नवी दिल्ली, 13 मे : केसांना सुंदर बनवण्यासाठी बहुतेक लोक हेअर केअर रूटीन फॉलो करतात. मात्र, अनेक उपाय करूनही काही लोकांच्या केसांची वाढ चांगली होत नाही. केस पातळ बनतात तसेच उन्हाळ्यात अनेकांचे केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, केसांच्या अनेक समस्यांवर पेरूच्या पानांचा चांगला उपयोग (Hair Care Tips) होतो.
पेरूच्या पानांचा (Guava Leaves) उपयोग करून केसांचे प्रॉब्लेम कमी करता येतात. विशेषत: उन्हाळ्यात पेरूच्या पानांचा वापर केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. अनेक पोषक तत्वांनी युक्त पेरूची पाने केसांना आवश्यक पोषण देऊन लांब, दाट आणि मुलायम बनवण्यासाठी खूप मदत करतात. घेऊया केसांची काळजी घेण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर आणि त्याचे फायदे.
पेरूच्या पानांचा हेअर मास्क बनवा -
पेरूच्या पानांपासून बनवलेला हेअर मास्क आठवड्यातून दोनदा वापरल्याने केसांची वाढ जलद होते. हेअर मास्क बनवण्यासाठी पेरूची काही पाने धुवून ब्लेंडरमध्ये बारीक करा. आता ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला लाव आणि हलक्या हातांनी मसाज करा. 30 ते 40 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
पेरूच्या पानांनी केस धुवा
पेरूच्या पानांचे पाणी केसांना निरोगी बनवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. यासाठी पेरूची पाने धुवून स्वच्छ करा. आता ती 1 लिटर पाण्यात टाकून 15-20 मिनिटे उकळवा. थंड झाल्यावर हे पाणी गाळून डब्यात भरावे. आता केस सौम्य शाम्पूने धुवा आणि कोरडे करा. त्यानंतर पेरूच्या पानांपासून बनवलेले पाणी केसांच्या टाळूवर लावा आणि 10 मिनिटे मसाज करा. थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवा.
हे वाचा -
लाकूड जाळून राहिलेली राख फेकू नका, त्याचा या कामांसाठी होतो चांगला वापर
पेरूच्या पानांनी केसांना तेल लावणे -
केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी केसांना तेल लावताना पेरूच्या पानांचा उपयोग करू शकता. यासाठी पेरूची पाने धुवून बारीक करा. आता या पेस्टमध्ये कांद्याचा रस आणि खोबरेल तेल घाला आणि चांगले मिसळा. हे मिश्रण केसांवर आणि डोक्याच्या त्वचेला लावून मसाज करा. त्यानंतर 30 मिनिटांनी केस सौम्य शाम्पूने धुवा.
हे वाचा -
चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.