मुंबई, 16 एप्रिल : वेगवेगळ्या मसाल्यांचा (Spices) वापर होत असल्यामुळे भारतीय जेवण चवदार असतं. प्रत्येक प्रांतात मसाल्याचं स्वरूप बदललेलं असेल किंवा त्यातील घटक बदललेले असतील; पण स्वादिष्ट जेवण तयार करण्यासाठी मसाले वापरणं मस्टच आहे असा जणू काही नियम आहे भारतात. मसाल्यामुळे जशी जेवणाची लज्जत वाढते, तसं ते आरोगग्यासाठीही लाभदायक असतात. परंतु, मसाल्यांमधले काही घटक प्रकृतीने खूप उष्ण असल्यामुळे त्यांचा उन्हाळ्यात (Summer season) वापर टाळायला हवा. हे पदार्थ असलेल्या मसाल्यांपासून तयार केलेले पदार्थ उन्हाळ्यात खाल्ले तर शरीरातील उष्णता वाढू शकते. उन्हाळ्यात कोणते मसाले टाळायला हवेत आणि कोणते थंड पदार्थ सेवन करायला हवेत, याविषयी माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं प्रसिद्ध केलं आहे. हे पदार्थ टाळा आलं - असं म्हणतात, की आलं (Ginger) घालून केलेल्या पदार्थाला चांगली चव येते. घराघरांत जेवणामध्ये आल्याचा वापर केला जातो. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आलं घालून केलेला चहा कोणाला नको असतो बरं? पण उन्हाळ्यात मात्र आल्याचं अतिसेवन हानिकारक ठरू शकतं. आल्याचं सेवन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाम येतो. ज्यांना डायबेटिस आणि ब्लीडिंग डिसऑर्डर (Diabetes and Bleeding Disorder) आहे अशा लोकांनी आल्याचं सेवन टाळायला हवं. उन्हाळ्यात याचं अधिक सेवन केल्यास छातीत जळजळ होणं, अतिसार, ढेकर येणं आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. लाल मिरची - उन्हाळ्यात लाल मिरचीचं अतिसेवन आरोग्यासाठी घातक असतं. मसाल्यातला हा घटक खूपच उष्ण असतो. मिरचीमुळे शरीरातीलं उष्णता वाढते. यानं पोटात आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे लाल मिरचीचं सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. काळी मिरी - काळी मिरी हा एक मसाल्यातला पदार्थ आहे. याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होते. काळी मिरी काही औषधांचा प्रभाव कमी करू शकते. त्यामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. लसूण - उन्हाळ्यात लसणांचे पदार्थ खाणं कमी करावं असा सल्ला दिला जातो. याचा कमी वापर करावा. लसणांचं अधिक सेवन केल्यास तोंडाला वास येणं, अॅसिड रिफ्लक्स आणि ब्लीडिंगचा धोका वाढू शकतो. हिवाळ्यात लसणाचे अनेक फायदे आहेत. परंतु, उन्हाळ्यात याचे तोटे अधिक आहे. तुम्ही उन्हाळ्यात हे खा पुदिना - पुदिना खूपच थंड असतो. माउथ फ्रेशनर म्हणूनही पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिना शरीरात थंडपणा निर्माण करतो. अपचन, छातीत दुखणं, उन्ह लागणं, त्वचा आणि छातीतील जळजळीपासून दिलासा देण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. कोथिंबिर - कोथिंबिरीच्या पानांमध्ये शरीरात थंडपणा कायम ठेवण्याचे गुण असतात. सूज कमी करण्यासाठीही कोथिंबीरीचं सेवन केलं जातं. अशाच प्रकारे गमर मसाल्यांचा वापर कमी करून थंड पदार्थ सेवन केल्यास उन्हाळ्यात त्रास होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







