• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Relationship tips जगण्याचा खूप वैताग आलाय? जाणून घ्या कसं बनायचं स्वत:चंच बेस्ट फ्रेंड?

Relationship tips जगण्याचा खूप वैताग आलाय? जाणून घ्या कसं बनायचं स्वत:चंच बेस्ट फ्रेंड?

Relationship tips Life goals: तुम्हाला आयुष्याचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर आधी स्वत:वर प्रेम करायला शिका. कसं करायचं हे?

 • Share this:
  मुंबई, 15 मार्च : असं म्हणतात, की आपणच आपले सर्वात बेस्ट फ्रेंड असलं. हे अगदीच खरं आहे. तुम्ही आतून इतकं मजबूत असलं पाहिजे, की स्वतःच स्वतःची सपोर्ट सिस्टम बनलं पाहिजे. (relationship tips) तुम्हाला आनंदी राहण्यासाठी इतर कुणाची गरजच पडायला नको. कुठल्या बाहेरच्या फॅक्टरवर अवलंबूनही रहायला नको. आजच्या तणावाच्या धावपळीच्या आयुष्यात तुमच्या एखाद्या मित्राला, प्रिय व्यक्तीला तुमच्यासाठी वेळ असेलच असं नाही. अशावेळी कसं बनायचं स्वतःचा सर्वात चांगला मित्र? जाणून घ्या या काही पद्धती. (happy and healthy life) स्वतःची स्तुती करा अनेकदा आयुष्याच्या स्पर्धेत धावताना आपण स्वतःबाबतीत खूपच कठोर होऊन जातो. ही सवय सोडा. स्वतःची खुलून स्तुती करा. आपल्या कुठल्याच कामगिरीला कमी लेखू नका. आपल्या लहान-लहान यशाला मनापासून साजरं करा. (self love tips) हेही वाचा दिवसभराच्या कष्टानंतर पाहिजे चांगली झोप? ही आहेत सिक्रेट्स, नक्की करा ट्राय स्वतःसाठी करूणा बाळगा आपण दुसऱ्यासाठी करुणा, संवेदना दाखवतो. पण स्वतःसाठीही तसंच केलं पाहिजे. स्वतःसोबत एक शांततामय नातं तयार करा. सतत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. काही प्रसंगात स्वतःवर हसायला शिका. (how to love and respect self) सतत स्वतःला गांभीर्यानं घेणं बंद करा. (how to be best friend of yourself) स्वतःसोबत कम्फर्ट शोधा आपण स्वतःसोबत म्हणजेच स्वतःच्या संगतीत एन्जॉय करायला शिका. एकांतात आनंदी राहा. या एकांतात तुमचं स्वतःसोबतचं नातं अजूनच घट्ट होईल. मात्र एकटेपण आणि एकांतातील फरक नीट समजून घ्या. (being best friend of oneself) हेही वाचा Health tips या सोप्या टिप्सच्या मदतीनं राखा किडनीचं आरोग्य, शरीर राहिल फिट स्वतःला स्वीकारायला शिका जो स्वतःला आहे तसा स्वीकारतो तो खरा आनंदी असतो. आपले दोष आणि कमतरता मोकळ्या मनानं स्वीकारा. स्वतःची सतत कठोर समीक्षा करण्याऐवजी स्वतःची बलस्थानं आणि मर्यादा ओळखायला शिका. (tips to love yourself) (Disclaimer -  या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
  Published by:News18 Desk
  First published: