दिल्ली, 21 सप्टेंबर : आपके हसीं पैर जमीं पर मत रखिये... हिंदी सिनेमातला डायलॉग असला तरी असे कोमल, मऊ, स्वच्छ पाय असणं सौंदर्याचंच नव्हे तर आरोग्यचं, स्वच्छतेचंही लक्षण आहे. अनेकांना पावसाळा (Rainy season infections) फार आवडतो. पहिल्या पावसात भिजण्यासाठी लोकांना फार मजा वाटत असते. पण कधीकधी आपल्याला पावसात भिजणं धोकादायक (Health Tips during Monsoon) ठरण्याची शक्यता असते. सतत पावसात भिजल्याने आपल्याला सर्दी, डोकेदुकी किंवा ताप यासारखे आजार (Foot Care Tips In Monsoon) होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला बाहेर फिरताना या गोष्टींची फार खबरदारी घ्यावी लागत असते. या दिवसात विषाणूजन्य आजारही वाढतात. व्हायरल इन्फेक्शनचा धोका असतो. त्याचबरोबर आपल्याला पावसाळ्यात आपले पायही (Foot infections) जपावे लागतात. सतत ओले राहिल्याने पावलांना (Foot Care Tips In Monsoon) इजा होऊ शकते. कधी कधी गंभीर आजारही या संसर्गाने होऊ शकतो.
पायांची काळजी घेणं हे आपल्या पायांच्या आरोग्यासाठी (Skin) फार गरजेचे आहे. कारण पाय सतत ओले राहत असल्याने त्यात आपल्याला खाज आणि त्रास होतो. त्यामुळे आपल्या कोमल पायांना कुरूपतेचं (Infection) ग्रहण लागते. त्यासाठी आपण बुट जरी वापरले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. कारण त्यात आधीच असलेली घामाची शक्यता आणि त्याता पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने आपल्याला पुन्हा त्याचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे अशा वेळी आपल्याला आपल्या पायांची काळजी घेण्यासाठी काय करायला हवे, याबाबत आपण काही माहिती जाणून घेणार आहोत.
Makeup And Sleep : तुम्हीही रात्री मेकअप न काढताच झोपता? त्वचेवर होतील हे गंभीर
बाहेरून आल्यानंतर आधी आपले पाय नीट स्वच्छ धूवून या. त्यानंतर ते स्वच्छ पुसून वाळवायला हवेत. पाय ओले राहिले तर हमखास चिखल्या होतात. कारण दमट हवा, चिखल आणि ओल्या चपला-बूट यामुळे बायांच्या बोटांमध्ये संसर्ग होतो. म्हणून पाय कोरडे ठेवावेत. त्यावर अॅंटीफंगल टॅल्कम पावडर लावावी. ती लावल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने वाळतील तेव्हाच पुन्हा चप्पल अथवा बुट घालावे. जेव्हा कधी आपण भरपावसात बाहेरून येतो तेव्हा आधी आपले पाय साबणाने चांगले धुवायला हवे. त्याचबरोबर त्याला चांगलं एखादं क्रीम लावावं.
रात्री झोप येत नाही? 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश आणि घ्या निवांत झोप!
त्यामुळे पावलं मऊ राहतात. पावसाळ्यात सातत्याने आपल्या पायांची काळजी घेण्यासाठी पायाची नखं काढत राहायला हवीत. कारण नखांमध्ये माती साचून संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी नखांची स्वच्छताही फार गरजेची आहे.
(Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Monsoon, Skin, Skin care