मुंबई, 20 जुलै : कोणाशी नातं जोडलं जण ही एक सुंदर भावना असते. आपल्याला कोणीतरी हक्काची व्यक्ती मिळत असते. असं म्हणतात की प्रेमाला आणि नातं जोडण्याचा वयाचे बंधन नसते. म्हणून बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की, कमी वयाच्या महिलांना जास्त वयाच्या पुरुषांकडे आकर्षित होतात. कमी वयाची मुलगी आणि जास्त वयाचे पुरुष अशी अनेक जोडपी सिनेविश्वात आहेत. अशातच मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशिपची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा अधोरेखित होतो की, अखेर मुली जास्त वयाच्या पुरुषांकडे आकर्षित का होतात? आज आपण याची काही कारणं जाणून घेणार आहोत. जास्त वयाचे पुरुष निभावतात मार्गदर्शकाची भूमिका जास्त वयाचे पुरुष कमी वयाच्या मुलींसाठी एखाद्या शुभचिंतकासारखे असतात. प्रसंगी जास्त वयाचे पुरुष मुलींसाठी मार्गदर्शक आणि वडिलांचीदेखील भूमिका साकारतात आणि समस्या सहज सोडवतात.
Skin Care : चेहऱ्यावर दिसतायत फाईन लाईन्स आणि सुरकुत्या? आवळ्याच्या मदतीने अशी घ्या त्वचेची काळजीजास्त वयाच्या पुरुषांसोबत मुलींना वाटते सुरक्षित मुलींना मोठी किंवा जास्त वयाची मुले आवडतात. त्यामुळे काही मुली स्वतःहून मोठ्या मुलांना डेट करतात. मुलींना मोठ्या आणि जबाबदार जोडीदारासोबत सुरक्षित वाटते. मुलींचा असा विश्वास असतो की जास्त वयाचे पुरुष आयुष्य चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि ते नेहमीच योग्य निर्णय घेतात. मुलींना आवडतात अनुभवी पुरुष वाढत्या वयाबरोबर लोकांना जीवनाच्या अनेक क्षेत्रात अनुभव मिळतात. मुलींना अनुभवी पुरुष आवडतात. असे पुरुष सर्व प्रकारच्या परिस्थिती सहज हाताळू शकतात. म्हणूनच मुली वयाने मोठा जोडीदार निवडतात. जास्त वयाच्या पुरुषांमध्ये असतो आत्मविश्वास जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आत्मविश्वास जास्त असतो. जे मुलींना विशेष आवडते. अशा पुरुषांना स्त्रियांचे मानसशास्त्र अधिक चांगले समजते. हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे मुली जास्त वयाच्या पुरुषांना पसंत करतात. Avocado peel benefits : अॅव्होकाडो खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देता? हे फायदे वाचून थक्क व्हाल जास्त वयाचे पुरुष असतात आर्थिकद्रयष्ट्या सक्षम झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जास्त वयाचे पुरुष आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम असतात. ते स्वतःच्या आयुष्याचे निर्णय हुशारीने घेतात. मुलींची पहिली इच्छा असते की त्यांच्या जोडीदाराने त्यांना चांगले आयुष्य द्यावे. यामुळे मुली जास्त वयाच्या पुरुषांकडे आकाराशीत होतात.

)







