तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून.
प्रश्न : प्रजोत्पादन या उद्देशापलीकडे खरोखरच सेक्स माणसांसाठी आवश्यक आहे का? मनुष्य याशिवाय जगूच शकत नाही का?
उत्तर : अगदीच स्पष्ट बोलयचं तर सेक्स ही माणसांसाठी गरजेची बाब नाही. तथापि, बहुतांश लोकांसाठी सेक्स हा त्यांच्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. जीवनमान वाढणे, हृदय विकारांचा धोका कमी होणे आणि आत्मविश्वास वाढणे असे अनेक भौतिक आणि भावनिक फायदे सेक्सचे आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूनं विचार केला तर तुम्ही तुम्हाला आनंद देणाऱ्या एखाद्या स्पोर्टस टिममध्ये सहभागी झालात किंवा एखाद्या पाळीव प्राण्याच्या संगोपनासारख्या अॅक्टिव्हिटीमध्ये व्यस्त राहिलात तरी देखील तुमच्या शरीराला व्यायाम मिळेल तसेच या माध्यमातून तुम्ही लोकांशी जोडले जाल आणि ही बाब सेक्सशिवाय शक्य आहे.
तो खूप उत्तेजित असतो पण मी लवकर थकते; SEX करताना त्याला साथ कशी देऊ?"
सेक्स हा आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचा केवळ एक मार्ग आहे, यापलीकडे काही नाही.
Sexual Wellness: बाळाच्या जन्मानंतर 2-3 महिन्यांत लैंगिक संबंध ठेवणं योग्य आहे?
खरं तर काही लोकांना सेक्सविषयी फारसे औत्सुक्य नसते. काही लोकांनी तर एकदा देखील सेक्सुअल आकर्षण अनुभवलेले नसते. याचा अर्थ असा नव्हे की या लोकांमध्ये प्रेम करण्याची क्षमता कमी असते किंवा ही बाब अनैसर्गिक अथवा थंड प्रवृत्ती दर्शवणारी असते.
Sexual Wellness : शरीरसुखासाठी नुसतं सेक्स नव्हे, एकमेकांशी संवादही महत्त्वाचा
सेक्सविषयी औत्सुक्य नसणे ही अतिशय नैसर्गिक अशी बाब असून त्यात काही चुकीचे नाही. सेक्स सर्वेच्च बाब नाही. तसेच ते एखाद्या विषयी असणारी वचनबध्दता किंवा एकनिष्ठता दाखवण्याचे एकमेव साधन नाही. त्यामुळे कोणत्याही विवादाचा प्रचार न करता, उत्तम मानवी आयुष्यासाठी केवळ सेक्स हीच गरजेची बाब असू शकत नाही, असे मी म्हणेन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual wellness