मुंबई, 18 जुलै : साखर आणि गोड पदार्थांबद्दल प्रेम असणे चुकीचे नाही. परंतु यामुळे टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. टाइप 2 डायबिटीजमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नेहमीपेक्षा जास्त होते. ज्यामुळे अंधत्व, किडनी फेल होणे, हृदयविकार आणि इतर गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात. परंतु आता हा टाईप 2 डायबिटीज कमी करण्यासाठी एक चांगला उपाय मिळाला आहे. अजतकने दिलेल्या एका वृत्तानुसार, जर्नल करंट डेव्हलपमेंट्स इन न्यूट्रिशनमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला आणि यामध्ये असे आढळते की, डाळिंबाचा ज्यूस पिल्यानंतर टाईप 2 डायबिटीज असणाऱ्या लोकांच्या रक्तातील साखर 15 मिनिटात कमी झाली.
या अभ्यासानुसार, जे लोक सुमारे 236 मिली डाळिंबाचा ज्यूस प्यायले त्यांच्या रक्तातील साखर कमी झाली. या संशोधनात 21 निरोगी लोकांचा समावेश करण्यात आला होता. संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना डाळिंबाचा रस किंवा पिण्यासाठी पाणी घातलेले डाळिंबाचे पेय देण्यात आले. संशोधनात सहभागी स्वयंसेवकांना त्यांच्या फास्टिंग सीरम इन्सुलिनच्या पातळीनुसार दोन गटांमध्ये विभागण्यात आले. संशोधकांना असे आढळून आले की, ज्या लोकांनी डाळिंबाचे ज्यूस घेतले आहे, त्यांच्या रक्तातील साखर कमी झाली. लो फास्टिंग सीरम इन्सुलिन असलेल्या लोकांच्या रक्तातील साखर फक्त 15 मिनिटांत कमी झाली.
Women Expectations : जुने फंडे आता काम करत नाहीयेत; चाळीशी ओलांडलेल्या बायकोला असं करा इम्प्रेस
संशोधकांनी निष्कर्ष काढला की, डाळिंबाच्या ज्यूसमध्ये असलेले कंपाउंड लोकांच्या ग्लुकोज मेटॅबॉलिझमला नियंत्रित करू शकतात. डाळिंबाच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय डाळिंबात अँथोसायनिन्स अधिक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे त्याचा रंग गडद लाल होतो. हे अँटिऑक्सिडेंट साखर आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. जरी डाळिंबाचा रस आणि रक्तातील साखरेची पातळी यामागील यंत्रणा पूर्णपणे स्पष्ट नसली तरी त्याच्या परिणामांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संशोधन आवश्यक आहे.
तुमच्या या चुकीच्या सवयींमुळे तुमचे वय होण्याआधीच तुम्ही म्हातारे दिसू शकता…
जर्नल न्यूट्रिशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की डाळिंबाच्या रसाचा रंग गडद असल्याने, टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये फास्टिंग सीरम ग्लुकोज आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Tips for diabetes