मराठी बातम्या /बातम्या /देश /आपल्या पार्टनरकडून भारतीयांना काय हवंय? सर्व्हेतून आली धक्कादायक माहितीसमोर

आपल्या पार्टनरकडून भारतीयांना काय हवंय? सर्व्हेतून आली धक्कादायक माहितीसमोर

कोणत्या बाबतीतलं स्वातंत्र्य (Freedom) तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर

कोणत्या बाबतीतलं स्वातंत्र्य (Freedom) तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर

कोणत्या बाबतीतलं स्वातंत्र्य (Freedom) तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर

  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : आजचं जग अत्यंत वेगवान आहे. हा वेग तंत्रज्ञानामुळे आलेला आहे, आर्थिक बाबींमुळे आलेला आहे, विज्ञानातल्या प्रगतीमुळे आलेला आहे आणि अर्थातच माणसाच्या कुतुहलामुळेच एवढी प्रगती होऊ शकलेली आहे. आजच्या या 21व्या शतकातले भारतीय या बदललेल्या वातावरणात वेगवेगळ्या मुद्द्यांकडे कसं पाहतात, याचा वेध घेण्यासाठी OkCupid नावाच्या एका डेटिंग अॅपने एक सर्वेक्षण केलं होतं. वैयक्तिक आयुष्य (Personal Life), लव्ह लाइफ (Love Life), रिलेशनशिप (Relatioship) आदी बाबींवर मत व्यक्त करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतीच असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.

  भारतीय नागरिकांना या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या वाटतात, याबद्दल या सर्वेक्षणातून दिसून येतं. 'भारतीय नागरिक स्वातंत्र्य या गोष्टीकडे राष्ट्रीय किंवा वैयक्तिक पातळीवर खुलेपणाने व्यक्त होण्याचा अधिकार या रूपाने पाहतात. या तऱ्हेच्या बारीकसारीक गोष्टींमधून कम्पॅटिबिलिटीबद्दल अंदाज बांधता येतो आणि प्रेम मिळवण्याच्या दृष्टीने ते जास्त महत्त्वपूर्ण ठरतं,' असं मत OkCupid च्या सीनिअर मार्केटिंग मॅनेजर सितारा मेनन यांनी मांडलं असल्याचं वृत्त 'आज तक'ने याबद्दलचं दिलं आहे.

  या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. नातेसंबंध आणि वित्तीय स्वातंत्र्याबद्दलच्या (Economic Freedom) प्रश्नावर 68 टक्के व्यक्तींनी आपल्या जोडीदाराला स्वातंत्र्य देण्यावर विश्वास असल्याचं सांगितलं. 27 टक्के व्यक्तींना आपल्या जोडीदारासह जॉइंट बँक अकाउंट असणं एखाद्या संकटासमान वाटतं. उर्वरित 73 टक्के जणांना मात्र असं वाटत नाही.

  कोणत्या बाबतीतलं स्वातंत्र्य (Freedom) तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 39 टक्के व्यक्तींनी आर्थिक बाबतींत स्वातंत्र्य सर्वांत महत्त्वाचं वाटत असल्याचं सांगितलं. 30 टक्के व्यक्तींनी प्रवास, 22 टक्के व्यक्तींनी लैंगिकता आणि 9 टक्के व्यक्तींनी कला या विषयांमधलं स्वातंत्र्य महत्त्वाचं वाटत असल्याचं सांगितलं.

  तसंच, पैसा आणि स्वातंत्र्य यांपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची वाटते, या प्रश्नावर 65 टक्के युझर्सनी पैशांपेक्षा स्वातंत्र्य जास्त प्रिय असल्याचं सांगितलं. 35 टक्के जणांनी मात्र स्वातंत्र्यापेक्षाही पैसा जास्त महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. त्यामुळे भारतातले बहुसंख्य नागरिक पैशांसाठी स्वातंत्र्याशी तडजोड करू शकत नाहीत, हे वास्तव समोर आलं.

  मोदी सरकार घेणार मोठा निर्णय? LICमध्ये 20 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी?

  स्वातंत्र्य आणि सुरक्षितता (Security) यांपैकी कोणती गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, 58 टक्के व्यक्तींनी स्वातंत्र्य, तर 42 टक्के व्यक्तींनी सुरक्षिततेला प्राधान्य दिलं.

  संस्कृती, जात, वंश या बाबी तुमची ओळख तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 34 टक्के व्यक्तींनी उत्तर दिलं, की त्यांची ओळख त्यांच्या वारशापेक्षा किंवा परंपरेपेक्षा वेगळी आहे. 25 टक्के व्यक्तींनी असं सांगितलं, की संस्कृती, जात, वंश या बाबी आपली ओळख तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात.

  कतारमध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक चर्चा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

  माध्यमस्वातंत्र्य आवश्यक आहे की नाही, या प्रश्नावर 90 टक्के व्यक्तींनी होकारार्थी उत्तर दिलं आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी कायद्यांची गरज आहे का, या प्रश्नावर 76 टक्के जणांनी सांगितलं, की धार्मिक स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी कायद्यांची आवश्यकता आहे.

  First published:
  top videos