मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कुणाची जातेय स्मृती, कुणी होतंय बहिरं; सेक्स लाइफ सुधारण्याच्या नादात भयंकर साइड इफेक्ट

कुणाची जातेय स्मृती, कुणी होतंय बहिरं; सेक्स लाइफ सुधारण्याच्या नादात भयंकर साइड इफेक्ट

त्यानंतर त्याचं लैंगिक आयुष्यच उद्ध्वस्त झालं.

त्यानंतर त्याचं लैंगिक आयुष्यच उद्ध्वस्त झालं.

व्हायग्रा (Viagra) घेणाऱ्या पुरुषांमध्ये गंभीर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

ब्रिटन, 17 ऑगस्ट  : चांगल्या सेक्स परफॉर्मन्ससाठी (Sex Performance) घेतलं जाणारं व्हायग्रा (Viagra) हे औषध पुरुषांच्या आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरत आहे. या औषधामुळे अनेक पुरुषांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ब्रिटनमधल्या अनेक व्यक्तींवर या औषधामुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 5 वर्षांत या औषधामुळे 543 प्रकारचे लहान-मोठे दुष्परिणाम झाल्याचं लक्षात आलं आहे.

सेक्स परफॉर्मन्स चांगला राहावा, यासाठी पुरुषांना व्हायग्रा हे औषध घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्या पुरुषांना इरेक्टाइल डिस्फंक्शनची (Erectile Dysfunction) समस्या आहे, त्यांच्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. हे औषध 1998 मध्ये सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर ते अमेरिकेत (America) मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. त्यानंतर अन्य देशांमध्येदेखील याची लोकप्रियता वाढू लागली. 2017 मध्ये ब्रिटनमध्ये (UK) मेडिकल दुकानांमधून व्हायग्रा औषध खरेदी करण्याला कायदेशीर परवानगी देण्यात आली होती. फायझर (Pfizer) कंपनीच्या एका प्रवक्त्यानं मुलाखतीत सांगितलं होतं, की व्हायग्रा हे लाइफस्टाइल ड्रग (Lifestyle Drug)औषध आहे, असं आम्ही कधीही प्रमोट करत नाही.

हे वाचा - खरंच प्रेमात आंधळा झाला! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या नादात शेकडोंचा जीव पणाला

'द सन' या वेबसाइटच्या वृत्तानुसार, ब्रिटनमधल्या (Britain) किमान 9 जणांना या औषधाचा वापर केल्यानंतर त्यांच्या श्रवणशक्तीवर (Hearing) दुष्परिणाम झाल्याचं आढळलं आहे. त्यांनी आपली श्रवणक्षमता बऱ्याच प्रमाणात गमावल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय काही जणांना उलटी किंवा कंबरदुखीच्या समस्याही दिसून आल्या आहेत. व्हायग्राचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे आपल्या ऐकू येण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे बहिरेपण आल्याचा दावा प्लेबॉय नियतकालिकाचे मालक ह्युज हेफनर यांनी केला होता. 2017 मध्ये हेफनर यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं.

प्रामुख्याने कन्फ्युजन, पोटफुगी, विस्मृती यांसारखे दुष्परिणाम या औषधामुळे होत असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी 44 वर्षं वय असलेल्या कुन थेपने थायलंडमध्ये मित्रांसमवेत पार्टी करत असताना ड्रग्जचं सेवन केलं होतं. त्यानंतर कुन याने व्हायग्रा औषध घेतलं. एक तासानंतर त्याला खूप थकवा जाणवू लागला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हार्ट अॅटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. कारण त्याने काही ड्रग्जसोबत या औषधाचं सेवन केलं होतं. यावर फायझर कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या फायझर कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या निर्मितीमुळे खूप चर्चेत आहे.

हे वाचा - ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास सुट्टी; रोमान्ससाठी खास Fertility paid leave

इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या असलेल्या व्यक्ती या औषधाचं सेवन करतात. या औषधामुळे तात्पुरत्या कालावधीसाठी लिंगामधला रक्तप्रवाह वाढतो. हृदयविकार (Heart Disease) असलेल्यांनी व्हायग्रा घेऊ नये, असं सांगितलं जातं. तसंच व्हायग्रा नायट्रेटयुक्त औषधांसोबत घेऊ नये, असंही सांगितलं जातं. कारण ब्लड प्रेशर वाढवणारं आणि ब्लड प्रेशर कमी करणारं औषध एकाचवेळी घेण्यास डॉक्टर मनाई करतात. त्यामुळे असं केल्यास व्हायग्रा हे औषध धोकादायक ठरू शकतं.

First published:

Tags: Health, Lifestyle, Sex, Sexual health