Home /News /lifestyle /

Hair Care Tips: एका आठवड्यात केस कितीवेळा धुवावेत? अनेकजण इथंच चूक करतात

Hair Care Tips: एका आठवड्यात केस कितीवेळा धुवावेत? अनेकजण इथंच चूक करतात

केसांची काळजी घेत असताना, आठवड्यातून केस कधी किंवा किती वेळा धुवायचे हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. केसांची योग्य काळजी न घेतल्याने केस झपाट्याने गळू लागतात किंवा पांढरे होतात.

    मुंबई, 11 मे : आपले केस निरोगी आणि सुंदर दिसावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी लोक केसांवर वेगवेगळे प्रयोग करत राहतात. विशेषतः महिलांसाठी, त्यांच्या केसांचे आरोग्य खूप महत्त्वाचे (Hair Care Tips) असते. महिलांचे लांब आणि दाट केस त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे महिला त्यांच्या केसांकडे जास्त लक्ष देतात. आपल्या सर्वांचे केस वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे काही लोकांचे केस सरळ असतात तसेच काहींचे केस कुरळे (Curly Hair) असतात. केसांची काळजी घेत असताना, आठवड्यातून केस कधी किंवा किती वेळा धुवायचे हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. केसांची योग्य काळजी न घेतल्याने केस झपाट्याने गळू लागतात किंवा पांढरे होतात, यासाठी आज जाणून घेऊया की, केस किती वेळा धुवायचे. केस कधी धुवायचे - दाट आणि कुरळे केस असलेले महिलांनी जरी त्यांचे केस बराच काळ धुतले नाहीत, तरी त्यांचे केस निर्जीव दिसत नाहीत. परंतु, हलके आणि पातळ केस असलेल्या लोकांनी जर जास्त वेळ केस धुतले नाहीत तर त्यांचे केस निर्जीव आणि कमकुवत दिसू लागतात. त्यामुळे तुमचे केसही कुरळे असतील तर तुम्हाला ते रोज धुण्याची गरज नाही. आठवड्यातून एकदा तुम्ही तुमचे केस शॅम्पू करू शकता. हे वाचा - खसखस खाल्ल्यानं वजन कमी होतं का? त्यातील पोषक घटक आणि फायदे जाणून घ्या याशिवाय जर कोणाचे केस तेलकट असतील तर त्यांनी आठवड्यातून दोनदा केस धुवावेत. तेलकट केस धुण्यासाठी तुम्ही ड्राय शॅम्पू वापरू शकता. यामुळे तुमच्या केसांमधील अतिरिक्त तेलही निघून जाईल आणि तुमचे केस सुंदर दिसतील. हे वाचा - 7, 8 की 9... किती तासांची झोप चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर?, घ्या जाणून रोज का धुवू नयेत - शॅम्पूमध्ये वेगवेगळी केमिकल्स मिसळली जातात हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे जर आपण आपले केस रोज शॅम्पूने धुतले तर केसांचे फायद्याऐवजी नुकसान होऊ लागते. वारंवार शाम्पू वापरल्याने आपल्या डोक्याची त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे केस निर्जीव दिसू लागतात. यासोबतच रोज केस धुतल्याने डोक्यात त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Health, Health Tips, Lifestyle, Woman hair

    पुढील बातम्या