मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : 'बॉयफ्रेंड मला वाट्टेल ते बोलतो अशावेळी मी काय करावं?'

Sexual Wellness : 'बॉयफ्रेंड मला वाट्टेल ते बोलतो अशावेळी मी काय करावं?'

तिच्या पोस्टनंतर महिलांच्याही भरपूर कमेंट यायला लागल्या. बर्‍याचशा महिलांनी आपलं दुःख या ठिकाणी शेअर केलं आणि नवरा घरकामात मदत करत नसल्याचं सांगितलं.

तिच्या पोस्टनंतर महिलांच्याही भरपूर कमेंट यायला लागल्या. बर्‍याचशा महिलांनी आपलं दुःख या ठिकाणी शेअर केलं आणि नवरा घरकामात मदत करत नसल्याचं सांगितलं.

'तो अपशब्द वापरतो, मला अपमानास्पद वागणूक देतो'

प्रश्न : माझा बॉयफ्रेंड (Boyfriend) माझ्याशी वाईट शब्दात बोलत असेल तर त्याच्यावर ओरडणं आणि अस्वस्थ होणं हे ठीक आहे काय? 4 वर्षांपासून त्याला ही वाईट सवय लागली आहे. त्यामुळे दूर होऊन पुन्हा 5 महिन्यांपूर्वी आम्ही एकत्र आलो. सुरुवातीला तो चांगला वागत होता; पण आता तो पुन्हा मला त्रास देत असून, मला चिडायला भाग पाडत आहे. यावर मी काय करू शकते?

उत्तर : बर्‍याच कारणांमुळे एक जोडीदार आपल्या दुसऱ्या जोडीदाराचा उद्धार करणं आणि त्याच्यावर टीका करणं असं वागू शकतो. यामध्ये सन्मानाचा अभाव, असुरक्षित वाटणे आणि आपल्याला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करणं, नातेसंबंधात असमानता आणण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यांच्या समस्यांसाठी तुम्हाला दोषी ठरवणं आणि आपला राग, निराशा तुमच्यावर ओरडून व्यक्त करणं अशी अनेक कारणं असू शकतील.

स्त्रियांना दूषण देणारे,स्त्रीत्वाचा अपमान करणारे बिच किंवा स्लट असे शब्द वापरले जातात. बिच म्हणजे मादी कुत्रा अर्थात कुत्री होय. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्राच्या प्रोफेसर लॉरेल रिचर्डसन यांनी अनेकदा आपल्या निबंधामध्ये बिच अर्थात कुत्री हा शब्द वापरला आहे. यामागे जिच्यावर नियंत्रण मिळवलं आहे अशी स्त्री किंवा जिच्यावर वर्चस्व गाजवलं जातं अशी स्त्री म्हणजे बिच असा संदर्भ आहे. तुमचा जोडीदार अशा नकारात्मक संदर्भानं असा शब्द वापरत असेल तर त्याला तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा आहे किंवा तुमच्या नात्यात स्वतःला अधिक महत्त्वाची भूमिका ठेवायची आहे, असा अर्थ होतो. एखाद्याला दुय्यमपणे वागवण्यात किंवा कमी लेखण्यासाठी असे शब्द, भाषा वापरली जाते. अशावेळी काहीतरी प्रॉब्लेम आहे हे लक्षात घ्यावं.

हे वाचा - Sexual wellness:केवळ लैंगिक संबंधांसाठी वापर करणाऱ्या पुरुषांमध्ये रस असेल तर?

अशा वाईट शब्दांचा वापर करण्यामागे राग, नकारात्मक भावना, स्वतःला अकार्यक्षम समजणं, आत्मसन्मान कमी होत असणं त्याचबरोबर अपराधीपणा आणि भीतीची भावनादेखील असू शकते. तुम्हाला वाटत असेल तर यामुळे आपण चिडखोर होतो आहे तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने टोक गाठलं आहे आणि त्यावर आपण काहीही करू शकत नसल्याच्या हतबलतेने तुम्ही जेरीस आला आहात.

जेव्हा एखाद्या नातेसंबंधात आपल्याला आदर मिळत नाही असं वाटतं किंवा आपलं ऐकलं जात नाही असं वाटतं तेव्हा नैराश्य आणि चिडचिडेपणा येऊ शकतो. ही सर्वसामान्य प्रतिक्रिया आहे. मात्र असं दुबळं, विखारी नातं दीर्घकाळ जपण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक त्रासदायक होऊ शकतं. हे रोगट नात्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं थोडा काळ जोडीदारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा , त्या वेळी तुम्हाला कसं वाटतं आहे याचा अनुभव घ्या. कदाचित या नात्यातून दूर होण्याची ही योग्य वेळ असेल.

हे वाचा - पार्टनर चिट करतोय; एखादं डिव्हाइस वापरून पाळत ठेवणं योग्य आहे का?

आपल्या नात्यात जोडीदाराला काही मर्यादा घालताना त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगितलं की, तू मला शिव्याशाप देतोस ते मला मुळीच आवडत नाही. यामुळे माझा अनादर झाल्यासारखं मला वाटतं. तू हे असंच सुरू ठेवणार असशील तर आपल्या नात्याबाबत मला फेरविचार करावा लागेल. आपण चांगल्या दृढ नात्याच्या दिशेनं जात आहोत का याचा विचार करणं आवश्यक आहे. अन्यथा मला तुझ्यापासून दूर व्हावं लागेल.’ तर त्याचे परिणाम काहीही होतील पण तुम्ही हे निश्चित केलं पाहिजे की आपण जे म्हणतो आहे तसं वागणार आहोत का? तुम्ही स्वतःच बोलल्याप्रमाणे वागला नाहीत तर दुसऱ्याला त्याचं उल्लंघन करणं सहज सोपं जातं.

हे लक्षात घेतलं पाहिजे की जोडप्यांमध्ये होणारी भांडणं, वाद ही सगळीच अपमानास्पद नसतात. कधीकधी मूल्ये किंवा मनोवृत्तीच्या संघर्षामुळे वाद होतात. जोपर्यंत वाद, भांडणं नेहमीची ठराविक विषयांवरूनच होणारी अशी साचेबद्ध होत नाहीत तोपर्यंत नात्यात फूट पडत नाही. शांत होण्यासाठी वेळ मिळाला की चर्चेतून वाद मिटवण्यास ते दोघेही सक्षम असतात. एका जोडीदार नेहमीच दुसऱ्याला पंचिंग बॅग समजत असेल तर त्याचं नात कदाचित धोकादायक दिशेनं जात असतं. निरोगी वादविवादांनादेखील मर्यादा असतात; ते कधी विषारी किंवा व्यर्थ ठरू शकतात याचं भान बाळगणं आपल्या हाती असतं. जेव्हा दोघेही जोडीदार परस्परांविरुद्ध नाही तर अडचणीविरुद्ध उभे ठाकतात तेव्हाच कोणतंही नातं सुदृढ, घट्ट होतं, हे लक्षात घ्या.

First published:

Tags: Sexual wellness