मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमचंही रिलेशनशिप बोरिंग झालं आहे का? या ट्रिक्स नात्यातील हरवलेला स्पार्क आणतील परत

तुमचंही रिलेशनशिप बोरिंग झालं आहे का? या ट्रिक्स नात्यातील हरवलेला स्पार्क आणतील परत

कालांतराने आपण आपलं नातं किंवा नात्यातील व्यक्तीला गृहीत धरू लागतो आणि मग आपल्या नात्यामध्ये एक कलह निर्माण होऊ लागतात, व्यक्तींमध्ये अंतर येऊ लागतं. अशावेळी तुम्हाला नात्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.

कालांतराने आपण आपलं नातं किंवा नात्यातील व्यक्तीला गृहीत धरू लागतो आणि मग आपल्या नात्यामध्ये एक कलह निर्माण होऊ लागतात, व्यक्तींमध्ये अंतर येऊ लागतं. अशावेळी तुम्हाला नात्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.

कालांतराने आपण आपलं नातं किंवा नात्यातील व्यक्तीला गृहीत धरू लागतो आणि मग आपल्या नात्यामध्ये एक कलह निर्माण होऊ लागतात, व्यक्तींमध्ये अंतर येऊ लागतं. अशावेळी तुम्हाला नात्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 30 ऑक्टोबर : सध्या प्रत्येकाच्या मागची धावपळ आणि कामं इतकी वाढली आहेत. की आपल्याला स्वतःसाठी तर वेळ नसतोच. पण नात्याला देण्यासाठी आपल्याकडे फार वेळ शिल्लक राहत नाही. कालांतराने आपण आपलं नातं किंवा नात्यातील व्यक्तीला गृहीत धरू लागतो आणि मग आपल्या नात्यामध्ये एक कलह निर्माण होऊ लागतात, व्यक्तींमध्ये अंतर येऊ लागतं. अशावेळी तुम्हाला नात्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.

नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी उत्कटता, वचनबद्धता आणि संबंध सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र लोकांना बर्‍याचदा दीर्घकाळ एकत्र राहण्याचा कंटाळा येतो आणि त्यांचे नाते मजबूत ठेवणे हे एक आव्हान असल्याचे दिसते. अशा स्थितीत नात्याला काही विशेष उपायांची गरज असते. नात्यातील हरवलेला 'स्पार्क' परत आणण्यासाठी तुम्ही काही उपक्रमांचा अवलंब करू शकता. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही अॅक्टिव्हिटींबद्दल सांगत आहोत, ज्याचा आनंद तुम्ही दोघेही एकत्र करू शकता.

पहिल्यांदा डेटवर जाताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, नाहीतर नात्यावर होईल परिणाम

एकमेकांमधील संबंध दृढ करण्यासाठी अॅक्टिव्हिटी

एकमेकांचे ऐकणे : ऐकणे म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्यासमोर सर्व काही बोलण्याची परवानगी द्या. एकमेकांच्या मनातील प्रत्येक गोष्ट ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. याने तुमच्या नात्यात कमी झालेला संवाद वाढेल.

एकमेकांच्या ध्येयांबद्दल बोला : जर तुम्ही एकमेकांच्या ध्येयांबद्दल बोललात तर तुमच्या दोघांमध्ये विश्वास निर्माण होईल. अशा परिस्थितीत, तुम्ही एकमेकांची स्वप्ने, उद्दिष्टे इत्यादींवर एकमेकांची मदत आणि भूमिका यावर चर्चा करू शकता.

एकत्र छंद जोपासा : तुमच्या दोघांना आवडणारे छंद शोधा आणि त्यासाठी तुमच्या आयुष्यात वेळ काढा. यामुळे तुमच्यामध्ये एकत्रपणाची भावना निर्माण होईल आणि तुम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल.

तुमच्या भावना शेअर करा : एकमेकांसाठी खास वेळ काढा. याला बरेच लोक क्वालिटी टाईमदेखील म्हणतात. असा वेळ एकमेकांसाठी काढा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. तुम्हाला जशपद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने बोला. मात्र एकमेकांना यावरून जज करू नका आणि विसंवाद टाळा.

पत्र लिहा : ही जुनी पण खूप प्रभावी आणि इंटरेस्टिंग पद्धत आहे. तुमच्या जोडीदाराला विशेष वाटण्यासाठी एकमेकांना पत्र लिहा. येथे तुम्ही तुमचे प्रेम आणि भावना नवीन पद्धतीने व्यक्त करू शकता. हा पात्र व्यवहार तुमच्या नात्यातील हरवलेला चार्म आणि स्पार्क नक्की परत आणेल.

प्रश्न विचारा : एकमेकांसाठी दर्जेदार वेळ काढा आणि यावेळी काही अर्थपूर्ण प्रश्न विचारा. असे केल्याने तुमच्या दोघांमध्ये बंध निर्माण होईल आणि तुम्हाला एकमेकांकडून काय हवे आहे. याची तुम्हाला कल्पना येईल.

पुरुषांच्या या गोष्टींवर लगेच भाळतात स्त्रिया; प्रेमचं नव्हे लग्नासाठी होतात तयार

एकमेकांच्या डोळ्यात पहा : हा खेळ तुम्हाला एकमेकांशी जोडण्यास खूप मदत करेल. एकमेकांच्या डोळ्यात पाहणे हा एक सुंदर अनुभव असतो. याला तुम्ही संवाद साधण्याचा एक वेगळा मार्गही म्हणू शकता. या छोट्या छोट्या युक्त्या तुमच्या नात्यात नवा आनंद आणतील.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Relationship tips