प्रश्न - माझ्या भावना मोकळ्या करण्याबाबत मला थोडे मार्गदर्शन हवे आहे. मी गेल्या वर्षभरापासून कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये आहे. या संकल्पनेची मला फारशी जाणीव नाही. मात्र आम्हाला दोघांना इतकच ठाऊक आहे की आपलं नातं फार गंभीर बनणार नाही, तसे सुरवातीलाच आम्ही दोघांनी स्पष्ट केले आहे. आमच्या नात्यातील सर्वांत मोठी गोष्टी म्हणजे परस्पर सहानुभूती आणि शारिरीक आत्मीयता होती. तिला आवडत नसल्याने आम्ही कधीही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न केला नाही. परंतु आम्ही काही रात्री एकत्र व्यतीत केल्या आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून सुमारे सात महिने आम्ही एकमेकांना भेटलो नाही. त्यानंतर मी तिला एकदा भेटायला गेलो होतो. त्यादरम्यान आम्ही थोडा वेळ एकत्र घालवला, पण त्यावेळी देखील तिने मला जवळ येऊ देणे टाळले. त्यावेळी मला असं वाटलं की, ती कामांमध्ये खूप व्यस्त असेल त्यामुळे तिने मला पुरेसा वेळ दिला नाही. परंतु, त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही भेटलो, बोललो त्यावेळी आमच्यामध्ये एकप्रकारची जवळीक होती. आज जेव्हा तिला सरप्राईज देण्यासाठी मी अचानक बेंगळुरूला आलो आणि तिच्यासोबत मला वेळ घालवता यावा यासाठी एक खोली बुक देखील केली. परंतु अचानकच मला हे योग्य वाटत नाही, असं सांगून कोणतंही स्पष्ट कारण न देता तिने माझा हा प्लॅन रद्द करायला लावला. आता हे एक अनौपचारिक असं नाते आहे. याचं मला दुःख वाटते. मी खूप असहाय्य फिल करीत आहे. मी तिच्याशी जवळीक साधण्यात अपयशी ठरलो आहे आणि मी तिला दुखावलं आहे का?
-----------------------------------------------------
तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून.
--------------------------------------------------------------------
उत्तर - मी तुमच्या दुःखात सहभागी असून सहानुभूती व्यक्त करते. मला असं वाटतं की दोन कारणांमुळे तुम्ही उदासीन आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे. परंतु, तसं होऊ शकलं नाही. या व्यतिरिक्त तुम्ही नातेसंबंधात जवळीक साधण्याची अपेक्षा बाळगता. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने तुम्हाला दुःख आणि असहाय झाल्यासारखे वाटले. ही बाब चुकीची अथवा वाईट नाही. ही समजून घेण्याची आणि नैसर्गिक बाब आहे. तुमचे दुःखही न्याय्य आहे.
"तो खूप उत्तेजित असतो पण मी लवकर थकते; SEX करताना त्याला साथ कशी देऊ?"
तुम्ही म्हणालात की तुमचे संबंध कॅज्युअल होतं. तसंच ते तुम्ही आणि तुमच्या पार्टनरच्या संमतीने होतं. मात्र नात्याला लावलेले हे लेबल तुमच्या दोघांच्या प्रत्यक्ष अपेक्षांपुढे फारसे महत्वाचे नाही. मात्र हे जर खरंच कॅज्युअल नाते असेल तर तुम्हाला दुःखी व निराश होण्याचा पूर्ण हक्क आहे. तिला लैंगिक संबंध नको असतील तर तिला दोष देण्यात अर्थ नाही. तिला कोणतेही कारण नसताना नाही म्हणण्याचा हक्क आहे. त्याबद्दल चांगले वाटत नाही हे कारण देखील योग्य आहे. तुम्ही तुमचे दुःख आणि असहायतेविषयी तिच्याशी बोलण्यास सुरुवात करा. कदाचित तिलाही भीती वाटली असेल, ती देखील निराश झाली असेल. तिला कदाचित दोघांमधली जवळीक हवी असेल परंतु, ती चिंता, भिती किंवा असुरक्षितता वाटली असेल. बहुतांश लोकांना त्यातही महिलांना सेक्स आणि जवळीक साधताना एक प्रकारची जबरदस्त भीती वाटते.
'मी 24 वर्षांचा असूनही सिंगल आहे, कधीतरी कुणी सोबत असावं असं वाटतं'
कॅज्युअल, गंभीर अशी अर्थपूर्ण लेबल्स आपण बनवतो. ते काही परिपूर्ण नियम नाहीत. जर तुमचे नाते कॅज्युअल आहे तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आपल्या भावनांबद्दल बोलायची परवानगी नाही. तुम्हीच सांगितले की परस्पर सहानुभूती ही आपल्या नात्यातील एक शक्ती आहे. आपल्या जोडीदाराशी संवाद साधा. तिच्या स्वःताच्या गरजा, भीती, चिंता याविषयी तिच्याशी बोला. तिला सहनुभूती दाखवा. तिला मनमोकळे होण्यासाठी प्रयत्न करा.
Sexual Wellness : "मला Casual Sex हवंय; पण तिच्या मनातलं कसं ओळखू?"
काही लोकांना वाटते की लैंगिक संबंध ही खूप जवळीक निर्माण करणारी कृती आहे. त्यासाठी खूप विश्वास आवश्यक असतो. परंतु, हा आपल्या नात्याचा निर्बंधात्मक स्वभाव असू शकतो. एकमेकांशी साधलेल्या संवादातून या नात्यातून आपल्याला काय हवं आहे, हे स्पष्ट होईल आणि त्यातून विश्वास व आपुलकी निर्माण होईल असं वाटतं.