डोळे बाजूला घेण्याची सवय लावा.

कोरोनाकाळात (Corona Period) बहुतेक मुलांचा वेळ ऑनलाईन अभ्यासामुळे(Online Study) स्क्रीनकडे पाहण्यात जात आहे. त्यामुळे डोळ्यांवर ताण वाढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    दिल्ली,17 जून : कोरोनाची दुसरी लाट **(Second Wave of Corona)ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या भीतीने जून महिन्यात शाळा सुरू झालेल्या(No School)**नाहीत. त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शाळा (Online School) सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय कोरोनामुळे मुलांना घराबाहेर खेळायलाही जाता येत नाही. त्यामुळे त्यांचा जास्तीतजास्त वेळ घरी फोनवर किंवा लॅपटॉपवर जात आहे. त्यामुळे मुलांचे डोळे खराब होण्याची भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.तज्ज्ञांच्यामते या काळात आपल्या मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. मुलांच्या डोळ्यांचं नुकसान होण्यापासून वाचवायचं असेल तर, कोणत्या विशेष कराव्यात हे जाणून घेऊया. डोळ्यांची तपासणी डोळ्यांचा कोणताही त्रास होत नसेल तरी, वर्षातून एकदातरी डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. मुलांचे डोळे दरवर्षी तपासले पाहिजेत. दरवर्षी डोळे तपासल्याने कोणतीही समस्या लवकर लक्षात येते. शिवाय डोळ्यांची दृष्टी बराच काळ चांगली राहते. ( जोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम ) मोकळ्या वातावरणात जा कोरोनामुळे मुलांना बाहेर खेळ्यास परवानगी ​​नसली तरी, आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस कमीतकमी थोड्या वेळासाठी तरी त्यांना बाहेर न्या. शक्य असल्यास,आपल्या कारमधून बाहेर घेऊन जा आणि एखाद्या मोकळ्या टेकडीवर, पटांगणावर घेऊन जा, थोडं खेळू द्या. असं केल्याने,त्यांचे डोळं बराच काळ चांगले राहतील आणि त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकासही चांगला होईल. पौष्टिक फळे आणि भाज्या वाढत्या वयातील मुलांचा आहारात पौष्टिक असायला हवा. आहाराची काळजी घेतली तर मुलं निरोगी राहतात, त्यांची दृष्टी देखील चांगली रहाते. त्यांना दूध,मासे,अंडी,मांस,ड्रायफ्रुट,फळं,भाज्या खायला द्या. मुलांना सगळ्या भाज्या आणि फळं खायची सवय लावा. ( OMG! रोजच्या जेवणातली ‘ही’ भाजी भारतातली नाहीच; जाणून घ्या इतिहास ) स्क्रीन टाईम कमी करा मुलांचे डोळे नाजूक असतात. मुलाला डोळ्यांचा त्रास असेल तर, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसवर जास्त वेळ घालवणं त्याच्यासाठी खुपच हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे मुलांना थोड्याथोड्या वेळाने स्कीनवरून डोळे बाजूला घेण्याची सवय लावा. चष्म्याचा नियमित वापर जर मुलाला आधीच चष्मा लागलेला असेल तर, नियमितपणे लावणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे स्कीनकडे पाहताना डोळ्यांवर जास्त ताण येणार नाही आणि डोळे  खराब होणार नाहीत. ( कोरोनामुक्त झाल्यानंतर हिरड्या, नाकातून होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष नको ) आयड्रॉपचा वापर मुलांना डोळे दुखणं किंवा ताण येणं असा त्रास असेल तर, पालक अनेकदा मुलांच्या डोळ्यांत आयड्रॉप टाकतात. मात्र हे चुकीचं आहे. कोणताही आयड्रॉप वापरताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांचा व्यायाम डोळ्याचे व्यायाम नियमितपणे करणं खूप महत्वाचं आहे. मुलांना दररोज डोळ्यांच्या व्यायामाची सवय लावा. त्यामुळे मुलाचे डोळे नेहमी निरोगी राहतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात