मुंबई, 01 सप्टेंबर : रिलेशनशिपमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराचे सर्व सुख दु:ख वाटू घेता. एकमेकांना चांगल्या आणि वाईट काळात साथ (Relationship Tips) देण्याचे एकमेकांना वचनं देता. असे केल्याने नात्यातील प्रेम वाढते. परंतु कधी कधी जोडीदार एखाद्या गोष्टीमुळे सतत तणावाखाली असू शकतो आणि अशा परिस्थितीत त्याला सर्व प्रकारे मदत करण्याची आणि त्याला त्यातून बाहेर काढण्याची तुमची इच्छा असू शकते. परंतु तुम्ही ते करुच शकाल असे नसते. समुपदेशन थेरपिस्ट लुसिल शॅकलटनने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की रिलेशनशिपमध्ये असताना जोडीदाराच्या सर्व अडचणी कमी करणे किंवा त्याचा ताण दूर करणे प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही. कारण एक चांगला जोडीदार होणे ही खरं तर आयुष्यभराची ‘वर्क इन प्रोग्रेस’ प्रक्रिया असते आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रत्येक वेळी नीट समजू घ्याल असे होऊ शकत नाही. कारण तुम्ही ना माइंड रिडर असता ना मानोवैज्ञानिक. परंतु तुम्ही काही गोष्टी करून तुम्ही जोडीदाराचा तणाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेऊ शकता आणि त्यांना तुमच्यासोबत रिलॅक्स वाटेल असे वागू शकता. शांत रहा अशा स्थितीत तुम्ही शांत राहिल्यास तुमचा जोडीदारही शांत राहून काहीतरी चांगला विचार करू शकेल. तुम्ही अस्थिर किंवा अस्वस्थ राहिल्यास कदाचित तो आणखी अस्वस्थ होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत शांत राहणे आवश्यक असते.
Women Expectations : जुने फंडे आता काम करत नाहीयेत; चाळीशी ओलांडलेल्या बायकोला असं करा इम्प्रेसजोडीदाराचे ऐका कधी-कधी आपल्या मनातले बोलूनही ताणाव बराच कमी होतो. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला काही बोलायचे असेल तर त्याचे ऐकून घ्या आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला समजून घ्या जोडीदार तुमच्यासोबत त्याची परिस्थीती बोलून दाखवत असेल तर त्याला याची जाणीव करून द्या की तुम्ही त्यांचे बोलणे गांभीर्याने घेत आहात आणि त्यांची परिस्थिती पूर्णपणे समजून घेत आहात. मदतीसाठी विचारा तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारा की तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता किंवा तणाव कमी करण्यासाठी मी आत्ता काय करू शकतो असे विचारा. उदाहरणार्थ चहा, कॉफी पिणे, ब्लॅक चॉकलेट देणे, डोक्याला मसाज देणे किंवा कोणतेही आवडते संगीत लावणे असे काम तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता.
Relationship Secrets : सुष्मिता सेन-ललित मोदीच्या अफेअर्सची चर्चा; तरुणींना जास्त वयाचे पुरुष का आवडतात माहिती आहे का?सोल्यूशनसाठी प्रयत्न करा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जोडीदाराची परिस्थीत लक्षात आली आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करू शकता. त्यांचा तणाव कमी करण्यासाठी तुमच्या बाजूने प्रयत्न करा.

)







