मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सकाळी उठताच जोडीदारासोबत फक्त करा हे काम; संपूर्ण दिवस उत्तम जाईल

सकाळी उठताच जोडीदारासोबत फक्त करा हे काम; संपूर्ण दिवस उत्तम जाईल

सकाळी उठल्यानंतर या टिप्स तुम्ही अवलंबल्या तर तुमच्या नात्यात गोडवा येईल.

सकाळी उठल्यानंतर या टिप्स तुम्ही अवलंबल्या तर तुमच्या नात्यात गोडवा येईल.

सकाळी उठल्यानंतर या टिप्स तुम्ही अवलंबल्या तर तुमच्या नात्यात गोडवा येईल.

  मुंबई, 18 जानेवारी : प्रेम, संवाद, परस्पर समंजसपणा आणि नावीन्य कोणत्याही नात्यात (Relationship) खूप महत्त्वाचं असतं. कधी-कधी एकमेकांसोबत दीर्घकाळ राहिल्याने पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं (Couples) आयुष्य खूपच कंटाळवाणं बनतं. तुम्ही याच पद्धतीच्या समस्येचा सामना करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत काही टिप्स (Relationship Tips) देणार आहोत.

  सकाळी उठल्यानंतर तुमच्या दिवसाची सुरुवात रोमँटिक (Romantic) पद्धतीने झाली, तर संपूर्ण दिवस चांगला जातो. यासाठी सकाळी उठल्यानंतर या टिप्स तुम्ही अवलंबल्या, तर तुमच्या नात्यात गोडवा येईल.

  प्रत्येकाला दुसऱ्यांनी आपलं कौतुक केलेलं आवडते. तो मानवी स्वभावच आहे. कौतुक आपल्या जोडीदाराने केलं तर त्याची बातच खास असते. यासाठी सकाळी उठल्यानंतर आपल्या जोडीदाराचं कौतुक करा. कौतुकामुळे आनंद आणि आत्मविश्वास दोन्ही गोष्टी वाढतात. यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि दिवसभर जोडीदाराच्यात आत्मविश्वास (Confidence) आणि उत्साह असेल. काम, मेहनत किंवा त्यांचा लूक याबाबत तुम्ही त्यांचं कौतुक करू शकता.

  हे वाचा - जावयाचा असा पाहुणचार; VIDEO पाहून म्हणाल, 'असं सासर आपल्यालाही हवं राव'

  प्रत्येकाला आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी अशी इच्छा असते. तुमच्या जोडीदाराला छान हसून गुड मॉर्निंग म्हटल्याने तुमच्या दोघांची सकाळ आनंदी होईल. एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणणं हेदेखील आदराचं लक्षण असतं. सकाळी उठल्यानंतर आपल्या पार्टनरला एक मॉर्निंग किस (Morrning Kiss) किंवा मिठी (hug) मारून दिवसाची सुरुवात केल्यास तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक जाईल.

  दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असं म्हटलं जातं. आपण दिवसभराच्या कामात इतके व्यग्र असतो, की हसायलाही विसरतो. अशा परिस्थितीत दिवसाची सुरुवात हसून करा. जोडीदाराला एखादा विनोद (Jokes) सांगून किंवा त्यांच्यासोबत मजा करून तुम्ही अगदी आनंदाने आपल्या दिवसाची सुरुवात करा. यामुळे दिवसभरासाठी सकारात्मक उर्जा मिळते आणि ताजंतवानं वाटतं.

  हे वाचा - Wedding cake मुळे चढला नवरीबाईचा पारा; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मागितला घटस्फोट

  सकाळी उठल्यानंतर स्वयंपाकघरात जायला काही जणांनाच आवडते; पण आपल्या जोडीदारासोबत नाश्ता (Breakfast) बनवणंदेखील मजेदार ठरू शकतं. रोमँटिक मूडमध्ये जोडीदारासोबत चहा/कॉफी किंवा नाश्ता तयार करू शकता. यामुळे तुमच्यातलं प्रेम वाढेल. तसंच तुम्हाला एकमेकांसोबत थोडा जास्त वेळ घालवण्याची संधीदेखील मिळेल.

  सकाळी उठल्याबरोबर या टिप्सचा अवलंब करून आपल्या जोडीदारासोबतचे नातं आणखी घट्ट करू शकता.

  First published:

  Tags: Couple, Lifestyle, Relationship, Relationship tips, Romance