मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Voter id card online apply: घरबसल्या असे बनवा तुमचे मतदान ओळखपत्र, Online च्या सर्व स्टेप जाणून घ्या

Voter id card online apply: घरबसल्या असे बनवा तुमचे मतदान ओळखपत्र, Online च्या सर्व स्टेप जाणून घ्या

voter id card online apply: भारतात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावतो येतो. मात्र, त्यासाठी आपल्या नावाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीत करणे गरजेचे असते. यासाठी आता Online पद्धतीनेही अर्ज करता येतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : भारतात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क (Voting) बजावतो येतो. मात्र, त्यासाठी आपल्या नावाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे (Election commission) मतदार यादीत करणे गरजेचे असते. मतदान करण्यासाठी सध्या तरी मतदार ओळखपत्र खूप गरजेचे आहे (Election). त्याशिवाय तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. नवीन मतदार ओळखपत्र कसे बनवायचे याविषयी आपण (Voter id card online apply) जाणून घेऊयात.

मतदार ओळखपत्र (voter id card online apply) आता ऑनलाईन पद्धतीनेही काढता येऊ शकते. 18 वर्षे पूर्ण केलेल्या देशातील कोणत्याही व्यक्तीला मतदार ओळखपत्र मिळू शकते. पण हे मतदान ओळखपत्र कसे बनवले जाते? मतदार ओळखपत्र नोंदणी कोठून केली जाते? यासाठी काय करावे लागेल? या सर्व प्रश्नांची माहिती आपण जाणून घेऊया. नवीन मतदान ओळखपत्र काढण्यासाठी आता कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही.

घरबसल्या मतदान ओळखपत्र काढण्याची पद्धत

1. ऑफलाइन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम फॉर्म 6 भरावा लागेल. बूथ लेव्हल ऑफिसर किंवा इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांच्या कार्यालयात तुम्हाला ते मोफत मिळेल. यानंतर, तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह (documents needed for voter id) तेथे सबमिट करता येईल किंवा ते पोस्टाद्वारे पाठवले जाऊ शकतात किंवा बूथ लेव्हल ऑफिसरकडे जमा करू शकता.

2. ऑनलाइन मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी (voter id registration) तुम्हाला प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) वर जावे लागेल. त्याचा वेब पत्ता www.nvsp.in किंवा www.voterportal.eci.gov.in/# आहे.

हे वाचा - Tulsi Tea Benefits: सकाळी उठल्यानंतर तुळशीचा चहा पिण्याचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

3. www.nvsp.in वर गेल्यानंतर तुम्हाला त्यात नोंदणी करावी लागेल. यानंतर, 'नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करा' वर क्लिक करा किंवा नवीन मतदार/मतदारवर क्लीक करा.

4. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, तुमची जन्मतारीख भरायची आहे.

5. फॉर्मवर सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला काही कागदपत्रे (documents needed for voter id) अपलोड करावी लागतील. अपलोड करण्याच्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळेल. याद्वारे तुमच्या जन्मतारखेची सत्यता पडताळली जाईल.

6. फॉर्म भरल्यानंतर आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर, तुम्ही सर्व स्टेप पूर्ण केल्यावर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

7. या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर मतदार ओळखपत्राची लिंक पाठवली जाईल. जो मेल आयडी तुम्ही फॉर्म भरता प्रविष्ट केला आहे त्यावर. येथून तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राच्या निर्मितीशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

8. वरील सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर आणि फॉर्म पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यात नवीन मतदान ओळखपत्र मिळेल.

First published:

Tags: Election, Voting, Voting awarness