जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पुरुषांच्या या गोष्टींवर लगेच भाळतात स्त्रिया; प्रेमचं नव्हे लग्नासाठी होतात तयार

पुरुषांच्या या गोष्टींवर लगेच भाळतात स्त्रिया; प्रेमचं नव्हे लग्नासाठी होतात तयार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कित्येक लोक आजही आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार चालतात. त्यांची नीती अवलंबल्यास कधीच अपयश येत नाही, असे मानले जाते. आचार्य चाणक्यांची अनेक धोरणे लोकप्रिय आहेत. महिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टींकडे आकर्षित होतात, याविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑक्टोबर : आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांच्या विचारांचा अवलंब करून अनेकांनी आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढल्या आणि यशाचं शिखर गाठलं. त्यांची धोरणे-विचार जुन्या काळात जितकी प्रभावी होती तितकीच ती सध्याच्या काळातही व्यावहारिक आहेत. आपल्या धोरणांमध्ये त्यांनी मित्र, वैवाहिक जीवन, प्रेमप्रकरण आणि शत्रूंबाबत अनेक सल्ले दिले आहेत. कित्येक लोक आजही आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार चालतात. त्यांची नीती अवलंबल्यास कधीच अपयश येत नाही, असे मानले जाते. आचार्य चाणक्यांची अनेक धोरणे लोकप्रिय आहेत. यात स्त्री-पुरुषांच्या नात्याबद्दलही सांगितले आहे. जोडीदार - आचार्य चाणक्य यांच्या धोरणानुसार, प्रत्येक पुरुष किंवा स्त्रीला एक उत्तम जीवनसाथी शोधण्याची इच्छा असते, जो प्रत्येक सुख-दु:खात त्याची साथ देईल. आचार्यांच्या मते, जर आपण स्त्रियांबद्दल बोलायचे झाल्यास ती पुरुषांमध्ये काही गुण शोधण्याचा प्रयत्न करते. पुरुषांमध्ये खालील काही गुण असतील तर त्यांना महिला लगेच पटतात. व्यक्तिमत्व - अनेक लोकांचा असा विश्वास असतो की, स्त्रिया पुरुषांच्या सौंदर्याकडे जास्त आकर्षित होतात, पण तसे नाही. महिलांना पुरुषांचे सौंदर्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक आवडते. स्त्री सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देते. प्रामाणिक - जो पुरुष वैवाहिक किंवा प्रेम संबंधांमध्ये प्रामाणिक असतो आणि इतर कोणत्याही स्त्रीवर वाईट नजर ठेवत नाही. स्त्रिया अशा पुरुषांकडे पटकन आकर्षित होतात आणि प्रेमसबंध आणि पुढे लग्नासाठी तयार होतात. दुसऱ्याचे मत ऐकणारा - अनेकदा पुरुषांचे वागणे असे असते की, त्यांना त्यांचा दृष्टिकोन वरचढ ठरवायचा असतो आणि इतर कोणाचेही ऐकायचे नसते, पण स्त्रिया अशा जीवनसाथीचा शोध घेतात, जो त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या मतालाही प्राधान्य देतो आणि त्यांचे म्हणणेही ऐकतो. दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याबरोबरच तो चांगला श्रोताही असावा.

News18लोकमत
News18लोकमत

शांत आणि सौम्य - चाणक्य नीती शास्त्रानुसार जे पुरुष शांत, साधे आणि सौम्य स्वभावाचे असतात, महिलांना इतरांपेक्षा असे पुरुष जास्त आवडतात. त्यांचे हे वागणे महिलांना खूप आवडते. गोड बोलणारे आणि कोणाचेही मन न दुखवणारे पुरुष महिलांना आवडतात, अशा पुरुषांना स्त्रिया देखील खूप आवडतात. हे वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात