प्रश्न : मिठी मारणं ही लैंगिक प्रवृत्ती असते का? एखाद्याला मिठी मारणं कधी टाळावं? एखादी व्यक्तीला मिठी मारल्यानंतर विचित्र वाटत नाही हे कसं ओळखावं?
उत्तर : मिठी मारणं किंवा आलिंगन देणं म्हणजे नेहमीच लैंगिक प्रवृत्ती असेल असं नाही. तुम्ही कुणाला, कसं आणि कोणत्या परिस्थितीत आलिंगन देता यावर ते अवलंबून असतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला अगदी जवळ घेत मिठी मारत असाल, त्या व्यक्तीच्या शरीरावर सर्वत्र आणि अयोग्य ठिकाणी स्पर्श करत असाल तर असं आलिंगन लैंगिक स्वरूपाचं असू शकतं. मिठी बराच काळ मारली असेल तर त्यातूनही त्या व्यक्तीकडून लैंगिक संकेत दिला गेला असल्याचं मानलं जाऊ शकतं.
यासाठी तुम्हाला शारीरिक संकेतांकडे लक्ष द्यावं लागेल. एखादं उत्स्फुर्त आलिंगनदेखील तुम्हाला थोडंसं विचित्र वाटू शकतं. आलिंगन हे लैंगिक प्रवृत्तीचं आहे की नाही, हे ओळखण्याचा तसा काही फॉर्म्युला नाही. मात्र ही बाब तुम्ही अनुभवातून समजून घेऊ शकता.
हे वाचा - Sexual Wellness : 'समलिंगी मित्रासोबत राहिल्याने मीसुद्धा तसाच होईन का?'
यासाठी सर्वांत सुरक्षित पद्धत म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसाल आणि आलिंगन दिल्यावर ती व्यक्ती कसा प्रतिसाद देईल हे माहीत नसेल तर त्याला फक्त एका बाजूनेच आलिंगन द्या. हे असं आलिंगन विनम्रतेचं प्रतीक असतं, तसंच ते सुरक्षितदेखील असतं. समोरची व्यक्ती तुमच्या अशा कृतीवर दोन्ही बाहू पसरवून आलिंगन देत असेल, तर तुम्हीदेखील त्याच पद्धतीने आलिंगन देऊ शकता. एखादी व्यक्ती तुम्हाला मिठी मारू इच्छित असेल आणि तुम्हाला मात्र तसं वाटत नसेल, तर केवळ हस्तांदोलन करू शकता किंवा खांद्यावर थाप मारू शकता. ही कृती मैत्रीपूर्ण समजली जाते.
हे वाचा - 'खचलेल्याला आधार दिल्यास तो आपल्यावर कायमस्वरूपी प्रेम करतो, हे किती खरं आहे?'
आलिंगन देताना तुम्हाला असुरक्षित वाटलं तर त्या व्यक्तीला तुम्ही हातानं हलकासा धक्का देऊ शकता. यातून त्या व्यक्तीला योग्य संदेश मिळेल आणि भविष्यात परत तो तुमच्याशी असं वर्तन करणार नाही. वैयक्तिक स्पेस जपण्याचा अधिकार तुम्हाला आहे. ही स्पेस ओलांडण्याचा अधिकार कुणाला द्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे. तुम्ही सावधगिरी बाळगल्यास लैंगिक प्रवृत्तीचं आणि सर्वसाधारण आलिंगन यातला फरक तुम्ही ओळखू शकता.