मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

11 वर्षांपूर्वी वाळवंटात सापडला होता हा काळा दगड, आता यातून उलगडलं मोठं रहस्य!

11 वर्षांपूर्वी वाळवंटात सापडला होता हा काळा दगड, आता यातून उलगडलं मोठं रहस्य!

 2011 मध्ये सहारा वाळवंटात (Sahara Desert) सापडलेला काळा दगड (Black stone) सध्या जोरदार चर्चेत आहे. वाळंवटात सापडलेल्या या दगडात काहीतरी वेगळेपण आहे, असा अंदाज त्याचवेळी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता

2011 मध्ये सहारा वाळवंटात (Sahara Desert) सापडलेला काळा दगड (Black stone) सध्या जोरदार चर्चेत आहे. वाळंवटात सापडलेल्या या दगडात काहीतरी वेगळेपण आहे, असा अंदाज त्याचवेळी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता

2011 मध्ये सहारा वाळवंटात (Sahara Desert) सापडलेला काळा दगड (Black stone) सध्या जोरदार चर्चेत आहे. वाळंवटात सापडलेल्या या दगडात काहीतरी वेगळेपण आहे, असा अंदाज त्याचवेळी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता

मुंबई, 05 फेब्रुवारी: जगात अनेक प्रकारची रहस्यं (Mystery in World) दडलेली आहेत. काही रहस्यांची उकल करण्यात शास्त्रज्ञांना काही प्रमाणात यश आलं आहे. परंतु, अद्याप काही रहस्यांची उकल होऊ शकलेली नाही. पृथ्वी (Earth) व्यतिरिक्त अजून कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ मेहनत घेत आहेत. पण या प्रश्नाचं ठोस उत्तर अद्याप तरी मिळू शकलेलं नाही.

गेल्या कित्येक वर्षांपासून शास्त्रज्ञ पृथ्वीच्या उत्पत्तीचं गूढ (The mystery of the earth) उकलण्यात गुंतले आहेत. या शास्त्रज्ञांना केवळ पृथ्वीविषयी गूढ गोष्टींमध्येच रस नाही, तर ते अंतराळाकडेही लक्ष ठेवून आहेत. अनेक शास्त्रज्ञ अंतराळातील परग्रहांवरील जीवसृष्टीच्या संशोधनात गुंतले आहेत. त्यांना कधीतरी असं वाटतं की संशोधन पूर्ण होत आलं आहे, पण मग त्यात काही ना काही अडथळे येतात. मात्र लवकरच अशा ग्रहाचा शोध लागेल, असे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. याच्या शीर्षस्थानी मार्स अर्थात मंगळ आहे. येत्या काही वर्षांत या ग्रहावर मानव वास्तव्य करू शकेल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.

दरम्यान, 2011 मध्ये सहारा वाळवंटात (Sahara Desert) सापडलेला काळा दगड (Black stone) सध्या जोरदार चर्चेत आहे. वाळंवटात सापडलेल्या या दगडात काहीतरी वेगळेपण आहे, असा अंदाज त्याचवेळी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. पण या दगडात काय गुपित दडलंय, हे बहुधा आता समोर येत आहे. हा काही सामान्य काळा दगड नाही. ही मंगळावरून आलेली दुर्मीळ उल्का (Meteor) आहे. संशोधनाकरिता शास्त्रज्ञांनी ती स्वतःकडे ठेवली आहे. तेव्हापासून त्यावर सातत्यानं संशोधन सुरू होतं. आता या माध्यमातून मंगळावरील जीवसृष्टीचं महत्त्वाचे रहस्य शोधण्यात आल्याचे समोर आले आहे.

हे वाचा-फेब्रुवारी महिन्यातील ग्रहांचं राशीपरिवर्तन; 12 राशींवर काय होणार परिणाम?

2011 मध्ये वाळवंटातून बाहेर काढल्यानंतर 2013 पासून या काळ्या दगडाचा अभ्यास सुरू करण्यात आला. या दगडाचं वय 2.1 अब्ज वर्ष असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय या उल्कापिंडात कोणती खनिजं (Minerals) आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. आतापर्यंतच्या संशोधनात शास्त्रज्ञांना या काळ्या दगडात झिरकॉन (Zircon) असल्याचं आढळून आलं आहे. या झिरकॉन तयार होण्यासाठी अनेक अब्ज वर्षं लागतात. अशा स्थितीत मंगळाचं अस्तित्व आणि त्याचा इतिहास आणखी जुना असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हे वाचा-कोरोनापासून बचावासाठी शास्त्रज्ञांनी तयार केला खास मास्क; आपोआपच निर्जंतुक होणार

मंगळावर 4.2 अब्ज वर्षांपूर्वी जीवसृष्टी असल्याचं या पूर्वीच्या अभ्यासातून समोर आलं होतं. याबाबत कोणताही पुरावा नसला तरी अनेक शास्त्रज्ञांचा यावर विश्वास आहे. या काळ्या दगडाचा अभ्यास सायन्स ऑफ अॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. मंगळावर कधी जीवसृष्टी होती किंवा नव्हती? असल्यास ती कधी आणि कशी संपुष्टात आली, याचा शोध या दगडाच्या माध्यमातून घेणं शक्य होईल, अशी आशा आता शास्त्रज्ञांना आहे.

First published:

Tags: Earth, International, Rajasthan, Sahara, World news