Home /News /lifestyle /

"तो खूप उत्तेजित असतो पण मी लवकर थकते; SEX करताना त्याला साथ कशी देऊ?"

"तो खूप उत्तेजित असतो पण मी लवकर थकते; SEX करताना त्याला साथ कशी देऊ?"

"माझे पती लैंगिक जीवनात समाधानी नाहीत, त्यामुळे मला त्यांच्यासोबत राहताना त्रास होत आहे. तो उत्तेजित होताच मलाही उत्तेजना येते. पण मी फार लवकर शांत होते. याचा आमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला असून आमच्यातील अंतर वाढत चाललं आहे"

प्रश्न : मी विवाहित स्री असून मला एक मूलदेखील आहे. माझा प्रेमविवाह झाला असूनही लग्नापूर्वी माझे कोणातेही लैंगिक संबंध नव्हते. तसंच मी कधीही हस्तमैथुन करण्याचाही प्रयत्न केला नाही. माझे पती लैंगिक जीवनात समाधानी नाहीत, त्यामुळे मला त्यांच्यासोबत राहताना त्रास होत आहे. तो उत्तेजित होताच मलाही उत्तेजना येते. पण मी फार लवकर शांत होते. तो जास्त वेळ लैंगिक क्रिया करतो. अखेरीस त्याला थांबण्याची मला विनंती करावी लागते. याचा आमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला असून आमच्यातील अंतर वाढत चाललं आहे. त्याच्या सेक्सबद्दल रम्य कल्पना आहेत. पण त्याला कशी साथ द्यावी हे मला समजत नाही. उत्तर - प्रत्येकाची लैंगिक भावना व्यक्त करण्याची विशिष्ट अशी शैली असते. मात्र ही भावना व्यक्त करताना सोयीस्कर आणि सुरक्षित वाटणं आवश्यक आहे. माझा तुम्हाला प्रथम असा सल्ला आहे की, आपण आपल्या पतीसोबत लैंगिक क्रिया करताना त्यात कोणताही बदल करण्यासाठी दबाव आणू नये. कारण वैवाहिक नात्यात लैंगिक संबंधापेक्षाही बरेच काही घटक महत्त्वाचे असतात. बऱ्याचदा पॉर्न बघितल्याने पुरुषांमध्ये लैंगिक क्रिया अधिकाधिक वेळ केली पाहिजे असा दृष्टिकोन तयार झालेला असतो. त्यामुळे ते प्रेम किंवा आनंद व्यक्त करण्याऐवजी उत्कटतेचा हा मार्ग आहे असे मानतात. खरं तर सेक्स म्हणजे तृप्ततेपेक्षाही अधिक काही आहे. काही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात उत्कटता सहन करण्याची किंवा योनीप्रवेशाच्या कृतीत केलेला बदल सहन करण्याची क्षमता नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीला थेट लैंगिक क्रिया शेवटी करण्यास सांगावं. तुम्ही आणि तुमच्या पतीनं प्रथम लैंगिकतेशी संबंधित अवयवांना उत्तेजना द्यावी. लैंगिक क्रिया करताना उत्तेजनेसाठी विशिष्ट पोझिशन्सला महत्त्व द्या. यामुळे तुम्हाला लैंगिक संबंधातून अधिकाधिक आनंद मिळेल. दुसरं म्हणजे आपल्याला लैंगिकतेचा आनंद नेमक्या कोणत्या प्रकारातून मिळतो हे समजून घ्या. हे तुमच्या पतीसाठीच नव्हे तर तुम्हालाही फायदेशीर ठरेल. हे वाचा - 'मला बायकोमध्ये आता रस वाटत नाही, Extra Marital Affair साठी मन खुणावतं' लैंगिकतेबाबत आत्मविश्वास वाढणं हे महत्त्वाचा असून सेक्स हा केवळ तुमच्या पतीसाठी नाही तर तुम्हालाही आनंद देणारा आहे. लैंगिकदृष्ट्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी सेक्स म्हणजे केवळ लैंगिकता आणि मादकता नाही हे प्रथम समजून घ्या. लैंगिकता हे जिवंतपणाचं प्रतीक असून जास्तीत जास्त शारीरिक आनंद कसा मिळवायचा हे शिकण्याचं साधन आहे. आरश्यासमोर उभं राहून स्वत:ला नग्न पाहा. स्वत: ला मसाज करा. आपल्या खोलीत छान सुगंध दरवळेल अशी व्यवस्था करा, मेणबत्या लावा. अंघोळीनंतर अंगाला सुवासिक परफ्युम लावा. आपला वेळ हेतूपूर्वक आणि जाणीवपूर्वक खर्च करा. आपण दरवेळी केवळ कुटुंबाचं पोषण करण्यासाठी पदार्थ तयार करत नाही. वेगवेगळी चव, मसाल्यांचा सुवास घेण्यासाठी अनेक पदार्थ करून खाऊन बघतो. तसंच सेक्सचं आहे. हे सर्व असे मार्ग आहेत की जे तुमचं शरीर आणि भावना यांना एकत्रित आणतील. यामुळे आपल्याला अधिक आत्मविश्वास येईल आणि आत्मविश्वास वाढल्यानं अधिक आनंद मिळेल. हे वाचा - BBW चं आकर्षण वाटतं, मोठ्या वयाच्या स्त्रियांकडे आकर्षित होणं नैसर्गिक आहे की... चुंबनाचे विविध प्रकार, ओरल सेक्सच्या विविध पद्धती, उत्कटता कमी करून अधिकाधिक आनंद मिळवण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला कामसूत्र हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देईन. एकमेकांसमोर नग्न बसा, आपल्याला कोणत्या गोष्टी उत्तेजित करतात हे जाणून घ्या. एकमेकांना स्पर्श करा. जेव्हा तुम्ही सेक्स करत असाल तेव्हा तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या पतीला सांगा. तुम्ही थकण्याआधी किंवा कृतीत बदल करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पतीला थांबवा. ही बाब तुम्हाला अधिकाधिक आनंद देईल. बाह्य जननेंद्रियात फारसा ओलावा टिकत नसेल तर तेलयुक्त ल्युब्रिकंटसचा वापर करणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. असा वापर करणं ही बाब अत्यंत सामान्य आहे. जर तुम्ही कंडोम वापरत असाल तर तो ल्युब्रिकंटयुक्त आहे ना याची खात्री करा.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual relationship, Sexual wellness

पुढील बातम्या