प्रश्न : मी अजून नवी रिलेशनशिप (relationship) ठेवण्यासाठी तयार नाही. मी काय करावे?
उत्तर : तुम्ही तयार नसणं हे एका क्षणी ठिक आहे. पण तुम्ही तयार आहात की नाही हे सर्व तुमची शेवटची रिलेशनशिप कशी संपली आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला यावर अवलंबून आहे. जर तुमची शेवटची रिलेशनशिप तुमची इच्छा नसताना संपली असेल तर एखादा नवीन विचार करण्यासाठी, एखाद्या नव्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी किंवा डेटवर जाण्यापूर्वी थोडा वेळ घ्या. ज्या वेदना तुम्हाला झाल्या आहेत, त्या बऱ्या व्हायला हव्या. जेव्हा मागील गोष्टी सोडून नवीन प्रेमजीवन सुरू करण्याचा निर्णय घ्याल तेव्हा तुम्हाला पूर्ण मानसिक शांती प्राप्त झालेली असावी. पण याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असेल आणि तुम्ही एकमेकांच्या फायद्यासाठी ब्रेकअप केलं असेल तर तुम्ही चांगली गोष्ट केलेली आहे. तुम्हाला काय करायचं याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल.
हे वाचा - Sexual wellness:केवळ लैंगिक संबंधांसाठी वापर करणाऱ्या पुरुषांमध्ये रस असेल तर?
मी फक्त तुम्हाला असा सल्ला देऊ इच्छित आहे की तुम्ही काल रात्री उरलेले बटाटे नव्याने शिजवलेल्या भरलेल्या शिमला मिरचीत घालाल तेव्हा कदाचित तुम्हाला या अन्नाची चव चाखावीशी वाटणार नाही. अगदी तसंच यापूर्वीची रिलेशनशिप कशी संपली याची पर्वा न करता त्या नात्यातील उरलेले तुकडे आपण नव्या नात्यात घेतो. यामुळे भूतकाळ आणि वर्तमानाबाबत अनावश्यक तुलना उद्भवते. मागील संबंधांमध्ये अपूर्ण राहिलेल्या चुकीच्या अपेक्षा नव्या जोडीदाराकडून पूर्ण व्हाव्यात, अशी इच्छा तुमची होते. जर तुमचा स्वभाव चिंता करण्याचा असेल तर तुम्ही डेटींगमध्ये लवकर पडू शकता. कारण चिंता एखाद्या व्यक्तीच्या मज्जातंतूंवर परिणाम करू शकते. चिंताग्रस्त लोकांना अनेकदा एकट्यानेच आयुष्याचा सामना करणं कठीण जातं. त्यामुळे समान विचार आणि परस्पर भावना असलेल्या जोडीदाराच्या शोधासाठी हे नेहमीच पुढे असतात. ही सर्वात मोठी चूक करणं तुम्ही पहिलं थांबवलं पाहिजे. त्यासाठी भूतकाळातून तसंच चांगल्या आणि वाईट बाबींमधून बाहेर पडण्याकरता स्वतःला थोडा वेळ देणं आवश्यक आहे.
हे वाचा - Inter caste marriage : आंतरजातीय विवाहाविषयी तुमचं काय मत आहे?
माझ्या मते, जेव्हा पूर्वीच्या नात्यातून बाहेर पडता तेव्हा नव्या नात्यात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही स्वतःला निर्मळ केलं पाहिजे. तुम्ही स्वतःचे विचार स्थिर करण्यासाठी वेळ घेतला नाहीत आणि एकटेपणा आणि स्वतःतच आनंद शोधत राहिला तर मागील रिलेशनशिपचं ओझं पुन्हा नवीन रिलेशनशिपमध्ये घेऊन जाल. म्हणून दिवसातून 100 वेळा कोणी आपल्यावर प्रेम केलं हे कोणी न सांगता स्वतःला प्रतिबिंबित करण्यासाठी, बरं करण्यासाठी आणि स्वतःवर प्रेम करण्यासाठी थोडा वेळ घ्या. हे लक्षात घ्या, की त्या प्रेमाची स्वतःसाठीच अंमलबजावणी करा, यासाठी कोणतीही टाईमलाईन नाही. तसंच घाई करण्याची गरज नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual wellness