Home /News /lifestyle /

लग्न करताय? आधी जोडीनं करा या चार मेडिकल टेस्ट, मग सगळंच होईल शुभमंगल!

लग्न करताय? आधी जोडीनं करा या चार मेडिकल टेस्ट, मग सगळंच होईल शुभमंगल!

विवाह दणक्यात नक्कीच करा. मात्र त्याआधी काही महत्त्वाच्या टेस्ट जोडप्यानं केल्याच पाहिजेत.

    मुंबई, 18 एप्रिल : भारतात लग्नसमारंभ अगदी उत्साहात साजरे केले जातात. आता कोरोनामुळं थोडेफार निर्बंध असले तरी एरवी हा उत्साह मोठा असतो. यात महिनोन्महिने आधीपासून तयारी सुरू होते. (relationship tips) अगदी मित्र आणि नातेवाईकांची यादी तयार करण्यापासून आवडते साजेसे कपडे निवडण्यापर्यंत गोष्टी सुरू असतात. मात्र या गडबड-गोंधळात अनेकदा महत्त्वाच्या गोष्टी मात्र विसरतात. अनेक लोक आपल्या वैवाहिक जीवनाचं भवितव्य जाणून घेण्यास कुंडलीही जुळवतात. मात्र या सगळ्यांशिवाय निरोगी आणि आनंदी नात्यासाठी एक महत्त्वाचा पैलू आहे विवाहित जोडप्याचं आरोग्य. (marriage goals tests) एखाद्यासोबत आयुष्याचा मोठा काळ घालवण्यासाठी खूप गरजेचं आहे, की तुम्ही जोडीदाराच्या आरोग्याशी निगडीत माहिती घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही लागाच्या तयारीत गुंतलेले असाल तर थोडा वेळ काढा आणि या चार टेस्ट नक्की करून घ्या. यातून तुमच्या भविष्यातील सुखी जीवनात कसली बाधा येणार नाही. (happy and healthy married life goals) या चार टेस्ट करा आणि सुखी जीवनाचा आनंद घ्या (tests to do before marriage) इन्फर्टिलिटी टेस्ट इन्फर्टिलिटी टेस्ट लैंगिक अवयवांचं आरोग्य आणि स्पर्म काउंटबाबत माहिती देणारी टेस्ट असते. अर्थात, वंध्यत्वाची कुठली दृश्य लक्षणं नसतात. त्यामुळं हे गरजेचं आहे, की तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर तुमच्या नात्यात कुठलं वितुष्ट यायला नको. जर या टेस्टमध्ये काही वेगळी माहिती समोर आली तर त्यातून तुमची प्लॅनिंग अयशस्वी होऊ शकते. मग तुमच्याकडे उपचार घेण्यासाठी वेळ असेल. हेही वाचा -Summer tips : उन्हाळ्यात टाळा मसाल्यांचं अतिसेवन, होऊ शकतो त्रास ब्लड ग्रुप कॉम्पिटबिलिटी टेस्ट (couple medical tests before marriage) ही टेस्ट कदाचित तुम्हाला जास्त गरजेची वाटणार नाही पण जर तुम्ही बाळ जन्माला घालण्याची योजना करत असाल तर ही टेस्ट खूप गरजेची आहे. या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांचा आरएच फॅक्टर माहिती करून घेतला जातो. आणि बाळ जन्माला घालण्यासाठी दोघांचा सामान फॅक्टर असला पाहिजे. तुम्हा दोघांचा रक्तगट एकमेकांससोबत कम्पॅटिबल नसेल तर गरोदरपणामध्ये अडचणी उद्भवत राहू शकतात. ही समस्याच दुसरं बाळ जन्माला घालताना अजूनच जास्त असू शकते. कारण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यात आईच्या अँटीबॉडीज आपल्या बाळाच्या रक्त पेशींनाच नष्ट करतात. अनुवंशिकता संक्रमण स्थिती तपासणी (essential medical tests before wedding) जेनेटिक स्थिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीत सहजपणे संक्रमित होत असते. त्यामुळं खूप गरजेचं आहे, की या आजारांबाबत आधीच कळालं पाहिजे. अन्यथा नंतर खूप उशीर होऊ शकतो. स्तनांचा कर्करोग, कोलोन कर्करोग, किडनीचा विकार आणि मधुमेहासह काही रोग यात आहेत. वेळीच निदान झालं तर पुढचे उपचार जास्त प्रभावी ठरू शकतात. अन्यथा पुढे हे जास्त घटक ठरू शकतं. हेही वाचा Pregnancy च्या सुरुवातीला फक्त पाळी चुकणंच नव्हे तर हीसुद्धा दिसू शकतात लक्षणं एसटीडी टेस्ट (STD Test) आजच्या काळात लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवले जाणं सामान्य गोष्ट बनली आहे. यासाठी दोघांचीही लैंगिकमाध्यमातून संक्रमित होणाऱ्या आजारांची तपासणी केली जाणं हा चांगला विचार आहे. या आजारांमध्ये एचआयव्ही एड्स, सिफिलिससह इतर रोग आहेत. यातल्या काही रोगांचे उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात आणि गंभीर रोग असल्यानं याची टेस्ट लग्नाआधी झालीच पाहिजे. तुमच्या जोडीदाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास भविष्यातील मानसिक आघात आणी ताणापासून तुमचा बचाव आधीच होऊ शकतो. यातून तुम्ही लग्नाचा निर्णय अमलात आणायचा एकी नाही हेसुद्धा ठरवू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage, Relationship tips, Test

    पुढील बातम्या