मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जाणून घ्या शुक्र प्रदोष व्रताची कथा आणि महत्व; भगवान शिवाचा राहतो नेहमी वरदहस्त

जाणून घ्या शुक्र प्रदोष व्रताची कथा आणि महत्व; भगवान शिवाचा राहतो नेहमी वरदहस्त

महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं आणि शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा केली जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून शुक्र प्रदोष व्रताची कथा (Shukra Pradosh Vrat) जाणून घेतली आहे.

महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं आणि शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा केली जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून शुक्र प्रदोष व्रताची कथा (Shukra Pradosh Vrat) जाणून घेतली आहे.

महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं आणि शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा केली जाते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून शुक्र प्रदोष व्रताची कथा (Shukra Pradosh Vrat) जाणून घेतली आहे.

मुंबई, 13 मे : वैशाख महिन्यातील शुक्र प्रदोष व्रत आज 13 मे (शुक्रवारी) आहे. मे महिन्यातील हा पहिला प्रदोष व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं आणि शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा केली जाते. भगवान शिवाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं. शुक्र प्रदोष व्रत केल्यानं वैवाहिक जीवन सुखी होतं, समस्या दूर होतात. प्रदोष व्रत केल्याने धन, अन्नधान्य, पुत्र, आरोग्य आदी मिळतं. शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी उपवास कथा-पाठ करावी. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून शुक्र प्रदोष व्रताची कथा (Shukra Pradosh Vrat) जाणून घेतली आहे.

शुक्र प्रदोष व्रत कथा -

एका गावात 3 मित्र राहत होते. एक राजकुमार, एक ब्राह्मणकुमार आणि एक श्रीमंत कुमार होता. राजकुमार आणि ब्राह्मण कुमार यांचा विवाह झाला होता, तर धनिक कुमारचा विवाह झालेला नव्हता. एके दिवशी तिन्ही मित्र महिलांबद्दल बोलत होते. एकाने सांगितले की, बाईशिवाय घर हे भुताच्या गुहेसारखे आहे. धनिक कुमार याने ते ऐकले आणि ताबडतोब लग्न करून पत्नीला घरी आणण्याचा निर्णय घेतला.

त्याने आपल्या पालकांना ताबडतोब लग्न करण्याविषयी सांगितले. मात्र, पालकांनी समजावले की, शुक्रदेव अजूनही अस्तामध्ये आहेत, अशा स्थितीत लग्न करणे शुभ नाही, पण धनिक कुमारला ते मान्य झाले नाही आणि तो सासरच्या घरी पोहोचला. तिथेही लोकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला.

हे वाचा - जांभूळ खाऊन बिया फेकू नका; रक्तातील साखर नियंत्रणावर असा होतो उपयोग

हे पाहून मुलीच्या पालकांनी त्यांचा विवाह करून जावयासोबत मुलीला निरोप दिला. बैलगाडीतून शहराबाहेर येताच बैलगाडीचे एक चाक तुटले आणि बैलांचा एक पायही तुटला. धनिक कुमार आणि त्यांच्या पत्नीलाही दुखापत झाली, पण ते चालतच राहिले.

काही अंतर गेल्यावर डाकूंनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे सर्व काही लुटून नेलं. दोघेही घरी पोहोचताच तोपर्यंत धनिक कुमारला तेथे साप चावला. वैद्य यांनी त्यांची अवस्था पाहून 3 दिवसात मृत्यू होणार असल्याचे सांगितले.

हे वाचा - या राशींवर शनीची साडेसाती झालेली आहे सुरू; त्रास होतील, जपून करा व्यवहार

ब्राह्मण कुमारला याची माहिती मिळाली, मग तो आपल्या मित्राकडे पोहोचला आणि त्याच्या आई-वडिलांना शुक्र प्रदोष व्रत ठेवण्यास सांगितले आणि धनिक पुत्राला पत्नीसह त्याच्या सासरच्या घरी पाठवण्याची सूचना केली. धनिक कुमारने सूचना मान्य करून त्यानुसार सासरच्या घरी पोहोचले. शुक्र प्रदोष व्रत पद्धतशीरपणे केले गेले. शिवाच्या कृपेने त्याची प्रकृती चांगली होऊ लागली आणि सर्व त्रासही दूर झाला. त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आली.

अशाप्रकारे जो शुक्र प्रदोष व्रत करून कथा पाठ करतो त्याचे दुःख दूर होतात. जीवन आनंदी होते. सुख आणि सौभाग्य वाढते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक संदर्भातील आणि संबंधित ज्योतिषी यांनी दिलेली आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Shivjayanti