**मुंबई, 29 ऑक्टोबर :**सध्या डेटिंगचा जमाना आहे, त्यामुळे रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अनेकदा भेटीगाठी होतात, त्यावरून पुढे रिलेशनशिपमध्ये यायचं की नाही, याबद्दल मुलं आणि मुली ठरवतात. लग्न करतानाही मुलं-मुली बाहेर भेटतात आणि मग निर्णय घेतात. तर या प्रोसेसमध्ये सर्वांसाठी पहिली भेट फार खास असते. ही भेट आयुष्यभर स्मरणात राहते. पहिली भेट खास व्हावी, यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात, पण अनेक जणांच्या बाबतीत पहिली भेट अपेक्षेप्रमाणे खास ठरत नाही. एखादी चूक होते आणि ती पहिली भेट किंवा सध्याच्या भाषेत पहिली डेट, चांगल्याऐवजी वाईट गोष्टींमुळे आयुष्यभर लक्षात राहू शकते. त्यामुळे डेटवर जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊयात. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय. स्वतःचं कौतुक काही जणांचा स्वतःचं कौतुक करण्याचा स्वभाव असतो. ते सोबत आलेल्या व्यक्तीसमोर स्वतःचं खूप कौतुक करतात. अनेकदा पहिल्याच भेटीत आपण स्वतःबद्दल फार बोलतोय, याची जाणीवही बोलणाऱ्याला नसते. त्या व्यक्तीचा तसा हेतूही नसतो, पण ही पद्धत आपल्या सोबत आलेल्या व्यक्तीला डॉमिनेटिंग वाटू शकते. तुम्ही स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी सांगण्यास कोणतीही हरकत नाही, पण त्याला मर्यादा असायला हव्यात, तसंच तुम्ही समोरच्या व्यक्तीचंही ऐकून घ्यायला हवं. असं केल्यास ती तुमच्या नात्यासाठी सकारात्मक बाब असेल. हेही वाचा - Tulasi Vivah 2020 : तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे उपाय; वैवाहिक आयुष्यातील समस्या होतील दूर दुसऱ्यांबरोबरचं वर्तन रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक ठिकाणी पहिल्या डेटसाठी भेटणं ही कॉमन गोष्ट आहे. तिथे कपल खाण्यापिण्याचे पदार्थ ऑर्डर करून गप्पा मारत बसतात. त्यामुळे ऑर्डर देताना किंवा मदत मागताना तुम्ही रेस्टॉरंटच्या कर्मचार्यांशी कसं वागता ते भेटायला आलेली व्यक्ती नोटीस करत असते. अशावेळी तुम्ही कोणतीही चूक केल्यास त्यामुळे तुमच्या इमेजवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नेहमी इतरांशी चांगलं वागा. अॅटिट्यूड दाखवणं जर तुम्ही अॅटिट्युडने वागत असाल म्हणजे अहंकाराने वागत असाल तरीही नात्यासाठी मोठी नकारात्मक गोष्ट असू शकते. उदाहरणार्थ, डेटवर पोहोचताना तुम्हाला काही कारणांमुळे उशीर झाला आणि नंतर तुमच्या अॅटिट्युडमुळे तुम्हाला उशीर का झाला, हे समोरच्याला सांगत नसाल, तर ते योग्य नाही. अशा पद्धतीने वागल्यामुळे त्याचा तुमच्या इमेजवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उशीर झाला असेल तर समोरच्या व्यक्तीची माफी मागा किंवा त्यांना कारण सांगा. डेटवर जाताना आपल्या वर्तणुकीची आपण विशेष काळजी घ्यायला हवी. कारण, त्या डेटवर तुम्ही कसे वागताय, यावरच तुमच्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.