मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : 'आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण सेक्स लाइफ हवी तशी नाही'

Sexual Wellness : 'आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण सेक्स लाइफ हवी तशी नाही'

शारीरिक कमजोरी दूर करायची असेल तर खजूर आणि दूध नक्की प्यावं.

शारीरिक कमजोरी दूर करायची असेल तर खजूर आणि दूध नक्की प्यावं.

'एकमेकांना मिठ्या मारणं, चुंबन घेणं वगैरे झालं तरी आमच्यात तीन-चार वर्षे शरीरसंबंध झालेच नव्हते'

  प्रश्न : आम्ही नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करतो पण आमचं लैंगिक आयुष्य सक्रिय नाही. एकमेकांना मिठ्या मारणं, चुंबन घेणं वगैरे झालं तरी आमच्यात तीन-चार वर्षे शरीरसंबंध झालेच नव्हते. जेव्हा आम्ही मूल जन्माला घालायचं ठरवलं तेव्हाही आनंदापेक्षा त्यात गर्भधारणा होण्याचा उद्देश अधिक होता. त्यालाही खूप वेळ लागला. कारण माझं स्खलन उशिरा आणि कमी होत असे. आता आम्हाला तीन महिन्यांचा मुलगा आहे.आम्हा पती-पत्नीत शरीरसंबंध झाले त्याला आता एक वर्ष होऊन गेलं आहे. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पॉर्न पाहतो आणि हस्तमैथुन करतो. पण तरीही तीव्र इच्छा होते.

  उत्तर : संभोग/शरीरसंबंध (Sex) ही वैवाहिक आयुष्यातली (Married Life) सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. शारीरिक जवळीक (Physical Intimacy) आणि ऑरगॅझम(Orgasm) या गोष्टीही महत्त्वाच्या आहेतच. पण दीर्घकालीन नातेसंबंधांमध्ये शरीरसंबंधांचं महत्त्व मोठं आहे. विरुद्धलिंगी आणि एकाच जोडीदाराशी एकनिष्ठता असलेल्या विवाहात लैंगिक संबंध ही एकमेव गोष्ट पती-पत्नीच्या आणि अन्य कोणत्याही नात्यातला वेगळेपणा ठरते. लैंगिक संबंधांमुळे जोडीदाराच्या डोळ्यांत तुम्ही हवेसे वाटण्याची भावना पाहता येते. तसंच भांडणानंतर पुन्हा मैत्रीचे बंध जोडण्याचाही तो एक मार्ग असतो. तुमच्यात भांडणं झाली तरी त्यानंतरही तुम्ही एकत्रच आहात ही भावना लैंगिक संबंधांमुळे तुम्हाला बळ देऊ शकते.

  हे वाचा - Sexual Wellness : ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी काही उपाय आहे का?

  लैंगिक आयुष्यात सातत्य राखण्यात अनेक लोकांना समस्या येण्यातलं मुख्य कारण हे आहे की संभोगाची इच्छा होते असं अनेकांना वाटत असतं. एखादा विचार अचानक मनात चमकून जावा तशी संभोगाची इच्छा मनात येते, असं वाटत असतं. तुम्ही एखादं काम करत आहात त्या वेळी तुमचा जोडीदार तुमच्या डोळ्यांसमोर आला लगेच तुमच्या मनात लैंगिक विचार आले, लिंगात ताठरता आल्यासारखं वाटलं, शरीरात कसंतरी व्हायला लागलं आणि संभोगाची इच्छा मनात निर्माण झाली, याला स्पाँटानियस सेक्शुअल डिझायर (Spontaneous Desire)अर्थात उत्स्फूर्तपणे झालेली संभोगाची इच्छा असं म्हणतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असं घडत नाही.

  माध्यमं, चित्रपट, पॉर्न अशा सगळ्या ठिकाणी सेक्सच्या केवळ याच एका मॉडेलबद्दल सांगण्यात येतं. पण अनेक व्यक्तींमध्ये याच्या बरोबर नेमकी उलट क्रिया घडत असते. संभोगाआधीच्या कामक्रीडेतून (Foreplay) त्यांचं शरीर उद्दीपित झाल्याशिवाय त्यांच्या मनात संभोगाची इच्छाच होत नाही. याप्रकाराला रिस्पॉन्सिव्ह डिझायर (Responsive Desire) अर्थात प्रतिसादात्मक इच्छा असं म्हणतात. अशा प्रकारची इच्छा असणं यात काहीही वावगं नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या लैंगिक भावनाही वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. कदाचित तुमची जोडीदार रिस्पॉन्सिव्ह डिझायर या प्रकारातली असू शकते.

  हे वाचा - Sexual Wellness : कामक्रीडेदरम्यान काखेत चाटणं हे नॉर्मल आहे का?

  वीर्यस्खलन कमी होणं (Retarded Ejaculation) ही एक सर्वसाधारण वैद्यकीय स्थिती आहे. जेव्हा एखाद्या पुरुषाला लैंगिकदृष्ट्या उद्दीपित (Stimulated) होऊन वीर्यस्खलन होण्यासाठी 30 मिनिटांहून जास्त काळ लागतो, तेव्हा ते रिटार्डेड इज्यॅक्युलेशन असतं. काही वेळा काही व्यक्तींना वीर्यस्खलन होतच नाही. काही व्यक्तींमध्ये काही काळासाठी ही समस्या उद्भवू शकते, तर काही व्यक्तींसाठी ती आयुष्यभराची समस्या असते. मानसिक अशांतता, नातेसंबंधांमधला ताण, आरोग्याच्या गंभीर तक्रारी, लैंगिक संबंधांमध्ये रस नसणं आणि काही औषधांचा दुष्परिणाम आदी कारणांमुळे रिटार्डेड इज्यॅक्युलेशनची समस्या उद्भवू शकते.

  तुम्ही नियमितपणे हस्तमैथुन (Masturbation) करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एकट्याने ही कृती करताना तरी क्लायमॅक्सला (Climax) पोहोचण्यात तुम्हाला काहीही अडचण नाही. पण तुम्ही दोघांनी करताना तुम्हाला ती समस्या जाणवली. त्यामुळे ही परिस्थितीजन्य आणि जास्त करून तात्पुरती समस्या असावी. तुमच्या संभोगात सातत्य नसल्याने तसंच त्या वेळी येणाऱ्या ताणामुळे निर्माण होणारी ही तात्पुरती समस्या आहे की वारंवार येणारी समस्या आहे,हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यात सातत्य आणावं लागेल.

  हे वाचा - Sexual Wellness : 'बॉयफ्रेंड मला वाट्टेल ते बोलतो अशावेळी मी काय करावं?'

  लैंगिक संवादही (Sexual Communication) याबाबतीत महत्त्वाचा आहे. तुम्ही दोघंही एकमेकांच्या बाबतीत 'त्याला/तिला काहीच वाटत नाही' असा विचार करून कुंपणावर बसला आहात का, याचा एकदा शोध घ्या. तिला तशी भावना होत नसेल तर तिला अशा एखाद्या ठिकाणी न्या की तिला तसं काही वाटू शकेल. रिस्पॉन्सिव्ह डिझायर प्रकारातल्या व्यक्तींना एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे त्यांना आनंद घेण्यासाठी खुलेपणा लागतो. शरीरसंबंधांव्यतिरिक्त तिच्या शरीराच्या कोणत्या ठिकाणी स्पर्श केल्यावर आनंद मिळतो, हे शोधावं लागेल. स्पर्शसुखाची मोठी भूमिका असते. ज्या लग्नांमध्ये संभोगाची कमतरता असते, तिथे स्पर्शाचाहीअभाव जाणवतो.

  याशिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे आई बनल्यानंतर महिलांची संभोग इच्छा कमी होते. कारण जीवनशैली, शरीर, हॉर्मोन्स या सगळ्यात बदल झालेला असतो. अनेक महिला तर स्वतःला केवळ आईच्या भूमिकात पाहतात. कारण नवजात बालकाची काळजी घेण्यात त्यांचा इतका वेळ जातो, की त्या आपण स्त्री आहोत हे जणू विसरतातच. बाळाला दिल्या जात असलेल्या स्तनपानामुळे हॉर्मोनल बदलही घडून येत असतात. त्यामुळे महिलांच्या लैंगिक इच्छा कमी होत जातात.

  हे वाचा - Sexual wellness : ब्रेकअपनंतर नवं नातं जोडणं जड जातंय, काय करू?

  त्यामुळे बालसंगोपनात किंवा अन्य कामांत तिला मदत करा जेणेकरून तिला स्वतःवर लक्ष केंद्रीत करायला वेळ मिळू शकेल. मूल अगदी लहान असताना त्याला सांभाळून हे सगळं करणं अवघड आहे. पण तुमची जवळीक परत आणण्याची इच्छा दोघांनीही ठेवली पाहिजे. सेक्स कोच, सेक्स थेरपिस्ट यांच्याकडून प्रोफेशनल गायडन्सही घेऊ शकता. लक्षात ठेवा, इच्छेवरच निर्णय अवलंबून असतो.

  First published:
  top videos

   Tags: Sexual wellness