दिल्ली, 8 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Nrendra Modi) यांनी देशातल्या तरुण लेखकांना (Writer) प्रोत्साहन देण्यासाठी ‘YUVA: Prime Minister’s योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांमधील लेखनशैलीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे.ट्विटरवरून (Twitter) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा करताना. “ देशातल्या तरुणांना आता नवीन संधी मिळणार असून, तुमच्या कौशल्याने देशाच्या प्रगतीला हातभार लागणार' असल्याचं म्हटलं आहे. प्रसिद्ध लेखक होण्याची संधी असं आवाहन करण्यात आलं आहे.
देशातल्या नवख्या तरूण लेखकांसाठी ही योजना आहे. देशभरातले 30 वर्षाखालील नवीन लेखकांना त्यांच्या ध्येय्यापर्यंत नेण्यासाठी ही योजना मदत करेल, त्यामुळे आपल्या वेगवेलळ्या प्रोजेक्टच्या माध्यनातून लेखाकांना जागतिक पातळीवर पोहचता येईल, त्याशिवाय भारतीय संस्कृती आणि भाषांच्या अमुल्या ठेव्याचाही अभ्यास करता येईल.
कोणाची निवड होणार?
सुरवातीला देशभरातून 75 लेखकांची यासाठी निवड केली जाईल.
NTB कडून स्थापन करण्यात आलेल्या कमिटीकडून त्यांची निवड करण्यात येईल.
यासाठी 4 जून ते 31 जूलै 2021 पर्यंत एक स्पर्धा घेण्यात येणार आहे.
त्यासाठी निवड झालेल्या स्पर्धकांना 5000 पानांचं लेखन सादर करावं लागणार आहे. ज्याचं पुढे पुस्तक तयार करण्यात येणार आहे.
Here is an interesting opportunity for youngsters to harness their writing skills and also contribute to India's intellectual discourse. Know more... https://t.co/SNfJr7FJ0V pic.twitter.com/rKlGDeU39U
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2021
15 ऑगस्ट 2021ला निवड झालेल्या लेखकाच्या नावाची घोषणा होणार आहे.
नियमांनुसार निवडलेलं लेखक कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निवडीसाठी हस्तलिखीतं तयार करतील.
त्यानंतर 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्यादिनी विजेत्या लेखकाचं साहित्य प्रकाशित केलं जाईल.
12 जानेवारी 2021ला युवा दिवस म्हणजेच ‘नॅश्नल युथ डे’ला या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
पहिला टप्पा- 3 महिन्यांचं ट्रेनिंग
नॅशनल बुक ट्रस्ट (NTB) विजेत्यांसाठी 2 आठवड्यांचं ऑनलाईन ट्रेनिंग आयोजित करणार आहे,.
NTB च्या दोन लेखकांकडून नव्या लेखकांना ट्रेनिंग दिलं जाईल.
NTB कडून दोन आडवड्याच्या ऑनलाईन प्रशिक्षणानंतर आणखीन 2 आठवडे ऑनलाईन आणि विविध साईटवरूनही प्रशिक्षण दिलं जाईल.
(डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन)
दुसरा टप्पा - 3 महिन्यांचं ट्रेनिंग
साहित्य महोत्सव,पुस्तक मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तरुण लेखकांना सहभागी होता येईल. त्यामुळे त्यांचा कौशल्य विकास होईल.
त्यानंतर लेखकाला शिष्यवृत्ती म्हणून दरमहा 50,000 रुपये 6 महिन्यासाठी म्हणजेच 3 लाख रुपये देण्यात येतील.
(बहिरं बनवतोय कोरोनाव्हायरस; नाक, जिभेनंतर आता कानांवरही गंभीर दुष्परिणाम)
याचं कार्यक्रमाचा भाग म्हणून युवा लेखकांनी लिहिलेलं पुस्तक किंवा पुस्तकांची मालिका एनबीटी,भारत प्रकाशित करेल.मेंटर्सशिप प्रोग्रामच्या शेवटी लेखकांच्या पुस्तकांच्या यशस्वी प्रकाशनांवर 10% रॉयल्टी दिली जाईल.त्यांची प्रकाशित पुस्तकं इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केली जातील,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi