प्रश्न - कामक्रीडेदरम्यान काखेत चाटणं (Licking Armpits) हे नॉर्मल आहे का?
उत्तर : काखेमध्ये चाटणं हे कॉमन असलं असतं, तर त्याबद्दलची अनावश्यक चिंता आपण टाळू शकलो असतो. तुमच्या काखेत चाटलं जाणं हा तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठीही अत्यंत आनंददायी लैंगिक सुखाचा (Sexual Pleasure) अनुभव असू शकतो. कारण काख हा शरीराचा असा भाग आहे, की जो चाटल्यानंतर, त्यावरून जीभ फिरवल्यानंतर उद्दीपित (Aroused) व्हायला होतं. काही जणांच्या बाबतीत जोडीदाराच्या शरीराचा गंध (Smell) हा लैंगिक इच्छा वाढवण्याचं काम करतो. तुम्ही सांगितलेल्या वर्णनावरून असं दिसतं आहे, की तुमच्या बॉयफ्रेंडच्या लैंगिक इच्छांना तुमच्या शरीराच्या गंधाने आणि तुमच्या काखेत चाटल्याने अधिक प्रोत्साहन मिळतं.
काखेत चाटणं यात काही वावगं नाही. अनेकांना त्यांच्या स्त्री जोडीदाराच्या काखेमध्ये चाटणं, चुंबन घेणं अशा क्रिया करायला आवडतात. आपल्या जोडीदाराच्या काखा कशा आहेत, त्या कशा दिसतात, त्या स्वच्छ आहेत, मुलायम आहेत की तिथे केस आहेत, अशा अनेक कल्पना पुरुषांच्या डोक्यात असतात. हे कितीही विचित्र वाटत असलं, तरीही ती नैसर्गिकरीत्या घडणारी गोष्ट आहे. त्याबद्दल लाज वाटण्याची काही गरज नाही. अनेक गोष्टी विचित्र वाटतात. त्याचं कारण त्या अनैसर्गिक असतात हे नव्हे, तर त्या कॉमन नसतात हे आहे.
हे ही वाचा-Sexual Wellness : हायमेन ब्रेक करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
सेक्सच्या बाबतीत तर ठराविक असा कोणताही नियम नसतो. एखादी गोष्टी तुम्ही आणि तुमचा जोडीदार अशा दोघांनाही पसंत पडत असेल, जमत असेल, तर तुम्ही फक्त त्याचा आनंद घ्यायचा. तुम्ही दोघांनीही एकमेकांच्या शरीरावरच्या अशा जागांचा शोध घेतला पाहिजे, की जिथे स्पर्श केल्यावर तुम्हाला लैंगिक संवेदना मिळतात. कान, ओठ, मान, गुडघ्याच्या पाठीमागे या अशा काही जागा सांगता येतील. लैंगिक आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर तुम्हाला पोहोचायचं असेल, तर केवळ स्तन आणि योनी यांच्या पलीकडेही काही शोधणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तेवढ्यातच समाधान मानत असाल, तर तुम्ही तुमच्या लैंगिक इच्छेला आणि लैंगिक आयुष्याला बंधन घालत आहात, असं समजा. तसं कोणालाही नको असतं.
तुम्हाला काखेतला घाम, त्याचा वास, तिथले केस यांचा त्रास वाटत असेल, तर तुमच्या डोक्यात चित्रपटांत किंवा पॉर्न मूव्हीजमधलं सेक्सचं पिक्चर पर्फेक्ट व्हर्जन दिसत असावं. कारण तिथे अगदी योनीसह (Genitals) शरीराच्या सगळ्या भागातले केस काढून ती शरीरं गुळगुळीत केलेली दिसतात. खऱ्या संभोगाची (Sex) व्याख्या कधीही एकाच वेळी सर्वांना लागू होऊ शकत नाही. संभोगाचा आनंद घेण्यासाठी त्या वेळी अनावश्यक ताण कमी करा आणि धाडस करून नवं काही तरी शोधण्याचा प्रयत्न करा. त्याचे परिणाम नक्कीच चांगले होतील. तरीही तुम्हाला त्या ठिकाणच्या केसांची अडचण होत असेल, तर तुम्ही कधीही रेझर घेऊन तो भाग गुळगुळीत करू शकता.
आपण नवं काही तरी शोधण्याचा प्रयत्न करण्याबद्दल बोलतो आहोत, तर अशा बाबतीत तुम्हीही पुढाकार घेऊ शकता आणि तुमच्या बॉयफ्रेंडच्या कृतींना तशाच कृतीतून उत्तर देऊ शकता. स्त्रियांनी संवेदनांतून आनंद दिला आणि त्यांना उद्दीपित केलं, तर पुरुषांना ते नक्कीच आवडतं. आणि या बाबतीत लाजेचं म्हणत असाल, तर ती तुम्ही सोडून द्या, संभोगादरम्यान जसे कपडे काढून टाकता, तशी... तेव्हाच उत्तम आनंद देणारं, उद्दीपित करणारं नवं काही तरी तातडीने तुमच्या दिशेने येईल. आफ्टरऑल, कार्डी बी तुमच्यासोबत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Sex, Sexual wellness, Wellness