मुंबई, 4 फेब्रुवारी : कोविड-19 च्या (Coronavirus) संसर्गापासून बचाव करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी उद्योग जगताच्या सहकार्याने आपोआप निर्जंतुक (self-sterilizing mask) होणारे 'तांबे आधारित नॅनोपार्टीकलचे आवरण असलेले विषाणूरोधी' फेस मास्क विकसित केले आहेत. हे मास्क कोविड-19 विषाणूपासून बचाव करण्यात तर प्रभावी आहेतच, त्याशिवाय इतर अनेक विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गापासून संरक्षण करण्यात देखील उपयुक्त ठरत आहेत. तसेच संपूर्णपणे विघटित होणाऱ्या घटकांपासून तयार करण्यात आलेले हे मास्क (Mask) घालून श्वासोच्छ्वास घेणे सोपे आहे, तसेच ते धुता देखील येतात. कोविड-19 आजारास कारणीभूत ठरलेल्या सार्स कोविड विषाणूपासून बचाव करण्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अत्यंत प्रभावी ठरले आहे. हा आरएनए विषाणू श्वसनाच्या मार्गाने पसरतो.
मास्कच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार रोखण्यात यश येत असल्याने वैज्ञानिक हे मास्क अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी संशोधन करत आहेत, तर दुसरीकडे मास्क चा वापर प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाल्याने बाजारात अतिशय महागडे मात्र विषाणूरोधी किंवा जीवाणूरोधी गुणधर्म नसलेले मास्क विक्रीसाठी आहेत. रुग्णालये, विमानतळे, रेल्वे स्थानके, मॉल्स, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी अशा मास्कमधून विषाणूचे संक्रमण रोखणे अतिशय कठीण आहे. सध्याच्या परिस्थितीत, जिथे कोरोना विषाणूच्या उत्प्रेरीत स्वरूपातील नवनवे स्वरुपातील विषाणू सातत्याने आढळत आहेत, अशावेळी कमी किमतीचे विषाणू रोधी मास्क तयार करणे अतिशय गरजेचे आहे.
महिलेच्या गर्भाशयात दिसला दात-केसासह मांसाचा गोळा; मूल नव्हे तर... डॉक्टरही हादरले
याचाच विचार करत, आंतरराष्ट्रीय धातू भुकटी आणि नवे घटक याविषयीचे अत्याधुनिक संशोधन केंद्र (ARCI), या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संशोधन संस्थेने पेशीविज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र संशोधन केंद्र, सीएसआरआर-सीसीएमबी आणि रेसिल केमिकल्स या बंगळुरू येथील कंपनीच्या सहकार्याने, 'स्वयं-निर्जंतुक होणारे, नॅनो पार्टीकल्स चे आवरण असलेल्या विषाणूरोधी फेस मास्क' विकसित केले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पुरस्कृत कोविड महामारी विरुद्धच्या लढ्यासाठीच्या नॅनो-मिशन प्रकल्पाअंतर्गत, हे संशोधन करण्यात आले आहे.
आता घाबरण्याची गरज नाही! फक्त एका बॉलने Cancer क्लीन बोल्ड; 33 दिवसांतच खात्मा
मास्कची विल्हेवाट लावणेही सोपे
त्याशिवाय, वापरलेल्या मास्कची विल्हेवाट कशी लावावी याविषयी सध्या जगभरात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. कोविड विरुद्ध उपयुक्त असलेले अनेक पारंपरिक मास्क केवळ एकदाच वापरासाठी असतात आणि ते विघटनशील देखील नाहीत. ज्यामुळे पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी ही हे चिंताजनक आहे. मात्र, हे नवे विषाणूरोधी मास्क सुती कापडापासून बनवलेले असून ते जैवविघटनशील आहेत. त्यामुळे, त्यातून श्वासोच्छवास करणे आणि ते स्वच्छ करणेही सोपे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.