मुंबई, 05 फेब्रुवारी : ग्रह, नक्षत्रं आणि राशी मानवी जीवनावर परिणाम करतात, असं ज्योतिषशास्त्र (Jyotish Shastra) सांगतं. दर महिन्याला किंवा एका ठरावीक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह (Zodiac Sign) राशिपरिवर्तन (Transit) करत असतो. या परिवर्तनानुसार प्रत्येकाला फलप्राप्ती होत असते. ग्रहांची बदलती स्थिती व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करते, असं ज्योतिष अभ्यासक सांगतात. नव्या वर्षातल्या दुसऱ्या अर्थात आताच्या फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाचे ग्रह राशिपरिवर्तन करत आहेत. यात रवी (Sun), शुक्र (Venus) , मंगळाचा (Mars) समावेश आहे. तसंच या महिन्यात वक्री बुध (Mercury) मार्गी होत असून, गुरूचा (Jupiter) अस्तदेखील होणार आहे. ग्रहांचं राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ ठरणार असल्याचं ज्योतिषशास्त्रातल्या जाणकारांनी सांगितलं आहे. फेब्रुवारी 2022मध्ये एकूण 5 ग्रहांच्या स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. 4 फेब्रुवारीला रवीच्या सर्वांत जवळ असलेला ग्रह बुध कुंभ राशीत मार्गी होत आहे. 19 फेब्रुवारी 2022 रोजी कुंभ राशीत गुरूचा अस्त होत आहे. याशिवाय रवी, शुक्र आणि मंगळ हे ग्रह राशिपरिवर्तन करत आहेत. या ग्रहस्थितीचा 12 राशींवर परिणाम दिसून येईल. हे वाचा - `या` 4 राशींचे लोक वाद-विवादापासून राहतात दूर; भांडणं नको वाटणाऱ्यांमध्ये तुम्हीही आहात का? मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींच्या दशम भावात होणारा शनी आणि बुधाचा योग कार्यक्षेत्रात यश मिळवून देईल. गुरू आणि शनीची सातव्या स्थानावर दृष्टी असल्यानं उद्योग-व्यवसायात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात काही उलथापालथ होऊ शकते. आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरू शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देईल. तुमची एखादी जुनी योजना प्रत्यक्षात उतरेल. दुसऱ्या स्थानातल्या मंगळामुळे कौटुंबिक समस्या वाढतील. भाग्य स्थानातल्या बुधामुळे लव्ह लाइफ चांगलं राहील. मिथुन (Gemeni) : मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र असेल. दुसऱ्या स्थानावर शनी आणि मंगळाची दृष्टी असल्याने समस्या निर्माण होतील. सहाव्या स्थानात केतू असल्यानं आरोग्यविषयक अडचणी निर्माण होतील. घरात अशांतता राहील. कर्क (Cancer) : कर्क राशीच्या जातकांना अपेक्षित यश मिळू शकतं. नवम भावावर शनीची दृष्टी असल्याने व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. पाचव्या स्थानातला केतू आणि त्यावर असलेल्या राहूच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींमध्ये अडचणी येतील. सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी, दशम स्थानात राहू असल्याने कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल. महिन्याच्या उत्तरार्धात सप्तम स्थानातून रवीचं भ्रमण होत असल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. व्यावसायिकांना कर्जातून मुक्ती मिळू शकते. कन्या (Virgo) : कन्या राशीच्या व्यक्तींना गुरूच्या आशीर्वादामुळे कार्यक्षेत्रात यश मिळेल. पंचम भावातल्या शनीची 11व्या आणि दुसऱ्या स्थानावर दृष्टी असल्याने आर्थिक बाजू मजबूत होईल; मात्र पंचम भाव रवी, बुध आणि शनी एकत्र असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागेल. हे वाचा - Horoscope: वेळेशी पक्की एकनिष्ठ असतात या राशीची लोकं; कामात टंगळ-मंगळ अजिबात खपत नाही तूळ (Libra) : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी, रवी आणि शनी या दोन्ही ग्रहांची दशम भावावर पूर्ण दृष्टी असल्याने ही स्थिती म्हणजे कामकाजाच्या दृष्टिकोनातून शुभ संकेत आहेत. गुरू पंचम स्थानात असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल. अभ्यासाचा मार्ग सोपा होईल. वृश्चिक (Scorpion) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी गुरूची दहाव्या स्थानावर असलेली दृष्टी आणि तिसऱ्या स्थानातल्या शनीमुळे करिअरच्या क्षेत्रात फायदा होईल. चतुर्थ स्थानात रवी गुरूसोबत असल्याने व्यावसायिकांसाठीही हा कालावधी चांगला असेल. धनू (Sagittarius) : धनू राशीच्या नोकरदारांना दशम स्थानाचा स्वामी बुध दुसऱ्या स्थानात शनीसोबत असल्याने फायदा होईल. व्यावसायिकांसाठी हा कालावधी चढ-उताराचा असेल. कायदा आणि फायनान्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी उत्तम असेल. मकर (Capricorn) : ग्रहांच्या या बदलामुळे मकर राशीच्या व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शनी आणि गुरूची दशम स्थानावर दृष्टी असल्याने नोकरदार वर्गाला चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. तसंच विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे निर्माण होतील. कुंभ (Aquarius) : या ग्रह स्थितीमुळे कुंभ राशीच्या नोकरदारांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दशम स्थानात केतू आणि त्याच्यावर राहूचा प्रभाव असेल. सप्तम स्थानावर गुरूची दृष्टी असल्याने व्यावसायिकांना मोठं यश मिळेल. मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी हा कालावधी चांगला आहे. मेहनतीनुसार यश मिळेल; मात्र विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शनीसह रवी आणि बुधाची पंचम स्थानावर दृष्टी असल्याने शिक्षणात अडथळे येऊ शकतात. फेब्रुवारी 2022मधलं गोचर भ्रमण - कुंभ राशीत रवीचं गोचर - 13 फेब्रुवारी 2022 म्हणजेच रविवारपासून रवी कुंभ राशीत गोचर करेल. - मकर राशीत मंगळ गोचर - मंगळ ग्रह 26 फेब्रुवारी 2022 म्हणजेच शनिवारी मकर राशीत प्रवेश करेल. - शुक्राचं मकर राशीत गोचर - शुक्र 27 फेब्रुवारी 2022 रोजी मकर राशीत प्रवेश करेल. - कुंभ राशीत बुध मार्गी - बुध 4 फेब्रुवारी 2022 रोजी कुंभ राशीत मार्गी होईल. -गुरूचा कुंभ राशीत अस्त - 19 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच शनिवारी गुरूचा कुंभ राशीत अस्त होईल. (सूचना - हा लेख ज्योतिषशास्त्र माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.