मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सेक्समधील उत्साह कमी झालाय; 5 मार्गांनी परत मिळवा हरवलेला तो आनंद

सेक्समधील उत्साह कमी झालाय; 5 मार्गांनी परत मिळवा हरवलेला तो आनंद

तुमचं सेक्स लाईफ सुधारण्यासाठी काही टीप्स.

तुमचं सेक्स लाईफ सुधारण्यासाठी काही टीप्स.

तुमचं सेक्स लाईफ सुधारण्यासाठी काही टीप्स.

    मुंबई, 01 सप्टेंबर : लग्नानंतर काही वर्षांनी पती-पत्नीचा सेक्समधील उत्साह (Sex drive) कमी होऊ शकतो. बऱ्याच कपल्समध्ये ही गोष्ट दिसून येते. थकवा, तणाव यासारख्या गोष्टींमुळे हा उत्साह कमी (lack of sex drive) होऊ शकतो. तसंच यासोबत इतरही काही गोष्टींमुळे सेक्सदरम्यान अडचणी (Problems while sex) येऊ शकतात. या गोष्टींना कित्येकदा तुमचं रुटीन कारणीभूत असतं.

    तुमच्या सेक्स लाईफचा (Sex life) तुमच्या मानसिक आरोग्यावर, तसंच इतर गोष्टींवरही परिणाम होत (Sexual health) असतो. त्यामुळेच तुमचं सेक्स लाईफ आणखी चांगलं करण्यासाठी (Tips to improve sex life) हेल्थ शॉट्स या आरोग्यविषयक वेबसाईटने काही टिप्स दिल्या आहेत.

    एक्सरसाईझ

    बऱ्याच वेळा सेक्स करत असताना शारीरिक त्रास जाणवतो. याला कारण म्हणजे तुमचे पेल्व्हिक मसल्स (ओटीपोटीचे स्नायू) तितके मजबूत नसणे. यासाठी तुम्ही कीगल एक्सरसाईज (Exercise for better sex life) करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढेल आणि सेक्सदरम्यान तुम्ही जास्तीत जास्त आनंद मिळवू शकाल.

    झोप

    अर्थात, केवळ ही एकच गोष्ट पुरेशी नाही. सेक्स लाईफचा चांगल्या प्रकारे आनंद (Sex life tips) घ्यायचा असेल, तर तुमची झोपही चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. तुम्ही थकलेले असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्समधील परफॉर्मन्सवर होतो. पण तुमची चांगली झोप झाली असेल, तर नक्कीच तुमचा परफॉर्मन्स चांगला असतो. यामुळेच मॉर्निंग सेक्स (Why morning sex is more satisfying) हा जास्त आनंद देणारा आणि समाधानकारक असतो.

    हे वाचा - आपल्या पार्टनरकडून भारतीयांना काय हवंय? सर्व्हेतून आली धक्कादायक माहितीसमोर

    आहार

    तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचाही तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या समागमासाठी तुम्ही हेल्दी खाण्यावर (Diet tips for better sex life) लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः भरपूर प्रमाणात अमिनो अॅसिड्स असणारी फळे, मासे, किनुआ, अंडी, चीज आणि कडधान्ये यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये (Food for better sex) करणं गरजेचं आहे.

    संवाद

    खाणे-पिणे आणि व्यायाम या तर झाल्या शारिरीक गोष्टी. मात्र, चांगल्या सेक्स लाईफसाठी तुम्ही मानसिकदृष्ट्याही तयार असायला हवे. यासाठी आपल्या जोडीदारासोबत तुमचा चांगला संवाद व्हायला हवा. अगदी नाजुक गोष्टींबाबतही तुम्ही मोकळेपणाने (Importance of communication for sex life) बोलत असाल, तर तुमच्या सेक्स लाईफवर त्याचा चांगला परिणाम होतो.

    हे वाचा - पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगळी दिसतात Pre Diabetes ची लक्षणं; शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष नको

    शारीरिक काळजी

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सेक्सदरम्यान योनीच्या कोरडेपणामुळे (Vaginal Dryness) कित्येक महिलांना त्रास सहन करावा लागतो. याचा थेट परिणाम सेक्स लाईफवर होतो. त्यामुळे सेक्स करताना आवश्यक तेवढ्या प्रमाणात ल्युब्रिकंट्सचा (lubricants for better sex) वापर करणे आवश्यक आहे. यासाठी जेल किंवा वॉटर बेस असणारे ल्युब्रिकंट्स बाजारात मिळतात. मात्र, ल्यूबचा वापर करुनही कोरडेपणा कमी होत नसेल, तर तातडीने गायनॅकलॉजिस्टची (Gynaecologist) भेट घेणे आवश्यक आहे.

    First published:

    Tags: Couple, Health, Lifestyle, Relationship, Sex, Sexual health, Sexual wellness