• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • लक्ष्मी कृपेसाठी हळदीचे काही उपाय आहेत फायद्याचे; घरात नांदेल सुखशांती

लक्ष्मी कृपेसाठी हळदीचे काही उपाय आहेत फायद्याचे; घरात नांदेल सुखशांती

हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.

हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.

रोजच्या जेवणात वापरली जाणारी हळद (Turmeric) ज्योतिष शास्त्रानुसार आणि धार्मिकदृष्ट्या (Astrology) देखील महत्त्वा आहे. हळदीच्या पिवळ्या रंगाचा संबंध गुरु ग्रहाशी जोडला जातो.

 • Share this:
  दिल्ली,18 जून : भारतामध्ये परंपरांना ज्योतिष शास्त्रात (Astrology) अतिशय महत्त्व आहे. हळद आरोग्यासाठी गुणकारी (Health Benefits of turmeric) आहे तशीच अनेक धार्मिकविधींसाठी(Ritual)देखील वापरली जाते. लग्नामध्ये अंगाला हळद लावली जाते. पूजेसाठी देखील हळदीचा वापर केला जातो. सुवासिनीला हळदीकुंकू देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्याबरोबरच ज्योतिष शास्त्रातदेखील हळदीला महत्त्व आहे. हळदीचा संबंध गुरु (Jupiter)ग्रहाशी आहे. त्यामुळे गुरुची व्हावी असं वाटंत असेल तर, हळदीचे काही सोपे उपाय करता येऊ शकतात. प्रवेशद्वारावर लावा हळद प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही. उलट घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. घराच्या भिंतीवरही हळदीने शुभ चिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते. देव्हाऱ्यात हळदीचा वापर 1 ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्यावेळी देव्हाऱ्यामध्ये ठेवा. पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदेल. कोणतेही गृहक्लेश असतील तर ते निघून जातील. (पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात?; दोष तुमचा नाही, राशीचा आहे हा प्रभाव) अंघोळीच्या पाण्यात हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरु ग्रहाची कृपा होते. दररोज अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी. विवाहीत अडचणी येत असलेल्यांसाठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. विवाह जमत नसलेल्या मुला-मुलींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास लवकरच विवाह योग जुळून येतो. याशिवाय आपलं शरीर आणि मन देखील शुद्ध होतं. विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागत नसेल तर, हळदीचा वापर करा. यासाठी हळद उगाळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. याशिवाय अंघोळ झाल्यानंतर मुलांना हळदीचा टिळा लावावा. त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं आणि अभ्यासामध्येही प्रगती होते. (Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत) आरोग्यासाठी हळद आजच्या काळात जशी अभ्यासामधील स्पर्धा वाढलेली आहे. तशाच आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. यासाठी देखील हळदीचा उपाय करता येतो. आरोग्यासाठी पाण्यामध्ये हळद टाकून घेता येते किंवा दुधामध्ये हळद मिक्स करून प्यायल्यास आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: