प्रश्न : हस्तमैथुन हे केवळ सकाळी, दिवसा किंवा रात्रीच करू शकतो का? मी दिवसभरात अनेकदा हस्तमैथुन करतो, हे योग्य आहे का? उत्तर : हस्तमैथुन (masturbation) ही सामान्य आणि आरोग्यदायी लैंगिक क्रिया आहे. सर्व वयोगटातील लोक हस्तमैथून करतात. मुलं उत्सुकतेने आपल्या जननेंद्रियास स्पर्श करतात आणि आपल्या शरीराविषयी माहिती जाणून घेतात. आणि किशोरवयीन तसेच प्रौढ मुलं आनंद मिळवण्यासाठी या गोष्टी करतात. तुम्ही ही क्रिया दिवसभरात किती वेळा आणि केव्हा करावी, असे काही बंधन नाही. दिवसभरात कितीवेळा आणि केव्हा हस्तमैथून करावं, हे वेगवेगळ्या व्यक्तींवर अवलंबून असतं. दिवसातून 2 किंवा 3 वेळा, आठवड्यात एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा हस्तमैथून केलं जाऊ शकतं. हस्तमैथून केल्यानं वीर्य कमी होऊन वांझपणा येतो, जननेंद्रिय कमजोर होतं. लैंगिक इच्छा कमी होतात, मानसिक विकृती येते असे अनेक प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये हस्तमैथूनबाबत आहेत. हस्तमैथूनचे आरोग्यादृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळे लैगिंक निराशा संपुष्टात येते. चांगली झोप येते. मन आणि मेंदू तणावमुक्त राहतो. तसेच स्वाभिमान वाढतो. त्यामुळे बिनधास्त हस्तमैथून करावे. हे वाचा - Sexual Wellness : पुरुषांचं नाही पण त्यांच्या लिंगाचं आकर्षण, हे विचित्र आहे का? हस्तमैथून कितीवेळा करावे याबाबत काही नियम नाहीत. मोठ्या प्रमाणावर लैंगिक इच्छा निर्माण होणे ही सामान्य बाब आहे. एखाद्या व्यक्तीनं जोपर्यंत त्याच्या आरोग्यावर आणि संतुलित जीवनावर परिणाम होत नाही, कोणताही त्रास होत नाही तोपर्यंत हस्तमैथून करावं. उदाहरणार्थ, शाळेत जाणारी मुलं. काम करणारे, कुटुंब आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर याचा परिणाम होतो. समजा जर यामुळे तुम्ही कामावर जाऊ शकला नाहीत, घराबाहेर पडणंच बंद केलं, मित्रांना भेटणं, कुटुंबासमवेत वेळ घालवणं बंद केलं आणि घरातील बंद खोलीत केवळ हस्तमैथूनच करीत राहिले तर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच जर जास्त प्रमाणात हस्तमैथून केल्याने जननेंद्रियास वेदना होऊ लागतात, सतत घासले गेल्याने जखमा होण्याचीही शक्यता असते, यामुळे देखील समस्या निर्माण होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.