मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : हायमेन ब्रेक करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

Sexual Wellness : हायमेन ब्रेक करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

हायमेन (Hymen) ब्रेक करण्याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे.

हायमेन (Hymen) ब्रेक करण्याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे.

हायमेन (Hymen) ब्रेक करण्याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे.

प्रश्न : योनिपटलाचा (Hymen) भंग करण्यासाठी कोणता सर्वोत्तम मार्ग आहे?

उत्तर : हायमेन (Hymen) अर्थात योनिपटलाचा भंग करण्यासाठी सर्वोत्तम असा काही मार्ग सांगता येणार नाही. कारण हायमेन म्हणजे काही एखाद्या फर्निचरचा तुकडा नव्हे, की जो एखादं विशिष्ट तंत्र वापरून तोडता येऊ शकेल. सांस्कृतिकदृष्ट्या कौमार्याला (Virginity) प्रमाणाबाहेर महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्याचा संबंध योनिपटलाचा भंग होण्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा लैंगिक संबंध (First Intercourse) ठेवण्यापूर्वी पत्नीचा कौमार्यभंग झालेला नसावा, अशी अनेक पुरुषांची इच्छा असते. जणू काही योनिपटल फाटण्याची क्रिया अनुभवण्यातच त्यांचा आनंद दडलेला असतो.

योनिपटलाचा भंग झालेला नसणं हे भारतीय समाजात कौमार्याचं लक्षण (Virginity) मानलं जातं. सगळ्या व्हर्जिन स्त्रियांमध्ये योनिपटलाचा भंग झालेला नसतो, असं समजलं जातं. त्यामुळे व्हर्जिनिटी ही वैद्यकीयपेक्षाही सामाजिकदृष्ट्या तयार करण्यात आलेली संकल्पना आहे. संबंधित स्त्रीने संभोग (Sex) केला आहे की नाही, म्हणजेच ती व्हर्जिन आहे की नाही, याचा हायमेनच्या असण्या-नसण्याशी काहीही संबंध नाही, हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे.

संभोगादरम्यान लिंगाचा (Penis) योनीमध्ये (Vagina) प्रवेश होणं किंवा ओरल सेक्स (Oral Sex) किंवा बोटाने उद्दीपित करणं या कृतींमुळे हायमेन फाटू शकतं. तसंच ते घोडेस्वारी, नृत्य, झाडावर चढणं, जिम्नॅस्टिक्स, व्यायाम अशा शारीरिक क्रियांमुळेही फाटू शकतं. दुसरी गोष्ट अशी, की एखाद्या वेळी संभोगादरम्यानही हायमेन न फाटता अबाधित राहू शकतं.

हे वाचा - Sexual Wellness : हस्तमैथुन करण्याची काही विशिष्ट वेळ असते का?

असं समजलं जातं, की पहिल्या संभोगादरम्यान हायमेनचा भंग होतो आणि रक्तस्राव होतो. पण हायमेन म्हणजे योनीद्वार संपूर्णपणे झाकणारा पडदा नव्हे. हायमेन म्हणजे योनीचं बाह्यद्वार काही अंशी झाकणारा किंवा त्याभोवती असलेला बुळबुळीत ऊतींचा (Mucosal Tissues) एक पातळ तुकडा असतो. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी त्यातून रक्त बाहेर पाठवलं जातं. काही स्त्रियांच्या शरीरात हायमेन अस्तित्वातच नसतं. तसंच काही स्त्रियांच्या शरीरातली ती ऊती संबंधित स्त्रीने संभोगाचा अनुभव घेण्याच्या आधीच पडून गेलेली असते.

हायमेन आणि व्हजायना यांचं स्वतंत्र अस्तित्व दाखवणं अशक्य आहे. संभोगाच्या वेळी स्त्रीच्या शरीरात होणारे बदल पुरुषाच्या शरीरातल्या बदलांपेक्षा वेगळे असतात. संभोगाच्या आधी कामक्रीडा करणं आणि योनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण करणं आवश्यक असतं. चुंबन घेणं, मिठी मारणं, स्त्रीच्या शरीरातली उद्दीपन केंद्रं उद्दीपित करणं हे संभोगाचा आनंद घेण्याचे टप्पे आहेत.

हे वाचा - Sexual wellness : लैंगिक संबंध ठेवताना ऐनवेळी येतात अडचणी, कसा काढणार मार्ग?

प्रत्यक्ष संभोग अर्थात योनीमध्ये लिंगाचा प्रवेश ही गोष्ट अनेक कारणांमुळे वेदनादायी होऊ शकते. संभोगाआधी कामक्रीडा (Foreplay) न करणं किंवा एकमेकांच्या मर्यादा काय आहेत, हे जाणून न घेता थेट संभोग करणं आदी बाबींमुळे योनीला/लिंगाला जखमही होऊ शकते. संभोगापूर्वी योनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला नसेल, तिथे UTI इन्फेक्शन असेल किंवा लॅटेक्स कंडोमची त्या स्त्रीला अॅलर्जी असेल, तर संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात.

तुमच्या जोडीदाराला पहिल्या संभोगावेळी योनिपटल फाटल्यामुळे वेदना होतील, अशी काळजी तुम्हाला वाटत असेल, तर तिला संभोगाआधी बोटाने हस्तमैथुन (Penetrative Masturbation) करण्यास सांगा. त्यामुळे योनिपटल फाटण्याची शक्यता कमी होईल. तसंच योनी आणि लिंगाभोवती पाणी असलेली ल्युब्रिकंट्स भरपूर प्रमाणात लावा. लिंगाचा योनिप्रवेश हळुवारपणे पुढे-मागे करत करावा. संभोगात घाई-घाई करू नये. तुमचा मूड तयार करा. तुम्ही भावनिकदृष्ट्या तयार आहात आणि उद्दीपित झालेला आहात, याची खात्री करा. तुम्हाला संभोग करताना काय वाटतं आहे, याबद्दल आपल्या जोडीदाराशी संवाद साधणं यामुळेदेखील गोष्टी सोप्या होऊ शकतील.

हे वाचा - मिठी मारणं ही लैंगिक प्रवृत्ती असते का?

संभोग झाल्यानंतर तुम्ही एका कापडात थोडा बर्फ ठेवून ते तुमच्या योनीजवळ ठेवू शकता किंवा गरम पाण्यात बसू शकता. संभोगादरम्यान दुखत असेल, तर वेदना थांबेपर्यंत संभोग करू नये. संभोगानंतर खूपच रक्तस्राव होत असेल आणि/किंवा दुखत असेल आणि हे असंच सुरू राहिलं, तर स्त्रीरोगतज्ज्ञाचा (Gynaecologist) सल्ला घ्यावा.

First published:
top videos

    Tags: Sexual wellness