मुंबई, 14 मे : घराची सुरक्षा प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. तसे, बहुतेक लोक दार बंद करण्यापासून अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देण्यापर्यंत सर्व सुरक्षा व्यवस्था ठेवतात. असे असतानाही काहींच्या निष्काळजीपणामुळे अनेकवेळा घरांमध्ये चोरीच्या घटना घडतात. विशेषत: काही भागात लोकांमध्ये अनेकदा चोरीची भीती असते. अशा परिस्थितीत घर सुरक्षित ठेवण्यासाठी काही सेफ्टी टिप्स तुमच्यासाठी खूप (Home Safety Tips) उपयुक्त ठरू शकतात.
तुमच्या परिसरात यापूर्वी चोरी झालेली असो किंवा नसो. चोर-दरोडेखोर आपल्या घरावर कधीही हल्ला करू शकतात, असा अंदाज ठेवून आपण नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. काही सोप्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची सुरक्षा तर वाढवू शकताच पण घरात चोरांचा कायमचा प्रवेश होणार नाही याचीही तजवीज करू शकता. जाणून घेऊया आपल्या घराला सुरक्षित घर बनवण्यासाठी काही टिप्स.
सुरक्षा अलार्म -
चोरटे बळजबरीने घरात घुसतात. अशा परिस्थितीत तुम्ही घराच्या मुख्य गेटवर सुरक्षा अलार्म लावू शकता. ज्याच्या मदतीने घरात चोर किंवा अज्ञात व्यक्ती आल्याची माहिती तुम्हाला लगेच कळेल.
डेथ बोल्ट -
घराच्या दारांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी कुलूपाऐवजी डेथ बोल्टचा वापर करा. कुलूप तोडणं तसं चोरांसाठी खूप सोपं काम आहे. मात्र, डेथ बोल्ट सहजपणे तोडता येत नाही.
इमरजेंसी सिस्टम -
घराच्या अधिक सुरक्षिततेसाठी इमरजेंसी स्मोक, हीट आणि फायर अलार्म लावायला विसरू नका. तसेच, बाहेरील दारावर 180 डिग्री फिश आय लेन्ससह पीप होल लावून घ्या. जेणेकरून दार न उघडता तुम्ही बाहेरच्या वस्तू सहज पाहू शकता.
हे वाचा -
जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट जाणून घ्या
काटेरी कुंपण -
दरवाजाच्या भक्कम सुरक्षेमुळे अनेकदा चोरटे घराच्या कंपाऊंडवरून चढून आत येतात. त्यामुळे त्या भिंतींना काटेरी कुंपण घालणे आवश्यक आहे. त्यामुळे चोरट्यांना आत येण्याचे सर्व मार्ग बंद होणार आहेत.
बाल्कनीमध्ये प्रकाश -
अंधाऱ्या आणि निर्जन घरांमध्ये चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी घराच्या बाल्कनीत दिवे लावा. यामुळे घरात प्रकाश असेल आणि घराच्या आजूबाजूला चोर असल्यास देखील लक्षात येईल.
हे वाचा -
केसांसाठी कधी पेरूची पानं वापरलीयत का? अनेक प्रॉब्लेम्सवर आहे सोपा घरगुती उपाय
पाळीव कुत्रा ठेवा -
निष्ठावान असण्यासोबतच पाळीव कुत्रा हा घरातील सर्वोत्तम सुरक्षा रक्षक देखील असतो. कुत्र्यांना दुरून अज्ञात व्यक्तीचा आवाज येतो आणि ते सावध होतात. त्यामुळे घरात पाळीव कुत्रा पाळल्यासही घराची सुरक्षा अधिक चांगली करता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.