मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pregnancy च्या सुरुवातीला फक्त पाळी चुकणंच नव्हे तर हीसुद्धा दिसू शकतात लक्षणं

Pregnancy च्या सुरुवातीला फक्त पाळी चुकणंच नव्हे तर हीसुद्धा दिसू शकतात लक्षणं

Pregnancy Symptoms: एखादी महिला गर्भवती असण्याचं प्रमुख लक्षण पाळी चुकणं जरी असलं तरी इतरही काही बदल तिच्या शरीरात दिसू लागतात. ही लक्षणं समजून घ्यायला हवीत.

Pregnancy Symptoms: एखादी महिला गर्भवती असण्याचं प्रमुख लक्षण पाळी चुकणं जरी असलं तरी इतरही काही बदल तिच्या शरीरात दिसू लागतात. ही लक्षणं समजून घ्यायला हवीत.

Pregnancy Symptoms: एखादी महिला गर्भवती असण्याचं प्रमुख लक्षण पाळी चुकणं जरी असलं तरी इतरही काही बदल तिच्या शरीरात दिसू लागतात. ही लक्षणं समजून घ्यायला हवीत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 फेब्रुवारी : प्रेग्नंट असणं अर्थातच गर्भवती होणं (pregnancy) याचं पाहिलं लक्षण असतं तुमची मासिक पाळी (monthly periods) अर्थात पिरियड्स मिस होणं. मात्र याशिवायही प्रेग्नन्ट होण्याची अनेक लक्षणं महिलांचं शरीर (body of woman) दाखवतं.

ही लक्षणं म्हणजे स्तन अतिशय नाजूक, दुखरे होणं, सतत थकवा येणं. याशिवायही अनेक लक्षणं दिसू शकतात. यांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला तुम्ही प्रेग्नन्ट आहात की नाही हे कळू शकेल. प्रेग्नन्सीच्या सुरवातीच्या काळात अशी काही लक्षणं दिसतात जी अर्ली सिम्प्टम्स असू शकतात.

शरीराचं तापमान वाढणं (Increasing Body Temperature)

तुम्ही गर्भवती असाल तर शरीराचं तापमान वाढतं. पहिल्यांदा ओव्ह्यूलेशन झाल्यावर ती महिला सकाळी उठते तेव्हा तिच्या शरीराचं तापमान थोडं वाढलेलं असतं.  हे तापमान दोन आठवड्यांहून जास्त काळ असंच राहिलं तर हे प्रेग्नन्ट झाल्याचं लक्षण असू शकतं.

पिरियड्स क्रॅम्प्सची जाणीव (Period Cramps)

अनेकदा  प्रेग्नन्ट झाल्याच्या सुरवातीच्या काळात तुम्हाला पोटाच्या खालच्या भागात पिरियड क्रॅम्प्ससारखं दुखायला लागतं. यादरम्यान लघवीलाही सतत जायला लागतं. हेसुद्धा एक सुरवातीच्या काळातील लक्षण असू शकतं.

ऍसिडिटी होणं (Acidity)

यादरम्यान गॅसची समस्या वाढते. तुम्हाला सतत अपचन झाल्यासारखं वाटतं. काहीही न खावंसं वाटतं. सोबतच काहीही खाल्यावर मळमळ आणि उल्टी होते.

हेही वाचा  रात्री झोपेतही वजन कमी करायचंय? ही पाच पेयं आहेत अतिशय प्रभावी, दिसेल फरक

सतत आजारी पडणं (Sickness)

गर्भवती महिलांना गर्भावस्थेत सर्दी किंवा फ्लू ची लक्षणं दिसू शकतात. मात्र पुन्हा-पुन्हा आजारी  पडण्याचा अर्थ तुम्ही गर्भवती आहात असा होत नाही. अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

मूड स्विंग्स (Mood Swings)

अचानक हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं तुम्हाला याकाळात मूड स्विन्ग्ज होऊ शकतात. तुम्ही तुमच्या भावना हाताळू शकत नाही. खूप जास्त हळवेपणा येतो. गर्भावस्थेच्या सुरवातीच्या काळात हे सामान्य आहे.

हेही वाचा  Explained: जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती पसरवतात अधिक प्रदूषण?

व्हजायनल डिस्चार्ज

यादरम्यान व्हजायनल डिस्चार्ज होणं गर्भवती होण्याचंही लक्षण असू शकतं. बहुतांश प्रेग्नन्ट महिलांना पहिल्या तीन महिन्यात चिकट, पांढरा किंवा पिवळा स्त्राव योनीतून जाताना दिसतो. हे योनीमध्ये रक्तप्रवाह वाढल्यानं होतं.

(या लेखातील माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. यांची अंमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क करा.)

First published:

Tags: Pregnancy, Pregnant woman