मुंबई, 13 मे : आल्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. आलं त्याच्या आश्चर्यकारक चवीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक लोकांना सकाळी आलं घातलेलाच चहा हवा असतो. आलं केवळ मसाल्याच्या रूपातच नाही तर हजारो वर्षांपासून अनेक संस्कृतींमध्ये पारंपारिक उपाय म्हणून वापरले जात आहे, कारण त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हेल्थसाठी चांगलं असल्याने काही लोक त्याचे अधिक सेवन करू लागतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. असं अनेकदा घडलंय की आलं जास्त खाल्लं गेल्यानं अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढतात. आज जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम (Ginger Side Effects) काय आहेत.
रक्तस्त्राव होण्याचे कारण -
आल्यामध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म असल्याने जास्त सेवन केल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. लवंग किंवा लसूण आल्यासोबत एकत्र खाल्ल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका आणखी वाढतो.
अतिसाराचा धोका -
मोठ्या प्रमाणात आलं खाल्लं गेल्यास आतड्यांमधून अन्न आणि मल बाहेर जाण्याचा वेग वाढू शकतो आणि नंतर हा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
हे वाचा -
चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व
हृदय समस्या -
जास्त आलं खाल्लं गेल्यानं हृदयाच्या ठोक्यांवरही नकारात्मक परिणाम होतो. या औषधी वनस्पतीच्या अतिसेवनामुळे अंधुक दृष्टी, हृदय जास्त धडधडणे आणि निद्रानाश होतो, असे सांगितले जाते. यामुळे रक्तदाब देखील कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
त्वचा आणि डोळ्यांना अॅलर्जी
आल्याच्या अतिसेवनामुळे होणार्या मुख्य दुष्परिणामांची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे त्वचेवर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, धाप लागणे, खाज सुटणे, ओठ सुजणे, डोळे खाजणे आणि घसा खवखवणे. अशा परिस्थितीत, ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे चांगले आहे.
हे वाचा -
16 मे रोजी आहे पहिलं चंद्रग्रहण, या 5 राशीच्या लोकांनी आतापासूनच राहा सावध
गर्भधारणेदरम्यान असुरक्षित -
दररोज 1500 मिलीग्रामच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आलं सेवन केल्यास देखील गर्भपात होऊ शकतो, म्हणून गर्भधारणेदरम्यान जास्त आलं टाळण्याचा आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच खाण्याचा सल्ला दिला जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.