मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चमत्कार! बर्फाखाली दबलेला हा प्राणी 24 हजार वर्षांनंतरही सापडला जिवंत

चमत्कार! बर्फाखाली दबलेला हा प्राणी 24 हजार वर्षांनंतरही सापडला जिवंत

सायबेरियात बर्फाखाली दबलेला सूक्ष्मजीव सापडला आहे. आश्चर्य म्हणजे हजारो वर्षांनंतरही तो जिवंत आहे.

सायबेरियात बर्फाखाली दबलेला सूक्ष्मजीव सापडला आहे. आश्चर्य म्हणजे हजारो वर्षांनंतरही तो जिवंत आहे.

सायबेरियात बर्फाखाली दबलेला सूक्ष्मजीव सापडला आहे. आश्चर्य म्हणजे हजारो वर्षांनंतरही तो जिवंत आहे.

मॉस्को, 9 जून: सायबेरियामध्ये (Siberia) नुकताच निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आढळला आहे. इथं गेल्या 24 हजार वर्षांपासून बर्फाखाली दबलेला एक सूक्ष्म जीव (Micro organism in Siberia found alive after 24000 years) पुन्हा जिवंत झाला आहे. बडेलॉईड रोटिफर (bdelloid rotifer) असं याचं नाव आहे. रशियन वैज्ञानिकांनी (Russian Scientist) दिलेल्या माहितीनुसार, हा जीव नुसताच पुन्हा जिवंत झाला नसून, त्यानं स्वतःचा क्लोनदेखील यशस्वीरित्या तयार केला आहे. करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

या अभ्यासाचे सहलेखक ए. स्टास मालविन यांनी एएफपीला सांगितलं की, या अभ्यासामुळे अनेक प्रश्नांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. हे बहुपेशीय प्राणी दिर्घकाळ जिवंत राहण्यासाठी विशिष्ट तंत्राचा वापर करतात. आजही बहुपेशीय प्राणी क्रिप्टोबायोसिस (Cryptobiosis) अवस्थेत हजारो वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात आणि आमचा अहवाल हा याचा पुरावा आहे. मेटाबॉलिजम पुर्णतः बंद करण्याच्या स्थितीला क्रिप्टोबायोसिस अवस्था असं म्हणतात. याबाबत रशियातील सायको केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉब्लेम्स इन सॉईल सायन्स इन्स्टिट्युटने संशोधन केले असल्याचे मालविन यांनी सांगितले.

रशियन आर्क्टिकमधून घेतले गेले नमुने

या संशोधन पथकाने महाकाय ड्रिल मशीनच्या (Drill Machine) सहाय्याने रशियन आर्क्टिकमधील (Russian Arctic) अलाजेया नदीजवळून यासाठी नमुने गोळा केले. यानंतर रेडीओकार्बन डेटींगच्या माध्यमातून या प्राण्याच्या वयाचे अनुमान लावण्यात आले. यानुसार या प्राण्याचे वय 23,960 ते 24,485 वर्षांदरम्यान आहे. यापूर्वी अशाच पध्दतीने एकपेशीय सूक्ष्म जंतूंची ओळख पटवण्यात आली होती. बहुपेशीय जीवांविषयी बोलायचं झालं तर नेमॅटोड (Nematode Worm) नावाचा किडा 30,000 वर्षांनंतर पुन्हा जिवंत झाल्याचे वृत्त आहे. या व्यतरिक्त शेवाळ आणि वनस्पती ज्या बर्फाखाली हजारो वर्षांपासून गाडल्या गेल्या होत्या, त्या आता पुन्हा वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

तरुण लेखकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; 3 लाखांची स्कॉलरशिप जाहीर

एक यादी असून त्यात अशा जीवांचा समावेश आहे की जे अनिश्चित काळापर्यंत जिवंत राहू शकतात. या यादीत आता रोटिफरचे नाव समाविष्ट झाले आहे. हा जीव पुन्हा जिवंत झाल्यावर कोणत्याही मदतीशिवाय प्रजनन करण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले, हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या प्रक्रियेला पार्थोनोजेनेसिस असं म्हणतात. रोटिफरची लांबी अर्धा मिलीमीटर असून सर्वसाधारणपणे त्याचे वास्तव्य स्वच्छ पाण्याच्या आसपास असते.

स्वस्तात मस्त थायलॅंडची ट्रिप; 72 रुपयात होईल रहायची सोय

या जीवाचे नाव हे लॅटीन भाषेतून घेतले गेले आहे. या नावाचा वापर व्हिल बियरसाठी केला जातो. हा प्राणी फिरत्या चाकासारखा सारखा दिसतो. ते गोल गोल फिरुन अन्न खातात. मालविन यांनी सांगितले की, या जीवाचा उपयोग आम्हाला बर्फात दडलेल्या अन्य जीवांच्या अभ्यासासाठी होत आहे. या माध्यमातून अन्य जीवांशीदेखील तुलना केली जाऊ शकते.

 

First published:

Tags: Science