Home /News /lifestyle /

Sexual Wellness : बाळाच्या जन्मानंतर 2-3 महिन्यांत लैंगिक संबंध ठेवणं योग्य आहे का? त्याचा विपरित परिणाम तर नाही होणार?

Sexual Wellness : बाळाच्या जन्मानंतर 2-3 महिन्यांत लैंगिक संबंध ठेवणं योग्य आहे का? त्याचा विपरित परिणाम तर नाही होणार?

'तीन महिन्यांपूर्वी माझ्या पत्नीने आमच्या बाळाला जन्म दिला आहे. आता आम्ही दोघेही लैंगिक संबंध ठेवण्यास उत्सुक आहोत. परंतु माझ्या मनात शंका आहे.'

प्रश्न :  तीन महिन्यांपूर्वी माझ्या पत्नीने आमच्या बाळाला जन्म दिला आहे. आता आम्ही दोघेही  लैंगिक संबंध ठेवण्यास उत्सुक आहोत. परंतु माझ्या मनात शंका आहे. माझी पत्नी आमच्या बाळाला अद्यापही स्तनपान देत आहे. यावेळी लैंगिक संबंधासाठी जर मी तिची स्तनाग्रे उत्तेजित केली तर काही परिणाम होईल का? --------------------------------------- तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून. ---------------------------------------- उत्तर :  प्रथम तुमचे बाळाच्या जन्मानिमित्त अभिनंदन. आपण पुन्हा लैंगिक संबंधांना सुरुवात करू इच्छिता ही आनंदाची बाब आहे. स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये स्तनाग्र उत्तेजनाचे कोणतेही नकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. परंतु, ही क्रिया घडताना त्यांची यापूर्वीपेक्षा प्रतिक्रिया निश्चितच वेगळी असू शकते. स्तनपान देत असलेल्या महिलांचे स्तन अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे कोणत्याही उत्तेजक क्रियेमुळे तुमच्या पत्नीला वेदना होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीशी संवाद साधा. तिच्या स्तनाग्रांना दुखापत होईल इतपत उत्तेजना टाळा. स्तनपान देत असलेल्या मातांमध्ये कामविषयक वासना कमी असणे हे सामान्य लक्षण आहे. यामुळे बऱ्याचदा योनीमार्गातील कोरडेपणा देखील संभवतो. स्तनपानादरम्यान दुग्धनिर्मितीसाठी शरीर मोठ्या प्रमाणात प्रोलॅक्टीन या हॉर्मोनची निर्मिती करते. त्यातुलनेत इस्ट्रोजेनची निर्मिती कमी प्रमाणात होते. त्यामुळे योनीमार्गात कोरडेपणा आल्याने सेक्स करणे अवघड होते. त्यामुळे लैंगिक संबंधांना पुन्हा सुरुवात करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घ्या की जर पत्नीच्या योनीमार्गाला कोरडेपणा येत असेल तुम्ही एक ल्युब वापरू शकता. पत्नीच्या स्तनांचा प्राथमिक हेतू हा आपल्या बाळाचे संगोपन करणे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सेक्ससाठी ही बाब थांबवता येणे अशक्य आहे. जर सेक्स दरम्यान स्तनाग्रे उत्तेजित होऊन त्यातून दूध वाया जाऊ नये ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे. हे घडू शकते अशी शक्यता गृहीत धरुन आपण वाटचाल सुरु ठेवली पाहिजे. तुमच्यासाठी किंवा तुमच्या पार्टनरसाठी स्तनाग्रांना उत्तेजना देणे हाच केवळ लैंगिक संबंधांमधील महत्वाचा भाग आहे, असे नाही.  लैंगिक उत्तेजनेसाठी तिच्या कान, कंबर, नितंब आदी पर्यायांचा विचार करा. लक्षात ठेवा की चांगले लैंगिक संबंध हे कल्पनाशक्ती आणि प्रयोगांचा अविष्कार असतात. निरनिराळ्या परिस्थितीत तिचे शरीर आपल्याला नव्याने गवसत जाते.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या