मराठी बातम्या /बातम्या /Viral /

80/20 चा नियम वापरून महिलेनं वयाच्या सत्तरीत कमी केलं 50 किलो वजन; काय आहे हा रूल?

80/20 चा नियम वापरून महिलेनं वयाच्या सत्तरीत कमी केलं 50 किलो वजन; काय आहे हा रूल?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लठ्ठपणाच्या समस्येमुळे डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, किडनीचे आजार, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक अशा अनेक आजारांचा धोकाही वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या जास्त असल्याचं चित्र आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 02 डिसेंबर : धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकांचं आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून लठ्ठपणाच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लठ्ठपणाच्या समस्येमुळे डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, किडनीचे आजार, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक अशा अनेक आजारांचा धोकाही वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या जास्त असल्याचं चित्र आहे. कारण, गरोदरपणात अनेक महिलांचं वजन वाढतं.

प्रसूतीनंतर डॉक्टर लगेचच हे अतिरिक्त वजन कमी करण्याचा सल्लाही देतात. पण, अनेकजणी बाळाच्या संगोपनात आणि घरातील जबाबदाऱ्यांमध्ये एवढ्या व्यस्त होतात की, त्या स्वत:च्या जीवनशैलीकडे लक्ष देत नाहीत. परिमाणी, त्यांचं वाढलेलं वजन कमी होण्याऐवजी आणखी वाढतच जातं.नंतर वय वाढत गेल्यावर शारीरिक हालचाली कमी झाल्यानेही वजन वाढतं. डेबी रोझ नाावच्या महिलेबाबत असंच घडलं. मात्र, डेबी यांनी धीर सोडला नाही. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर वयाच्या सत्तरीमध्ये डेबी रोझ यांनी आपलं 50 किलो वजन कमी केलं आहे. यासाठी त्यांनी '80/20' या नियमाचं पालन केलं. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रोज बटाटे खाऊनही वजन होऊ शकतं कमी; संशोधकांचा दावा

वजन कमी करण्यासाठी 80/20 नियम काय आहे?

वजन कमी करण्याचा 80/20 नियम आजकाल खूप लोकप्रिय झाला आहे. यामध्ये तुमच्या आहारात 80 टक्के धान्य, फळं आणि भाज्या यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असतो. या शिवाय पाणी, ज्युस आणि हेल्दी ड्रिंक्सचाही यात समावेश केला जातो. तर, उर्वरित 20 टक्के आहारामध्ये संबंधित व्यक्ती त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकते. पण, हे पदार्थदेखील निरोगी आणि कमी चरबीयुक्त असले पाहिजेत. आहाराच्या या नियमामुळे, निरोगी आणि कमी-कॅलरीचे पदार्थ व्यक्तीच्या शरीरात जातात. त्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. लवकरातलवकर वजन कमी करण्यासाठी आहाराच्या नियमासोबतच व्यायामदेखील केला पाहिजे.

डेबी रोझच्याबाबतीत काय घडलं?

पहिल्या गर्भधारणेपासून डेबी रोझ यांचं वजन वाढू लागलं. दुसऱ्या बाळाच्या जन्माच्यावेळी त्यात आणखी भर पडली. त्यामुळे डेबी यांना लठ्ठपणाचा सामना करावा लागला. एका शोदरम्यान त्यांनी सांगितलं, "लठ्ठपणामुळे मला अनेक आजार झाले. माझ्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. मी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर मी जवळपास पाच वर्षे घरातच राहिले. सतत घरात बसून राहिल्यामुळे मला दोनदा गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली." 2001मध्ये डेबी यांचं वजन 157 किलो झालं होतं. यानंतर त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सुमारे 80 किलो वजन कमी केलं होतं. 2010 पर्यंत वजन नियंत्रणात राहिलं. पण, एका अपघातामुळे पुन्हा वजन वाढलं.

पार्किंगमध्ये स्वत:च्या कारमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असताना डेबी यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. घाबरलेल्या डेबींनी गाडी रिव्हर्स घेऊन पळवायला सुरुवात केली. जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हल्लेखोराच्या अंगावरून गाडी घातली. याबाबत बोलताना डेबी सांगतात, "या घटनेनं मला खूप भीती वाटली. मी घराबाहेरही जात नव्हते. त्यामुळे माझं वजन पुन्हा वाढू लागलं. मला नैराश्यानं घेरलं होतं. तणावाखाली आणि दडपणाखाली मी जास्त खाऊ लागले. पाच वर्षांनंतर माझं वजन पुन्हा 135 किलो झालं. मी अनेक ऑनलाइन साइट्सवरून फिटनेसचं प्रशिक्षणही घेतलं. पण, त्याचा विशेष फायदा झाला नाही."

First published:

Tags: Weight loss