वॉशिंग्टन, 23 ऑगस्ट : पैशांची बचत (Money saving) करणं तशी चांगलीच सवय आहे आणि पैसे बचत करण्यात तर महिला विशेषतः गृहिणी हुशार असतात, त्यामुळेच अगदी कमीत कमी खर्चातही त्या घरचा गाडा चालवतात. पण एका महिलेने तर पैसे बचतीसाठी कंजूसपणाची हद्दच पार केली. तिने पैसे बचतीसाठी असे मार्ग निवडले जे पाहून तुम्ही डोक्यावर हातच माराल.
अमेरिकेत (America) राहणारी केट हॅशीमोटोला (Kate Hashimoto) पैसे खर्च करायला बिलकुल आवडत नाही. जास्त पैसे खर्च तसं शक्यतो कुणालाच आवडत नाही. पण केट पैशांच्या बचतीसाठी जे काही करते, ते तुम्हाला समजलं तर धक्काच बसेल. आपल्या आयुष्यात दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक गोष्टीतही ती कंजूसपणा करते. जिथं पैसे खर्च करण्याची गरज लागते तिथं ती पैसे खर्च करत नाही आणि कमीत कमी वस्तूंचा वापर करते.
टीएलच्या एस्क्स्ट्रीम चीपस्केटर शोमध्ये बोलताना केटने सांगितलं की, ती तीन वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये राहते. हे शहर राहण्यासाठी महाग आहे पण तिने पैसे बचतीचे काही खास मार्ग निवडलेत. ज्याने ती आपले खर्च कमी करते.
हे वाचा - कंजूसपणाची तर हद्दच झाली! पैसे वाचवण्यासाठी ही महिला करतेय काय काय; वाचूनच हैराण व्हाल
केट आपल्या घरासाठी कधीच फर्निचर खरेदी करत नाही. रस्त्यावर पडलेल्या भंगारातून ती आपल्या घरासाठी फर्निचर बनवते. लोक तुटलेलं फर्निजर घराच्या बाहेर टाकतात. कचरेवाले ते फर्निचर घेऊन जातील त्याआधीच मी ते फर्निचर घरी घेऊन येते, असं तिने सांगितलं. तिनं आपला बेड बहुतेक योगा मॅटपासून बनवला आहे आणि डायनिंग टेबलऐवजी ती मॅगजीनच्या बंडलवर जेवण करते. ओव्हननमध्ये ती सामान ठेवते, एका शेल्फप्रमाणे त्याचा वापर करते.
तिने गेल्या आठ वर्षांत स्वतःसाठी एकही कपडा घेतला नाही. 1998 साली तिने एक अंडरविअर खरेदी केली होती. त्यानंतर आतापर्यंत तिने एकही कपडा स्वतःसाठी घेतला नाही. ती सांगते, जेव्हा ती अंघोळ करते त्याचवेळी पाण्यात कपडे धुतले जातात. कपडे धुण्यासाठी साबणाचा खर्च नको म्हणून तिने तीन वर्षांपासून कपडेही धुतले नाहीत. ती टॉयलेट पेपरही खरेदी करत नाही. पाणी आणि साबणाने स्वतःची स्वच्छता करते.
हे वाचा - बापरे! महाबळेश्वरच्या रस्त्यावर गाड्यांसमोर आले 2 वाघ; पाहा थरारक VIDEO
दर महिन्याला ती फक्त 200 डॉलर म्हणजे 14, 800 रुपये खर्च करते. तिच्या बचतीच्या या विचित्र मार्गांनी तिने सहा महिन्यांत तिने 5 हजार पाउंड म्हणजे सहा लाखांपेक्षाही जास्त पैसे वाचवले आहेत, असं ती सांगते. बहुतेकदा पैसे बचत करणाऱ्यांना अनेक जण कंजूस म्हणून चिडवतात. पण या महिलेचा कंजूसपणा पाहाल तर तुम्ही ही जगातील सर्वात कंजूस व्यक्ती आहे, असंच तुम्ही म्हणाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.