बडीशेपमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, मॅग्नीज व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. त्यामुळे रात्री पुरुषांनी बडीशेप खाल्ली तर त्यांचं सेक्शुअल हेल्थ चांगलं राहतं.
एका संशोधनानुसार बडीशेपमध्ये झिंक आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे शीघ्रपतनासारखा त्रास होत नाही. म्हणजेच पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते.
पुरुषांनी रात्रीच्या वेळी बडीशेप खावी मात्र, बडीशेपसोबत दूध घेतल्याने जास्त फायदा होतो. एक ग्लास दुधामध्ये एक चमचा बडीशेप पावडर घालून प्यायल्यास चांगला परिणाम मिळतो.
बडीशेप घातलेलं दूध प्यायल्यास चांगली झोपही येते. पचनशक्ती सुधारून बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाहीत. स्मरणशक्तीही वाढते.
दम्याचा त्रास असलेल्यांसाठी बडीशेप घातलेलं दूध पिणे फायदेशीर आहे. बडीसोप घातलेलं दूध रेस्पिरेटरी सिस्टिम सुधारतं. त्यामुळे डॉक्टरदेखील असं दूध पिण्याचा सल्ला देतात.
बडीशेपमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे बडीशेप खाण्याने वजन नियंत्रणात येतं. बडीशेपमुळे शरीरात साठलेली चरबी कमी होते. म्हणजेच शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होतं.