मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : "मला Casual Sex हवंय; पण तिच्या मनातलं कसं ओळखू?"

Sexual Wellness : "मला Casual Sex हवंय; पण तिच्या मनातलं कसं ओळखू?"

"मला भीती वाटते की चुकून एखाद्या मुलीला मी विचारायचो आणि ती नाराज व्हायची आणि मैत्रीही तोडून टाकायची किंवा माझी तक्रार करायची"

"मला भीती वाटते की चुकून एखाद्या मुलीला मी विचारायचो आणि ती नाराज व्हायची आणि मैत्रीही तोडून टाकायची किंवा माझी तक्रार करायची"

"मला भीती वाटते की चुकून एखाद्या मुलीला मी विचारायचो आणि ती नाराज व्हायची आणि मैत्रीही तोडून टाकायची किंवा माझी तक्रार करायची"

प्रश्न : सध्या हूकअप किंवा वन नाइट स्टँड किंवा कॅज्युअल फिजिकल रिलेशनशिप हे फार कॉमन झालं आहे. पण आमच्या मैत्रिणींमधल्या कुठल्या मुलीची तशी इच्छा आहे हे कसं ओळखायचं हा माझा पेच आहे. याबाबत बोलू कसं कळत नाही. मला भीती वाटते की चुकून एखाद्या मुलीला मी विचारायचो आणि ती नाराज व्हायची आणि मैत्रीही तोडून टाकायची किंवा माझी तक्रार करायची. मी 35 वर्षांचा तरुण आहे. तू एक कोचपण आहेस त्यामुळे या पेचात सापडलो आहे, त्याबाबत मला तुझा सल्ला हवा आहे.

उत्तर : हूकअप किंवा कॅज्युल सेक्स करण्यामागे अनेक कारणं असतात. सध्या तर हूकअप संस्कृती भरपूर वाढली आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. पॉर्न, माध्यमांचा परिणाम, सहज तंत्रज्ञानाचा वापर, इतरांनी त्यांच्या विविध सेक्स पार्टनरची चर्चा केल्यावर त्यातून निर्माण होणारी इच्छा, स्वैर विचार जेणेकरून त्यांना आपली लैंगिकता वापरून पाहण्याची मुभा आहे, सेक्स करता आल्यामुळे अधिक व्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटणं अशी कित्येक कारणं सांगता येतील. पण तू हूकअपचा विचार करण्याआधी तुला हा संबंध का हवा आहे याचं कारण शोधून काढ आणि तुझ्या संभाव्य पार्टनरला तुझी इच्छा प्रामाणिकपणे सांग.

कॅज्युअल सेक्स करायला होकार देण्याची चार प्रमुख कारणं

ऑटोनॉमस – कोणत्याही भावनिक बंधनांशिवाय या लोकांना त्यांच्या लैंगिक क्षमतांचा मुक्तपणे वापर करायचा असतो, आनंद घ्यायचा असतो. त्यांना भविष्यात पार्टनरसोबत इतर कोणतंही नातं नको असतं एकतर मैत्री नाहीतर फक्त सेक्सपुरता संबंध.

पियर प्रेशर – या लोकांना पियर प्रेशरमुळे सेक्सची इच्छा वाटते आणि मग ते आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मित्रामधील प्रभाव वाढवण्यासाठी हूकअप करू इच्छितात. त्यांना केवळ मित्राच्या इच्छेसाठी हूकअप करायला नको वाटतं मग ते एकतर उपकार म्हणून सेक्स करण्याची इच्छा बाळगतात किंवा बदला घेतात.

नो डील - फसवणूक झालेली किंवा दारू प्यायलेली व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे हूकअपला नको म्हणते.

रिलेशनल – कधीकधी रोमँटिक संबंधाची सुरुवात म्हणजे हूकअप असू शकतं (हॉलिवूडचे दोन चित्रपट पाहा फ्रेंडस विथ बेनिफिट्स आणि नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड) काही जणं भविष्यात हे नातं पक्क होईल या इच्छेने पार्टनरशी कॅज्युअल सेक्स करतात.

हे वाचा - 'मला बायकोमध्ये आता रस वाटत नाही, Extra Marital Affair साठी मन खुणावतं'

एखाद्या मुलीशी कॅज्युअल नातं ठेवणं कठीण आहे हे तुला माहीतच आहे. आपल्या समाजात बायकांना मोकळेपणानं सेक्सबद्दल बोलणंही खूप कठीण जातं अशा परिस्थिती तू एखादीला अप्रोच झालास आणि त्याचा विपरित परिणाम झाला तर अवघड होईल. तसंच पुरुषांनाही आपल्या इच्छा, आकांक्षा व्यक्त करणं कठीण जातं कारण ते भावनांपेक्षा सेक्सलाच प्राधान्य देतात. आपला समाज दुटप्पी आहे आणि सेक्स रोखण्यासंबंधी भूमिका स्त्रीलाच घ्यावी लागते. अनेक ताणांमुळे आपल्या समाजातील मुलगी लगेच हूकअपसाठी तयार होणं अवघड आहे.

त्यामुळेच अनेक मुली कॅज्युअल सेक्ससाठी पुढे येत नाहीत त्यांची इच्छा असते की पुरुषाने पुढाकार घ्यावा. त्यामुळे मी काही खुणा सांगते ज्यातून तू अंदाज बांधू शकशील की ती तुझ्यात इंटरेस्टेड आहे की नाही पण हे लक्षात ठेव की तू प्रामाणिक राहायला हवं त्यामुळे तू पहिल्यांदाच स्पष्टपणे तुझी इच्छा सांग म्हणजे भविष्यात तुला त्रास होणार नाही.

तिला तुझ्यासोबत वेळ घालवावासा वाटणं – ती कदाचित कचरत असेल पण मुलीला किंवा स्त्रीला तिच्या आवडत्या पुरुषाबरोबर एकट्यानं वेळ घालवायला खूप आवडतं. तू तिला सोबत फिरायला चल म्हणालास आणि ती टाळाटाळ करत असेल तर स्पष्ट आहे की तिला तुझ्यात रस नाही.

तिला तुझा स्पर्श हवाहवासा वाटतो – जेव्हा तुम्हाला कुणी आवडत असतं तेव्हा तुम्हाला त्याचा स्पर्श हवा असतो. ती तुझ्या पाठीवर मांडीवर हात ठेवते का किंवा चिकटून बसते का हे बघ. ती तसं करत नसेल तर उपयोग नाही.

ती फ्लर्ट करते – वर्षानुवर्षे फ्लर्टिंग हे सेक्शुअल इंटरेस्टचं द्योतक आहे. तू बोलता बोलता सहजपणे किंवा काही कृतींमधून तुझा तिच्या इंटरेस्ट असल्याचं दाखवू शकतोस त्यालाच फ्लर्टिंग म्हणतात. पण हे लक्षात ठेव, असं करताना काही अनुचित बोलणं किंवा वागणं होणार नाही याची काळजी घे. केवळ डोळ्यांत डोळे घालून पाहणं आणि चांगली स्माइल देणं म्हणजे फ्लर्टिंग नव्हे. जेव्हा मुलगी तुझ्यावर फिदा असते तेव्हा ती बोलण्यातून तुला कॉम्प्लिमेंटस देऊन तिची इच्छा स्पष्टपणे प्रकट करत असते.

तुझ्या गोष्टींना सकारात्मक पाठिंबा देणं – तुम्ही बोलताना ती तुझ्या मुद्द्यांना पाठिंबा देत असेल तर ती इंटरेस्टेड आहे. तुझ्यासोबत असताना त्या मुलीला किंवा स्त्रीला रिलॅक्स आणि कन्फर्टेबल वाटत असेल, तुझा स्पर्श ती समजवून घेत असेल. तू तिची काळजी घेत असल्याचं ती बोलण्यातून मान्य करत असेल तेव्हा हा विषय काढायला हरकत नाही. पण जर तिनं विषय थांबवला तर तू तिथंच थांबायला हवं. का, कशाला असल्या फालतू चौकशा करायला नकोत.

हे वाचा -  BBW चं आकर्षण वाटतं, मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होणं नैसर्गिक आहे की...

खरं तर या लक्षणांपैकी कुठलं पक्क धरता येत नाही कारण हे सगळे अंदाज असतात आणि मुलीच्या मनात काय आहे याचा थांगपत्ता लागत नाही. ही सगळी लक्षणं जरी दिसत असली तरीही सेक्ससाठी उत्स्फुर्तपणे होकार देणं हाच खरा. जोपर्यंत तू स्पष्ट विचारत नाहीस आणि ती होकार देत नाही तोपर्यंत ती सेक्सला तयार आहे असं तू मानून चालणार नाही.

First published:

Tags: Sexual wellness