जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका; तातडीने सोडा

Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका; तातडीने सोडा

Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका; तातडीने सोडा

आपल्याला या सवयी (Bad Habits For Health) लागतात, तेव्हा फार काही वाटत नाही, परंतु जेव्हा याचे वाईट दुष्परिणाम जाणवायला लागतात, तेव्हा आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. का

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 14 सप्टेंबर : आपल्या धावत्या लाईफस्टाईलमुळे अनेक लोकांना वाईट सवयी जडतात. जी आपल्या आरोग्यासाठी घातक असतात. जेव्हा आपल्याला या सवयी (Bad Habits For Health) लागतात, तेव्हा फार काही वाटत नाही, परंतु जेव्हा याचे वाईट दुष्परिणाम जाणवायला लागतात, तेव्हा आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. कारण तोपर्यंत आपल्याला त्या वाईट आजारांची लागण झालेली असते. त्यामुळे जर तुम्हालाही अशा काही वाईट सवयी असतील तर त्यापासून कशी सुटका करावी आणि आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी, याबाबत आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. डाएट एक्सपर्ट डॉक्टर रंजना सिंह (Diet Expert Doctor Ranjana Singh) यांच्या मते, आपल्या निरोगी आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीचा आहार मिळणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य वेळी चांगला आहार, चांगले खाद्यपदार्थ आणि त्यातील संतुलन राखले जाणे फार आवश्यक असते.त्यातच जर व्यक्तीला दारू(Alcohol), ड्रग्ज (drugs) किंवा धूम्रपानाची सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडवली गेली पाहिजे. जेणेकरून या वाईट सवयींमुळे भविष्यातील होणारे गंभीर आजार टाळता येऊ शकतात. 10 महिन्यांतच दोनदा प्रेग्नंट, 3 बाळांना जन्म; प्रेग्नन्सीमुळे डॉक्टरही चक्रावले आपल्या आरोग्यासाठी योग्या वेळी झोप मिळणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी ठरलेल्या वेळेत घेतलेली झोप ही फायदेशीर ठरते. त्याचबरोबर चांगली झोप झाली तर सकाळी ताजेतवाने वाटते. त्यामुळे फार वेळ रात्री जागणे आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊ नये, आपल्या आहारात योग्य पद्धतीचा बदल करून आपण आपल्या वाईट सवयींना सोडू शकतो.  ज्यामुळे आपण भविष्यातील होणाऱ्या संभावित आजारांना टाळू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात