Home /News /lifestyle /

Sexual Wellness: 'मी 24 वर्षांचा असूनही सिंगल आहे, कधीतरी कुणी सोबत असावं असं वाटतं'

Sexual Wellness: 'मी 24 वर्षांचा असूनही सिंगल आहे, कधीतरी कुणी सोबत असावं असं वाटतं'

'माझ्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असावी की जिच्या सोबत मी माझ्या भावना, विचार शेअर करू शकेन. पण....'

प्रश्न :  माझं वय 24 वर्षं असून मी अविवाहित आहेत. कधीतरी मला असं वाटतं, की माझ्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असावी की जिच्या सोबत मी माझ्या भावना, विचार शेअर करू शकेन. परंतु, त्यानंतर मला असं वाटतं की मी ज्या मार्गाने चाललो आहे तोच बरा आहे. पण कधीतरी या एकटेपणाचीही भीती वाटते. मी आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींशी या अनुषंगाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर त्यापैकी काही त्यांच्या आयुष्यात आनंदी होत्या आणि काहींनी माझ्यासोबत जवळीक साधण्यास नम्रपणे नकार दिला. हे चुकीचं आहे का? मी काय करू? ------------------------------------------------------------------- तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून. -------------------------------------------------------------------- आज जग किंवा समाजातील व्यक्ती आपला रोमॅंटिक किंवा लैंगिक जोडीदार शोधण्याला अधिक महत्त्व देतात. रोमॅंटिक जोडदाराशिवाय आपलं वैवाहिक जीवन व्यर्थ असल्याचा सूर नेहमीच आळवला जातो. त्यामुळे एकटेपणाने जीवन जगावं, कोणीही तुमची काळजी घेणारं नाही, ही बाब किती चुकीची आहे हे तुम्हाला सांगू शकत नाही. आपण समाजाचा एक भाग आहोत. कदाचित आपल्याला जोडीदार नसेल पण आपल्या सोबत आपले पालक, भाऊ, बहिणी, जवळचे मित्र, शेजारी, आपण जात असलेल्या योगा क्लासमधील लोक, आपले आवडते सहकारी आणि लोकांसमावेत तुम्ही जीवन जगत आहात. असे असताना रोमॅंटिक प्रेमाचा शोध घेण्यापेक्षा तुम्ही कौटुंबिक प्रेमाचा शोध घ्यावा. आपल्या आसपास असलेल्या व्यक्तींपैकी आपल्याला खरोखर आवडणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्या. त्यांच्या सोबत लैंगिक क्रिया करु शकत नाही म्हणजे त्याचा असाही अर्थ होत नाही की त्यांच्याकडून आपल्याला खरे प्रेम मिळणार नाही किंवा आपण आपल्या मनातील भावना त्यांच्यासोबत शेअर करु शकणार नाही. खरं तर जी व्यक्ती आपली रोमॅंटिक जोडीदार नसते, त्याच व्यक्तीला एक मित्र म्हणून आपल्या भावना खऱ्या अर्थाने समजू शकतात. तुमचे आजूबाजूचे लोक काहीतरी विलक्षण गोष्टी शोधण्यात व्यस्त असल्याने ही बाब तुम्हाला अधिक असुरक्षित वाटत असावी. आपल्या आजूबाजूला असलेली अनावश्यक गर्दी जरा बाजूला करा. डेटिंगच्या पलीकडेही असलेल्या विविध आवडींचा शोध घ्या. आनंदी जीवन जगण्याचे अनंत मार्ग आहेत. याव्यतरिक्त जेव्हा आपण डेटिंग करता, त्यावेळी आपण कम्फर्टेबल आहोत का हे तपासा. डेटिंग करण्यापुर्वी विचार करा. समोरच्या व्यक्ती आपल्याला खरोखर आवडते का याचाही विचार करा. ती व्यक्ती अविवाहित आहे का हे तपासा. पहिल्याच डेटला आनंद देणारी काही कामन योजना आपण आखू शकतो का याचा विचार करा. डेटींगच्यावेळी सभ्य वर्तन ठेवा. फोनवर संभाषण करण्यात किंवा गेम खेळण्यात वेळ घालवू नका. समोरच्या व्यक्तीला मनापासून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आवडी-निवडी, बालपण, भविष्यातील नियोजन आदींबाबत प्रश्न विचारा. स्वत:बाबतची माहिती संतुलितपणे सांगा. पुढील डेटचं नियोजन करा. जोपर्यंत दोघेही एकमेकांविषयी पूर्ण कम्फर्ट होत नाही तोपर्यंत कोणतीही जवळीक साधण्याचा प्रयत्न करु नका. कोणताही नकार पर्सनली घेऊ नका. अन्य लोकांची मते तुमची गुणवत्ता आणि मुल्ये यावर काहीही परिणाम करू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. तुमचे वय तसे कमीच आहे. तुमच्या वयोगटातील असे अनेकजण आहेत की ज्यांनी अजूनही लैंगिकदृष्ट्या कोणताही अनुभव घेतलेला नाही. आयुष्य खूप मोठे आहे आणि तुमच्यावर खरे प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला अजूनही भेटलेली नाही, ही बाब लक्षात ठेवा.
First published:

Tags: Relationship, Sexual wellness

पुढील बातम्या