प्रश्न : मी आणि माझा जोडीदार एकमेकांवर प्रेम करतो. आमच्यात लैंगिक संबंध आहेत. परंतु, आम्ही सातत्याने असं करू शकत नाही. ऐनवेळी काही गोष्टी आमच्यामध्ये येतात आणि आम्ही वेगळ्या कामांमध्ये व्यग्र होऊन जातो. त्यामुळे आम्ही आमचं लैंगिक जीवन कसं सुधारावं?
उत्तर : तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून अधिकाधिक लैंगिक सुख हवं आहे, ही बाब चांगली आहे. चांगल्या लैंगिक जीवनासाठी अन्य कोणत्याही गोष्टींच्या तुलनेत इच्छा ही महत्वपूर्ण असते. तुमचा प्रश्न पाहता, तुम्ही दोघंही दुसरी कामं आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबून गेलेले आहात. त्यामुळे तुम्हा दोघांना एकमेकांजवळ येण्याची संधी मिळत नाही. तुम्हाला एकमेकांसाठी जितका वेळ मिळतो, जितकी ऊर्जा तुम्ही वाचवता येते, तिचा उपयोग तुम्ही जवळ येण्यासाठी वापरा, लैंगिक संबंधासाठी नको. अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमचं लक्ष विचलित करते, आणि लैंगिक जीवनावर परिणाम होऊ न देता तुम्ही ती करु शकता, याचा शोध घ्या.
याची सुरुवात तुम्ही एका छोट्या गोष्टीपासून करा. 15 मिनिटांचा वेळ एकमेकांसाठी राखीव ठेवा. यावेळेचा सदुपयोग एकमेकांना उत्तेजित करण्यासाठी करा. अनेकदा आपण काम करण्याच्या गडबडीत इतके गुंतून जातो की हे बंद करुन काही मिळवण्याच्या स्थितीत म्हणजेच शारिरीक आणि भावनात्मक पोषणसाठी आवश्यक स्थितीत येऊच शकत नाही. तुम्ही हळूहळू 15 मिनिटांवरुन ही वेळ 30 मिनिटांपर्यंत वाढवा. अनेक ज्या सवयींमध्ये आपण गुंतलेलो असतो, त्यातून बाहेर येण्यासाठी जास्त कालावधी गरजेचा असतो.
लक्ष विचलित होण्याची समस्या पाहता, त्यावर उत्तर शोधा.
सातत्याने सोशल मिडीयावर जाऊन तेथे काय सुरू आहे, हे जाणून घेताना कोणतीही अपराधीपणाची भावना ठेऊ नका. जेव्हा एखादी गोष्ट आपलं सारखं लक्ष विचलित करते, याचाच अर्थ त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपली भावना जोडलेली असते, आणि ती ऊर्जा मागत असते. अशी कामं करण्यासाठी आपल्यात अंतरिक तगमग असते.
जर तुम्ही या समस्येचा इलाज नाही केला, तर ती अधिकच मजबूत होत जाईल, आणि कालांतराने तुमच्यासाठी ती डोकेदुखी ठरुन अधिकच तुमचं लक्ष विचलित करेल. (लक्षात ठेवा की अनुभवाचं हेच वैशिष्ट असतं की तो तुमचं लक्ष त्याच्यावर केंद्रीत करु इच्छितो) एका क्षणासाठी असा विचार करा की, त्याला वाटेल तुम्ही त्याचाच विचार करताय आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यानंतर पुढे काही काळ त्याला टाळा.
या विकृतींच्या कार्यपध्दतीला तुम्ही नंतर केलं जाणार काम या फोल्डरमध्ये टाकून दिलं आहे, अशी कल्पना करा. त्यानंतर तुम्ही तुमचं लक्ष तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या उत्तेजनेवर केंद्रीत करा, की तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडे खेचण्यासाठी उत्तेजित करेल. शेवटी हीच गोष्ट तुम्हाला योग्य रुपात उत्तेजित करण्याचं एक साधन बनेल. यानंतरही तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल, तर तुम्ही समुपदेशकाची मदत घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.