मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आर्टिफिशियल स्वीटनर वापरताना या चुका टाळा, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

आर्टिफिशियल स्वीटनर वापरताना या चुका टाळा, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

कृत्रिम गोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. मात्र त्याचेही अनेक तोटे आहेत आणि त्याचा वापर करताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती देणार आहोत.

कृत्रिम गोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. मात्र त्याचेही अनेक तोटे आहेत आणि त्याचा वापर करताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती देणार आहोत.

कृत्रिम गोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. मात्र त्याचेही अनेक तोटे आहेत आणि त्याचा वापर करताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 फेब्रुवारी : धावपळीच्या या जीवनात आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. काही लोक कृत्रिम स्वीटनर्सचा वापर समाविष्ट आहे. कृत्रिम स्वीटनर्स वजन कमी करण्यासाठी अधिक मदत करतात. कृत्रिम गोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. मात्र त्याचेही अनेक तोटे आहेत आणि त्याचा वापर करताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती देणार आहोत.

गेल्या काही काळात कृत्रिम स्वीटनरचा वापर झपाट्याने वाढला आहे. हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांचे मत आहे की कृत्रिम गोड जास्त प्रमाणात सेवन केल्यास मधुमेह, कॅन्सरसारखे आयुष्यभराचे आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया आर्टिफिशियल स्वीटनर वापरताना काय काळजी घ्यावी.

चाळिशीनंतर महिलांनी नक्की खावे हे पदार्थ, शरीर राहील Fit आणि Healthy

कृत्रिम स्वीटनर म्हणजे काय

विविध प्रकारचे पदार्थ आणि रसायने वापरून कृत्रिम स्वीटनर तयार केले जातात. त्यांची एक छोटी गोळी एका चमचे साखरेपेक्षा गोड असते. यावरून ते किती गोड असतात याचा तुम्हाला अंदाज येईल. ते अशा प्रकारे तयार केले जातात की आपल्या शरीरात 0 कॅलरीज राहतील. काही लोक हेल्थ एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय वापरण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कृत्रिम स्वीटनरचा प्रकार कोणता आहे ते पाहा

बाजारात अनेक प्रकारचे कृत्रिम स्वीटनर्स उपलब्ध आहेत. लोक त्याचा मोठ्या प्रमाणात वापरदेखील करतात. मात्र प्रत्येक स्वीटनर बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. त्यामुळे वेगवेगळे स्विनर्स वेगळंवेगळ्या पेयांसाठी वापरले जातात. काही स्वीटनर्स गरम पेयांसाठी तर काही थंड पेयांसाठी योग्य असतात. त्यामुळे ते तसेच वापरले गेले पाहिजे.

जास्त प्रमाणात कृत्रिम स्वीटनर्स वापरणे टाळा

वजन कमी करताना लोक कृत्रिम स्वीटनर्सचा वापर करतात. कारण यामध्ये कॅलरीजची संख्या खूप कमी असते. मात्र तरीदेखील याचे जास्त प्रमाणात सेवन करणे योग्य आहे असे नाही. कोणतेही स्वीटनर वापरा मात्र त्याचा जास्त प्रमाणात वापर करणे टाळा. स्वीटनरच्या पॅकेटवर किंवा बॉटलवरील लेबलवर दिलेल्या त्याच्या गोडपणा ओळखा आणि वापरा.

स्वतःहून स्वीटनर घ्यायला सुरुवात करणे

कोणतेही स्वीटनर वापरण्यापूर्वी तुमच्या आहारतज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तुम्हाला आधीच एखादा आजार, एखादा त्रास किंवा ऍलर्जी असल्यास स्वीटनर वापरण्यापूर्वी डॉक्टरांना विचारात घ्यावे. जेणेकरून तुमच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये.

Health Tips : व्हायरल ताप असल्यास घेऊ नका ताण; ठरू शकतं हार्ट अ‍ॅटॅकचं कारण!

योग्य स्वीटनर निवडा

हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, हल्ली बाजारात सिंथेटिक स्वीटनर्सदेखील उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे अनेक तोटे आहेत. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक स्वीटनर वापरा. मैसर्गिक स्वीटनर्स जसे की स्टीव्हिया. ते नैसर्गिक पद्धतीने बनवले जातात आणि त्यामुळे त्यांचे शरीरावर फार कमी दुष्परिणाम होतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle